रोजच्या ताणाला औषध काय?

रोजच्या ताणाला औषध काय?

सध्याच्या जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांमध्ये ताण वाढतोय, आणि त्यावरच्या उपाययोजना, यावर बरंच काही बोललं आणि लिहिलंही जातंय. ह्यांची लक्षणं ती सोडवण्याच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीला मानसिक ताणानं ग्रासल्याचं लक्षात येत असल्याचं चित्र मोठ्या प्रमाणात नजरेस पडत आहे. बऱ्याच लोकांना रोजचे कामधंद्यावर जाणे - शिक्षण-घरची जबाबदारी यासाठी होणारी धावपळ, दमछाक हा ताणच आहे हे लक्षातही येत नाही. त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून हेच माझे दैनंदिन आयुष्य आहे असा सर्वसामान्य दृष्टिकोन ठेवला जातो आहे आणि हेच घातक ठरत आहे.

ह्या अशा प्रकारच्या मानसिक ताणाच्या प्राथमिक लक्षणांबाबत योग्य ती काळजी घेणं आवश्यक बनत चालले आहे. सध्याची जीवनशैली धावपळीची तसेच मित्रमंडळींसोबत सहवास कमी आणि कामाचे तास जास्त ह्यामुळे दिवसातले जास्तीत जास्त तास ऑफिसमधल्या जबाबदारी सांभाळण्यात जात आहेत आणि ह्या वाढत्या कामांच्या तासांचा दबाब मनावर येत राहतो. त्यात घर आणि ऑफिसमधील जास्तीचं अंतर, ट्रॅफिक याचीही आता भर पडली आहे. ट्रॅफिक मुळे घरी किंवा ऑफिसला पोहोचायला लागणारा उशीर, हे एक नवीनच कारण मनावरचा ताण वाढवायला आजकाल कारणीभूत ठरत आहे आणि ही एक खूपच चिंतेची बाब सध्या होऊन बसली आहे. ह्यामुळे लोकांच्या ताणात भरच पडत आहे.


कामाचे ठिकाण, घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळताना बऱ्याचदा एखादी गोष्ट आपल्या हातून राहिली, तर नोकरदार गृहिणींच्या मनात त्याविषयीची  सल बऱ्याच काळापर्यंत राहण्याचे प्रमाण हे वाढू लागले आहे. अशातच हा कसलाही ताण नसून हे रोजचंच आहे, त्याला काय करणार’ असा सरळसोट विचार करून हल्लीची पिढी आपले आयुष्य काढत आहे त्यामुळे ह्या गोष्टींवर तोडगा काढणं आरोग्याच्या दृष्टीनं सध्या खूपच आवश्यक बनत चाललंय.

 

सध्या ट्रॅफिक मधून वाट काढत घरी उशिरा येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे रात्री झोपायला उशीर, त्यामुळे सकाळी उशीरा जाग येणं, पुढचं बिघडणारं वेळापत्रक, पुन्हा सकाळी कामावर जाताना ट्रॅफिक, ऑफिस डेडलाइन्स, मीटिंग प्रेशर, प्रोजेक्ट सबमिशन हाही एकप्रकारचा ताणच आहे हे आता मानसिक संशोधनावरून सिद्ध झाले आहे. पण हे तर रोजचेच आहे असे समजून त्यामध्ये कितीही तारांबळ उडाली, तरी ती जवळ जवळ सगळ्यांकडून चालवून घेतली जाते. तसे पाहायला गेले  तर यामधील अनेक गोष्टी टाळता येणाऱ्या नसल्या, तरी त्या करण्याची पद्धत बदलून जर त्यातून आनंद मिळवत केल्या, तर मनावरील ताण नक्कीच कमी करता येऊ शकतो असं बऱ्याच मानसोपचारतज्ज्ञांचं मत आहे.

खरंतर रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे प्राथमिक टप्प्यातला ताण खरंच अनेकांना समजत नाही आणि ह्याचा संबंध रोजच्या जगण्याशीच जोडला जातो. हल्लीच्या ह्या अशा धावपळीच्या जीवनामुळे अनेकांना पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मधला प्राधान्यक्रम ठरवता येत नाही, आणि मग कालांतराने मनातल्या विचारांची गुंतागुंत अधिकच वाढत जाते आणि मग शेवटी आपण कुणाची मदत घेऊ शकतो का याचा विचार केला जातो.

ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे

चिडचिड, कुरबुरी वाढणं.

संयम सुटणं.

कामात लक्ष न लागणं.

लवकर थकणं.

उत्साह मंदावणं.

या अशा गोष्टी वाढू लागतात बऱ्याचवेळा मनात ऑफिसच्या कामाचे विचार येणं आणि मग त्यावरून घरी होणारी चिडचिड हल्ली वाढू लागली आहे.

ह्या सर्वातून बाहेर पाडण्यासाठी

रात्री हलकंफुलकं तसेच विनोदी वाचन करा. संगीत ऐका, ज्यायोगे कामाचे विचार मनात येणार नाहीत. रात्री लवकर झोपा

ऑफिसमध्ये कामातून थोड्या थोड्या वेळेत ब्रेक घेऊन फेरफटका मारा.

भूक न लांबवता वेळीच जेवण घ्यावे.

रोज कामावर येता-जाता ट्रॅफिक लागणार असेल, तर त्यातही मन कसं प्रसन्न राहील ते तुम्ही जाणीवपूर्वक पाहा.


रोज करत असलेलं काम वेगळ्या पद्धतीनं करून ऑफिसला लिफ्टऐवजी जीना वापरा. तिथलं डेस्क सुंदर वस्तूंनी सजवा. तसेच मुद्दाम नव्या ओळखी करून घ्या, आणि जमल्यास जुन्या मित्रमंडळींना फोन करा.

Regards
https://www.pinterest.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या