नियमित सायकल चालवा, आणि आरोग्य कमवा

नियमित सायकल चालवा, आणि आरोग्य कमवा


तसे पाहायला गेले तर जेंव्हा पण आपण पहिल्यांदा सायकल चालवतो तेंव्हा अनेकवेळा पडून मगच ती शिकतो थोडक्यात काय तर सायकल चालवण्यासाठी सुरवातीला बऱ्यापैकी मेहनत लागते. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सायकलिंग सर्वोत्तम आणि सर्वांत लाभदायी मानलं जातं. चुस्त आणि स्फूर्तीदायक राहण्यासाठी डॉक्टरही दररोज २० मिनिटांपर्यंत सायकलिंग करण्याचे सल्ले देतात ज्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळते. तर आता आपण ह्याच सायकलिंगमुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या फायद्यांवर एक नजर टाकूया.

संशोधनामुळे हे सिद्ध झाले आहे की रोज सायकल चालवल्यामुळे मेंदूत नवीन पॉसिटीव्ह सेल्स तयार होतात जे की मेंदूची शक्ती वाढवण्यास मदत करते ह्यालाच आपण सोप्या भाषेत ब्रेन पॉवर वाढणं असंही म्हणू शकतो. 

सायकलिंगमुळे रक्ताभिसरण चांगलं होऊन हृदय निरोगी राहण्यास मदत होते तसेच हृदयाच्या जवळ पुरेसा रक्तप्रवाह पोहोचण्यासही खूप मदत होते. हृदयरोगींनी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन नियमित सायकलिंग केल्यास त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल आणि ह्यासाठी सायकलिंग करायचं वेळापत्रक डॉक्टरकडून ठरवून घ्यावं. दररोज सायकलिंग केल्याने स्नायूंना मजबुती येऊन संपूर्ण शरीराला या क्रियेमुळे व्यायाम मिळतो तसेच स्नायू मजबुत झाल्यामुळे शरीराची शक्तीदेखील वाढते. म्हणून जर मजबूत शरीर हवे असल्यास दररोज सायकल चालवावी. कुठल्याही रोगावर नियंत्रण अथवा मात करायची असेल तर रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून सायकलिंग केल्याने सर्दी-खोकला यासारखे ऋतुमानाप्रमाणे येणारे आजार दूर राहण्यास खूपच मदत होते. सायकलिंग केल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीत वाढच होते. Regards

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या