मेडिटेशन सोप्पं आणि फायदेशीर

मेडिटेशन सोप्पं आणि फायदेशीर


आपल्या सर्वांना व्यायामाचे फायदे माहीतच आहेत पण अशीही एक गोष्ट आहे ज्याने तुमचे मानसिक आरोग्य खूप चांगले राहते, ते म्हणजे मेडिटेशन कारण नियमित आणि प्रामाणिकपणे केलेल्या मेडिटेशनचे आपल्या दैनंदिन आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतात. तसेच मेडिटेशनमुळे सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढून आपली सर्जनशीलता देखील वाढते आणि आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यास मदत होऊन आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची क्षमता वाढवते.


लक्ष केंद्रित करणे

मेडिटेशनमध्ये तुम्ही तुमचं लक्ष एका विशिष्ट गोष्टीवर काही काळासाठी केंद्रित केल्यामुळे एकाग्रता वाढवण्यास मदत होते. ह्यासाठी तुम्ही एखाद्या निर्जीव वस्तूवर (भिंतीवरचे घड्याळ) किंवा स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता. सुरवातीला अनुभव कमी असल्याने एकाग्र होण्यास वेळ लागेल पण एकदा ह्याची सवय झाली की तुम्ही ह्यात नक्कीच पारंगत व्हाल यात काही शंकाच नाही.


सजगता

जेंव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेंव्हा जो विचार तुमच्या मनात येतो त्यावर लक्ष देता, त्यामुळे तुमच्या मनात येणाऱ्या विचारांना तुम्ही तटस्थपणे पाहता. या अशा प्रकारामुळे तुम्ही भावनिक गुंतवणूक न करता योग्य तो निर्णय घेऊन तुमच्या मनातील वैचारिक गोंधळ अगदी सहजपणे कमी करू शकता.


अलौकिक चिंतन

मेडिटेशन हा प्रकार कोणालाही जमण्यासारखा असून तुम्ही तो अगदी सहज करू शकता. यामध्ये मनात कोणतेही विचार न आणता मन शांत ठेवू शकता आणि ह्यामुळे मनात कोणतेही विचार नसल्याने तुम्ही स्वतःच्या मनाच्या तळाशी पोहोचून मनातून सगळे नकारात्मक विचार घालवून मनाची शुद्धी करू शकता.


Regards

 http://quotesblog.net

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या