व्यायामाच्या कंटाळ्याला करा बाय बाय!

व्यायामाच्या कंटाळ्याला करा बाय बाय!


सध्याच्या फास्ट जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांचे त्यांच्या आहाराकडे आणि नियमित व्यायामाकडे दुर्लक्ष्य होत आहे आणि चौरस आहार आणि नित्याचा व्यायाम ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. अगदी फिट राहण्यासाठी, तणाव नियोजन, सुडौल बांधा किंवा वजन कमी करण्यापर्यंत ह्याची एक ना अनेक कारणे आहेत. आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व आणि जीवनशैलीला साजेसा व्यायामप्रकार निवडणं हे आवश्यक आहे तसेच ह्यामध्ये आवड आणि सातत्य राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे.


परंतु बरेच जण हे स्वतःला फिट ठेवण्यासाठी संकल्प तर करतात पण काही दिवसांनी त्यात खंड पडून मग ते त्या वाटेला जातच नाहीत आणि आपला स्वतःचा फिट राहण्यासाठीचा प्रवास अर्धवट सोडून देतात अशांसाठी आज मी व्यायामाचा कंटाळा दूर करून त्यात सातत्य ठेवण्यासाठी काही उपाय सांगणार आहे:

स्वतःच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवा

जीवनात कोणत्याही क्षेत्रामध्ये यशाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट तुम्हाला जास्त उत्तेजित करू शकत नाही मग स्वतःला फिट ठेवणंही त्यामध्ये आलेच, दैनंदिन व्यायाम फक्त श्रमदायक नाही तर खुबीनेही करता आला पाहिजे. अशावेळी तुम्ही तुमच्या व्यायामाचं योग्य वेळापत्रक बनवून सातत्याने स्वतःच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमचा व्यायामाचा उद्देश पूर्ण करता येईल.


अतिरेक टाळा
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच, म्हणूनच कोणतीही चांगली गोष्ट खूप जास्त प्रमाणात करणं टाळून आपले मन व शरीर दोन्ही थकतील आणि अखेरीस त्या गोष्टीचा कंटाळा येईल असे करण्यापासून कटाक्षाने दूर राहा. कुठल्याही प्रकारच्या वर्कआऊट सेशनमध्ये शरीराला थकवा घालवण्यासाठी व पुनर्बांधणीसाठी पुरेसा वेळ हवा असतो, त्यामुळे वर्कआऊट रुटीनमधून आवर्जून  ठराविक सुट्टी घेऊन शरीराला आणि मनाला विश्रांतीसाठी व टवटवीत होण्यासाठी थोडा वेळ द्या, ज्यामुळे आपण अपेक्षेप्रमाणे व्यायाम करण्याइतपत पुन्हा तयार व्हाल.


योग्य आहाराचं सेवन करा
आपल्या शरीरात ताकद ही आपल्या रोजच्या अन्नातून येते आणि जर शरीरात ताकद नसेल तर व्यायामाचा कंटाळा येणे साहजिकच आहे म्हणूनच योग्य आणि संतुलित आहार घेतल्यामुळे शक्ती तर वाढतेच, पण व्यायाम करायलाही उत्साह येतो. म्हणूनच योग्य व्यायामाबरोबरच आपण आपल्या आहाराकडेही तितकेच कटाक्षाने रोजच्यारोज लक्ष हे दिलेच पाहिजे.


मित्रमैत्रिणींसोबत व्यायाम करणे केंव्हाही स्फुर्तीदायकच

तसे पाहायला गेले तर आपण आपल्या समवयस्क व्यक्तींबरोबर पटकन अड्जस्ट होतो त्यामुळे जर तुम्ही तुमच्या जिम मध्ये चांगले मित्रमैत्रिणी जोडले तर व्यायाम करताना उत्तेजन तर मिळेलच पण तुम्हाला सध्याच्या फिटनेसच्या बाबतीत ताज्या बातम्याही कळतील तसेच असे सखेसोबती तुम्हाला व्यायामासाठी प्रोत्साहित करून तुमच्यासोबत व्यायामही करतात.


एकाच प्रकारचा व्यायामप्रकार टाळा
एकाच प्रकारचा व्यायामप्रकार केल्याने काही दिवसांनी कंटाळा येऊ शकतो म्हणून कंटाळा येऊ नये यासाठी व्यायामप्रकार हळूहळू बदलत राहा. वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायामप्रकार केल्याने व्यायाम करायला मजा तर येतेच आणि शरीरातील सर्व स्नायूंना बळकटी येऊन तुम्हाला अपेक्षित आणि उत्तम निकाल मिळतो.


मनशक्ती प्रयोगाचा समावेश
आज संपूर्ण जगभरात योग, प्राणायाम, यांसारखे मन व शरीराचा मेळ घालणारे व्यायामप्रकार हे खूपच लोकप्रिय होऊ लागले आहेत म्हणूनच हे असे प्रकार नित्याच्या ताणतणावातून मुक्ती मिळवण्यासाठी व टवटवीत होण्याचे उत्तम मार्ग आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली ह्यांचा योग्य सराव केल्यास मनाचे खंभीरपण टिकवून आपण सहज तणावाचं नियोजन करू शकाल.


सकारात्मक दृष्टिकोन बाळगा
कुठलीही गोष्ट करताना जर सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर त्या गोष्टींमध्ये १००% यशाची खात्री असते म्हणून जेव्हा तुम्ही सकारात्मक, क्रियाशील, साहसी, मोकळ्या मनाने व आवडीने एखादी गोष्ट करायचं ठरवता तेंव्हा तुम्हाला तुमच्यासारखेच लोक तुमच्या आजूबाजूला सापडतील आणि तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही.Regards


संबंधीत इमेज / चित्र :

https://www.successconsciousness.com  


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या