श्वासावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्या मनालाही काबूत ठेवील!

श्वासावर नियंत्रण ठेवा, ते तुमच्या मनालाही काबूत ठेवील!

ह्या आजच्या आधुनिक काळात जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला कि जगामध्ये सगळ्यात चपळ कोणती गोष्ट आहे तर बरेच जण मशीनपासून, प्राण्यांपासून अनेक उदाहरणं देतील पण खर सांगू का जगात सर्वात, चंचल, चपळ असेल तर ते म्हणजे मन कारण काही केल्या ते थांबत नाही, हाताशी येत नाही आणि त्याला धरुनही ठेवता येत नाही. काही क्षणात ते गिरक्या घेते आणि कुठूनही कुठेही जाते आणि त्याच्या कल्पनेलाही कोणताही अंत नाही.

पण ह्याच मनावर जो ताबा मिळवतो तो संतपदाला पोहोचतो, असं आपल्या धर्मग्रंथांतही नमूद केलेलं आहे. पण आजच्या आधुनिक युगात मनुष्य काहीही कन्ट्रोल करू शकतो पण मनाला ताब्यात ठेवण्याइतकी कठीण गोष्ट कोणतीच नाही कारण अनेक आव्हानं, जबाबदाऱ्या अंगावर असताना आणि रोज, प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या स्पर्धांना तोंड द्यावं लागणाऱ्या  आजच्या काळात तर मन अधिकच चंचल आणि आऊट ऑफ कन्ट्रोल झालेलं आहे.

तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात कोणत्याही परिस्थितीत मनाला काबूत ठेवण्याची कला आत्मसात  केलीच पाहिजे, नाहीतर मनाच्या या भन्नाट वेगात आपण कुठल्या कुठे भरकटत जाऊ, हेदेखील तितकंच खरं. अर्थातच भारतीय अध्यात्म जगभरात इतके लोकप्रिय आहे की फार पूर्वीपासूनच मनाला काबूत ठेवण्यासंदर्भात ह्यापूर्वी बरेच प्रयोग झाले आहेत तसेच आपल्या ऋषिमुनींनी प्रचंड मेहनत आणि अखंड चिंतन त्यावर केलं आहे तसेच ते आजच्या आधुनिक काळात शास्त्रसंमत होऊन विज्ञानाच्या कसोटीवरही ते खरं उतरलं आहे.

अलीकडच्या काळात भारताच्या या अध्यात्माचा परदेशांतही मोठ्या प्रमाणात अभ्यास सुरू असून त्यावर अनेक प्रयोगही केले जात आहेत आणि आपलेच अध्यात्म हे आता वेगवेगळ्या नावाने पुन्हा आपल्यालाच नव्या, रंगरुपांत सादर करुन सांगितलं जात आहे आणि आपले दुर्दैव असे की बरेच जण ह्याला त्यांचेच संशोधन मनात आहे पण तसे पाहायला गेले तर ते आपलेच नव्या रूपात आपल्या समोर आलेले आहे हेही तितकेच खरे आहे.

मनावर ताबा ठेवा तुमच्या सगळ्या दु:खाचं आणि आनंदाचं मूळही या मनात आहे, म्हणून मनावर लगाम ठेवला, तर तुमचं चित्तही समाधानी राहील आणि तुम्ही सुखी राहाल, हे सर्वांना माहीत आहे पण तरीही त्याचे पालन होत नाही आणि ह्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या पूर्वीच्या गुरूंचा आणि आज्या आधुनिक काळातील शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा निष्कर्ष हे सांगतो की, भरकटणाºया मनाला काबूत ठेवायचं तर आधी श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे. कारण श्वासावर नियंत्रण ठेवलं तर सततच्या प्रयत्नांनी मनाला तुम्ही थोडं तरी नियंत्रणात आणू शकाल आणि एकदा का हे तुम्हाला जमले की अनेक ताणांतून तुमची मुक्तता होईल आणि आयुष्य खऱ्या अर्थानं जगायला तुम्ही शिकाल.


मनाला लगाम घालण्याचे हे काम आपण केलेच पाहिजे त्यातून तोटा काहीच नाही, झालाच तर फायदाच आहे!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या