तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री, फिटनेसची त्रिसुत्री तुम्हाला माहीत आहे?

तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री, फिटनेसची त्रिसुत्री तुम्हाला माहीत आहे?

सध्याच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवायचे असेल तर तुमचा फिटनेस प्लान काय आहे? म्हणजे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? हे प्रश्न तर ओघाने आलेच तसेच अनेक जण त्यांच्या फिटनेससाठी जिममध्ये घाम गाळण्यापासून तर जॉगिंग ट्रॅकवर पळण्यापासून आपापल्या पद्धतीनं आणि आवडीनुसार फिटनेसचे प्रयोग नक्कीच करीत असतील. पण ह्यात एक गोष्ट जर ध्यानात घेतली तर बरेच जण हे दुसरा जसं करेल, तसंच आपणही करूया ह्या मेन्टॅलिटीने व्यायाम किंवा इतर गोष्टी करतात, तर काही वेळा हे प्रयोग मित्र मैत्रिणीचे पाहून आपणही असच करूया ह्या विचाराने काम सुरु करतात.

पण विज्ञानानुसार प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि जे सूत्र दुसºयाला लागू पडतं, तेच आपल्यालाही लागू पडेल असं नाही हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे आणि आपापल्या क्षमतेप्रमाणेच व्यायाम आणि डाएट करावा.

 

येथे प्रत्येकाने एक गोष्ट प्रत्येकानं ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे प्रत्येकाचं स्वतःविषयीचे धोरण आणि ध्येय वेगळं असतं, त्यामुळे त्यासाठीचा करावा लागणार वर्कआऊटही वेगळा असतो. ह्यात प्रामुख्याने पुरुषांचा कल हा आपण ‘बॉडीबिल्डर’ दिसण्याकडे असतो तर महिलांचा फोकस मुख्यत: वेटलॉस आणि फिगर मेन्टेन ठेवण्याकडे असतो. येथे मला एका गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे कोणाचं ध्येय कोणतंही असो, पण कोणत्याही व्यायामाचा बेस मात्र एका त्रिसूत्रीवर आधारलेला असतो. तो म्हणजे कार्डिओ, बॉडी स्ट्रेंग्थ आणि बॉडी फ्लेक्जिबिलिटी!

 


तुम्ही पुरुष असा, स्त्री असा, तुमचे गोल्स काहीही असू द्यात, या त्रिसूत्रीकडे प्रत्येकानं लक्ष द्यायलाच हवं म्हणूनच तुमचा व्यायाम हा ह्या त्रिसूत्रीवरच आधारित असावा जेणेकरून तुमच्या शरीराचा योग्य तो शेप राखण्यास तुम्हाला अधिक फायदा होईल कारण एकच एक प्रकारचा वर्कआऊट करण्याने आपल्या शरीराला फायदाही होत नाही.


Post a Comment

0 Comments