लठ्ठपणामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता !

लठ्ठपणामुळे स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता !


आत्तापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी वाचलं आणि ऐकलंही असेल की लठ्ठपणा म्हणजे बऱ्याच आजारांना निमंत्रण, लठ्ठपणा म्हणजे आजारांचं घर. तसेच अशा व्यक्तींमध्ये आजारांची शक्यता अधिक असते.
वैंज्ञानिकांच्या अनेक शोधांमधूनही ही बाब अनेकदा समोर आली आहे की लठ्ठ लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधीत आजारांचा जास्त धोका असतो. तसेच हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीच्या संशोधनातून असेही समोर आले आहे की जाडपणामुळे माणूस आपल्या कामात आळशी होतो, तसेच त्याच्या स्मरणशक्तीमध्येही कमतरता येते. कारण की अशा व्यक्तींना कोणतेही काम हे जरा अवघड होऊन बसते तसेच शरीराच्या अतिरिक्त वजनामुळे शारीरिक हालचालदेखील मंदावते आणि अशा व्यक्तींना एकाच जागी बसावे किंवा आराम करावेसे वाटते आणि ह्याचा थेट परिणाम त्यांच्या विचारसरणीवर होऊन कालांतराने स्मरणशक्तीमध्ये कमतरता येण्यात होतो.
वैंज्ञानिकांच्या शोधातून असेही समोर आलं की, स्मरणशक्तीचा संबंध बॉडी मास इंडेक्सशी आहे. लठ्ठपणासोबतच हाय ब्लड प्रेशर आणि इन्सुलिनची समस्या वाढून खाण्याच्या सवयींमध्येही फरक पडतो आणि ह्याचा थेट परिणाम मेंदुवर पडून नवीन गोष्टी शिकणे आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवरही पडतो. म्हणूनच लठ्ठपणाला दूर ठेवण्यासाठी आणि आपली शरीरयष्टी चांगली ठेवण्यासाठी आपण कायमच जागरूक राहिले पाहिजे आणि नियमित व्यायाम, सकस आणि पौष्टिक आहार , योग्य प्रमाणात पाणी , तसेच ७ ते ८ तास झोप घेणे अत्यावश्यक आहे.
Regardsसंबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या