जीवनशैली बदला आणि आरोग्य सुधारा

जीवनशैली बदला आणि आरोग्य सुधारा

सध्याच्या जीवनशैलीमध्ये चिंता, काळजी या गोष्टी जीवनाच्या एक अविभाज्य भाग बनल्या आहेत आणि ह्यात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. पण ह्या सर्वांची मूळ कारणे जर आज आपण शोधायला गेलो तर त्याचे मूळ हे आजच्या काळातल्या लाइफ स्टाइलच्या चुकीच्या सवयी हे दिसून येईल, तर ह्याबद्दल थोडे जाणून घेऊया:

तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असला तरी आज प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा आहे आणि दिवसेंदिवस स्पर्धात्मक जागाला सामोरं जाताना ताण-तणाव अन् इतर मनोविकारही आपल्या जीवनाचा एक भाग बनत चालले आहेत. अति स्पर्धा आणि कामाचा ताण ह्यामुळे कमी वयात नैराश्य येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे ह्यामुळे व्यायाम, योग व ध्यानधारणा करुन तणावमुक्त जीवनशैली जगण्याकडे हल्लीच्या लोकांचा कल हा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो आहे. पण तरीही चिंता, काळजी काही पिच्छा सोडत नाही आणि ‘अभ्यास कसा होईल?’, ‘परीक्षेत चांगले गुण येतील ना?’ अशी लहान मुलांना तर ‘मला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल?’, ‘माझं पुढे करिअर कसं होईल’, अशा नानाविविध चिंतांनी मन व्यापून जाते आणि ह्यामध्ये हल्ली तरुण पिढीची टक्केवारी ही आजकाल खूपच वाढत चालली आहे पण जर तरुणांनी आपल्या सवयींमध्ये काही बदल केल्यास नक्कीच फरक पडू शकतो. तर अशा कोणत्या सवयी आहेत ज्या अशा मानसिक त्रासाचे कारण बनत आहेत ते आता आपण जाणून घेऊयात:


झोपण्याच्या चुकीच्या सवयी


ताण तणावाचे सगळ्यात महत्वाचे कोणते कारण असेल तर ती म्हणजे अपुरी झोप.रात्री-अपरात्री फोनवर चॅटिंग करणं किंवा लॅपटॉपवर चित्रपट बघत बसणं अशा चुकीच्या सवयीनमुळे झोप ही बाब प्राधान्यक्रमावर न येता नको असलेल्या गोष्टींचे महत्व वाढत चाललेले दिसून येत आहे. परिणामी, याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्ही यांसारख्या उपकरणांना स्वत:पासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याची सवय लावली पाहिजे आणि लवकर झोपी गेले पाहिजे.


मोबाइलला ठेवा दूर


कंटाळा घालवण्यासाठी मोबाइलमध्ये म्यासेज अथवा खेळत बसण्यापेक्षा वाचन कारणे, चालणे, मुलांसमवेत वेळ घालवणे अशा गोष्टी करण्यास प्राधान्य द्या. तसंच मोबाइल वापरण्यासाठी काही ठराविक वेळ राखून ठेवून जास्त मोबाइल न वापरण्याचा नियम स्वत:ला घालून घ्या.


कॉफीचं किंवा चहाचे अतिसेवन नको


आजकाल झोप उडवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी कॉफीचं किंवा चहाचे अतिसेवन करणाऱ्यांचं प्रमाण हे जरा जास्तच होत चालले आहे हे एका संशोधनातून समोर आले आहे पण याच कॉफी आणि चहा मधील कॅफेनमुळे पॅनिक अॅटॅक येण्याची शक्यता असून भूकही मंदावते तसंच शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होतं. म्हणूनच दिवसातून एक कपच कॉफी किंवा चहा पिण्याची सवया स्वत:ला लावा.

Regards

 


http://listtoday.org

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या