नकारात्मक विचारांकडून होकारात्कमक विचारांकडे कसे जाल

नकारात्मक विचारांकडून होकारात्कमक विचारांकडे कसे जाल


आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही क्षणी नाकारले जाण्याच्या शक्यता अनेक असू शकतात आणि ही नकारात्मकता पचवणं तसं कठीण असतं. अशा परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनाने सामोरं जाऊन आनंदी आयुष्य जगणं गरजेचं आहे आणि हे आयुष्याच्या कोणत्याही बाबतीत होऊ शकते म्हणूनच जर तुम्ही आयुष्यात एखाद्या प्रसंगी नाकारले गेले असाल तर, त्यातून स्वत:ला कसं सावराल? ह्याविषयी आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे .........


आपण जेंव्हा लहान असतो तेंव्हा आपल्याला जगाचं काही कळत नाही किंवा व्यवहार ज्ञान नसतं म्हणून आपल्याला अनेक गोष्टींसाठी घरच्यांकडून नकार मिळतो. पुढे मोठे झाल्यावर कॉलेज संपून जेंव्हा नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेल्यावर आपण त्या रिक्त पदासाठी योग्य उमेदवार नसतो म्हणून आपल्याला अनेक ठिकाणी नाकारलं जातं. तसेच तरुण पिढीमध्ये प्रेमाच्या मामल्यातही अगदी असंच असतं. पण मला इथे एक सांगावेसे वाटते की काहीही कारणामुळे नाकारले जाण्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होता कामा नये. आयुष्य जगताना प्रत्येक वळणावर अनेक ठिकाणी नाकारले जाण्याचे प्रसंग अनेकदा उद्भवतात. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही किती सकारात्मक दृष्टीने समोरे जाता, हे खूपच महत्वाचे असते आणि हेच आनंदी आयुष्याचं गमक असतं. तसेच आपण का नाकारले गेलो ह्याचा नीट शांतपणे विचार केला पाहिजे आणि त्यावर तोडगा काढला पाहिजे आणि हे आपल्या स्वतःच्याच अभ्यासून आपल्या नजरेस येऊ शकते आणि हेच आपल्या हातात असतं. एखाद्या गोष्टीसाठी नाकारले जाण्याने आपण दुखावतो आणि हे पचवण्याच्या काही टिप्स मी येथे देत आहे:


सावरण्यासाठी स्वत:ला वेळ द्या

अनेकांना त्यांच्या आयुष्यात शालेय जीवनापासून ते मोठे होई पर्यंत बऱ्याच गोष्टीत नकार मिळाला असेल, पण पूर्वी कदाचित ह्यातून बाहेर पाडण्यासाठी तुम्हाला काही मार्ग सुचले नसतील पण आता ह्या इथून पुढे जर असा प्रसंग आलाच तर त्यातून सावरण्यासाठी स्वत:ला वेळ देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आपल्या कामातून सुट्टी घेऊन विश्रांती घ्या आणि एका जागी शांत बसून आत्मपरीक्षण करा, तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल.


सुसंवाद साधा

हल्लीच्या काळात सोशिअल मीडिया आणि मोबाईलमुळे प्रत्यक्ष भेटून सुसंवाद साधण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसून येत आहे पण जर तुम्हाला नाकारले जाण्याच्या दु:खातून बाहेर पडायचं असेल तर तुमच्या अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधा. तेच तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाण्याची खबरदारी घेतील. सोशल मीडियावर एकदा टाकलेली गोष्ट कोणापासूनही लपून राहत नाही आणि नाकारले जाण्यासारखी गोष्ट ही सार्वजनिक नसून ती आपल्या जवळच्या व्यक्तीकडे बोलून दाखवण्याची गोष्ट आहे तसेच कोणाशीही संवाद साधताना तुमच्या नाकारल्या जाण्याच्या दु:खाचा संदर्भ प्रत्येकवेळी देणं टाळा.


व्यक्तीश: / पर्सनली घेणं टाळा

एखाद्या कारणामुळे नाकारलं जाणं म्हणजे तुमच्यातील काही गोष्टी, कला, गुण ह्यांच्या मध्ये काही कमतरता आहेत समोरच्याला तुमच्याबद्दल सगळंच माहित नसल्याने एक व्यक्ती म्हणून कोणीही तुम्हाला नाकारु शकत नाही. ह्याइथे फक्त ती समोरची व्यक्ती तो प्रसंग किंवा स्थिती नाकारत असते, त्याचा तुम्ही मान आणि भान ठेवायला शिकल पाहिजे.आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवा

एखाद्या नकारात्मक गोष्टींमधून सावरल्यानंतर तुमचं मन कशात तरी रमवणं अत्यंत गरजेचं असते, अशा वेळीस मुबलक विश्रांती घ्या पण विश्रांती घेतल्यानंतर लागलीच कामाला सुरुवात करु नका किंवा ज्या गोष्टीमुळे नाकारले गेलात ती गोष्ट पुन्हा करण्यापूर्वी त्याचा नीट आढावा घेऊन अभ्यास करा त्याचा तुम्हाला नक्कीच भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येईल ह्यात कोणतीच शंका नाही.  Regards

https://www.pinterest.com


Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या