रविवार, १० डिसेंबर, २०१७

‘लाइफस्टाइल डिसीज’चे वाढते प्रमाण

‘लाइफस्टाइल डिसीज’चे वाढते प्रमाण 


जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले आहे की सध्या तरुण वयातच नैराश्य आणि तणावात गुरफटलेल्यांना ‘लाइफस्टाइल डिसीज’ या आजारांचा विळखा जास्त पडत आहे आणि ह्याचाच आपण आता इथे आढावा घेत आहोत.


आजकालच्या प्रचंड स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे हायपरटेन्शन, मधुमेह यांसारख्या आजारानंतर आता तरुणाईमध्ये ‘लाइफस्टाइल डिसीज’चे प्रमाण हे खूपच वाढू लागले आहे आणि ह्याला आजची बदलती जीवनशैली ही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे. रोज तासंतास मोबाइलमध्येच गुंतून राहणं सकाळी उशिरा किंवा रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठणे, प्रत्यक्ष भेटीपेक्षा सोशल नेटवर्किंगच्या आभासी जगात जास्त रमणं, सतत फोटो वा पोस्टला मिळालेल्या लाइक्स तपासत राहणं, तसेच फास्ट फूड चे अतिरिक्त सेवन ह्या सगळ्यांमुळे ‘लाइफस्टाइल डिसीज’ या आजाराच्या विळख्यात लवकरच प्रवेश होऊ शकतो किंवा तुम्ही अगोदरच ह्या विळख्यात अडकला आहात.

पहिल्या टप्प्यात हा आजार बऱ्याचवेळा त्या व्यक्तीकडून दुर्लक्षिला जातो पण अशा जीवनशैलीच्या निगडित असलेले आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच ओळखण्याचा सल्ला सध्या तज्ज्ञ देत आहेत. सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य जपणं कठीण होत आहे आणि अशामुळेच सध्या अनेक आजार बळावत आहेत. सध्याच्या गॅजेट दुनियेत जास्त प्रमाणात व्यग्र राहिल्याने रोजच्या जगण्यातला संवाद हरवण्यासह एकटं पडणं आणि तणाव तसंच नैराश्यानं मनाचा ताबा घेणं, असे परिणाम सध्या बऱ्याच लोकांमध्ये दिसून येत आहेत. यातून स्वतःची सुटका करायची असेल, तर ही लक्षणं वेळीच ओळखून जाणीवपूर्वक वाचन, ट्रेकिंग, मॉर्निंग वॉक, योग्य आहार आणि योगासनं / व्यायाम करून या आजारांपासून मुक्ती मिळवणं सहज शक्य आहे.

 

Regards

 संबंधीत इमेज / चित्र :

http://www.aikyalink.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...