इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय!

इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय!


आजकाल तसं पाहायला गेलं तर बरेच जण आपल्या आरोग्याविषयी जागरूक आहेत त्यामुळे असे लोक  हौशीनं व्यायामाला जातात. त्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. कोणी चालायला जाते, कोणी रनिंगला जातं कोणी जिममध्ये जाऊन घाम गाळतो. ह्या सर्व व्यायाम प्रकारानंतर एक समस्या उद्भवते आणि ती म्हणजे गुडघेदुखी ह्यात प्रामुख्याने मुख्य व्यायामाअगोदर रनिंग किंवा जॉगिंगपासून, सकाळी ग्राऊंडवर फिरायला जाण्यापासून सुरुवात होते.  त्याचा वार्मअपसाठी फायदा तर होतोच पण आपण कुठे चालतो, कसं चालतो, पायात कोणते शुज आहेत, ह्या अशा सोप्या आणि साध्या गोष्टींकडे जर नीट लक्ष्य नाही दिले तर गुडघेदुखी वाढण्याची शक्यता असते त्यामुळे बऱ्याचवेळेस तज्ञांचा सल्ला सायकलिंग करण्यावर असतो. गुडघेदुखी असलेले लोकही सायकलिंग करू शकतात, पण अनेकांना सायकल चालवण्याचा कंटाळा येतो आणि ह्या वयात कुठे सायकल?? असा विचार करून त्याचा विचारच सोडून देतात. त्यामुळे अशा अनेक लोकांसाठी इनडोअर सायकल, म्हणजे व्यायामाची घरात एका जागी ठेऊन ज्यावर व्यायाम करता येतो अशी सायकल एक उत्तम पर्याय आहे. ही सायकल बऱ्याच फीचर्समध्ये आज उपलब्ध आहे आणि अशा सायकल आजकाल जिम, ओपन गार्डनमध्ये आपल्याला दिसतात त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल तुम्ही चालवू शकता. कोणत्याही वयोगटातील कोणीही ही सायकल चालवू शकतो आणि हळूहळू सुरुवात करून त्याचा वेळ आणि तीव्रता आपण वाढवू शकतो आणि मुख्य म्हणजे कोणत्याही काळात तुम्ही ही सायकल सहजपणे चालवू शकता. कुठल्याही वयोगटातील व्यक्तींसाठी इनडोअर सायकलिंग हा अतिशय उत्तम  व्यायाम प्रकार असून शरीराच्या संपूर्ण व्यायामासाठी, आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकणारा हा व्यायामप्रकार आजकाल सारेच व्यायामतज्ञ सुचवतात.

 

काय आहेत इनडोअर सायकलिंगचे फायदे?

१) सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. शिवाय वजन घटवायचं असेल तर त्यासाठीही एक उत्तम प्रकार म्हणून तुम्ही सायकलिंगकडे पाहू शकता.

२) सायकलिंगमुळे स्टॅमिना वाढून शरीराची ताकदही वाढते.

३) सायकलिंगमुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात आणि  मसल्स स्ट्रॉँग होण्यास मदत होते.

४) आपल्या शरीराची पॉवर वाढवतानाच सडपातळ होण्यासाठी सायकलिंग हा उत्तम व्यायामप्रकार ठरू शकतो ह्यामुळे वेट लॉस, ब्लड प्रेशर तसेच डायबेटिस कंट्रोलमध्ये राहतो.

५) ही इनडोअर सायकल लहानापासून मोठ्यांपर्यंत कोणीही चालवू शकते कारण सायकलची उंची कमी जास्त करता येते.

६) आपली कंफर्ट लेवल पाहून आपण सायकलिंग करू शकतो. तेही एकाच ठिकाणी. शिवाय बऱ्याच इनडोअर सायकल्समध्ये तुमचा हार्ट रेट, किती सायकल चालवली गेली, किती कॅलरीज जळाल्या.. अशी सगळी माहिती आपल्या डोळ्यांसमोरच स्क्रीनवर आपल्याला दिसत असते.


मग ह्या आणि अशा सहज सोप्या सायकलिंगने तुम्ही सुरवात करून फार चांगले हेल्थी आयुष्य जगू शकता.Regards
 


 

https://www.kohls.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या