शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

वजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ

वजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ


तसे पाहायला गेले तर आज बऱ्याच लोकांना वजन वाढीच्या समस्या आहेत तसेच असेही कांही लोक आहेत जे सकाळचा नाश्ता न करताच त्यांच्या कामावर निघून जात आहेत तर मला इथे एक सांगावेसे वाटते की तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर भविष्यात तुमचे वजन वाढू शकते. ह्या गोष्टीवर जरा विश्वास ठेवणे कठीण असले तरी हे खरे आहे. सकाळचा नाश्ता न करणे म्हणजे लठ्ठपणाला सरळसरळ निमंत्रण देण्यासारखेच आहे. कारण रात्री जेवल्यानंतर साधारण १२ तास आपल्या पोटात कुठलाच अन्नाचा कण जात नाही आणि सकाळी उठल्यावर शरीराची आंतरिक मागणी ही पौष्टिक आहाराची असते म्हणून सकाळचा नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर नाश्ता करण्याची सवय लावा आणि ती सुद्धा पौष्टिक आणि संतुलित. वजन कमी करायचे किंवा नियंत्रणात ठेवायचे असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ जरुर खा:
चपाती - गव्हाच्या पीठासोबत सोयाबीन, रागी ही धान्ये मिसळलेल्या पिठाच्या चपात्या दह्याबरोबर किंवा तुमच्या आवडत्या भाजी बरोबर खाल्याने शरीरास चांगले प्रोटीन लाभेल जेणेकरून जास्त काळ भूक न लागता अतिरिक्त खाण्यापासून आपण दूर राहू शकतो. 
अंडी - "संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे", अंड्यामध्ये प्रोटीनसह व्हिटामिन ए, बी आणि ई यांचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उकडलेली अंडी खाल्ल्याने फायदा होतो. तसेच तुम्ही अंड्याचे ऑम्लेटही कमीत कमी तेलाचा वापर करून खाऊ शकता.
ओट्स - ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने बराच वेळ भूक लागत नाही, आणि अतिरिक्त खाण्यापासूनही आपण दूर राहू शकता.

ब्रेड सँडविचनाश्त्यामध्ये ब्रेड सँडविच खाणे शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरते कारण तुम्ही यासाठी विविध भाज्यांचा किंवा पनीर स्लाईजचाही वापर करु शकता. भाज्या आणि पनीरपासून बनवलेल्या सँडविचमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात जसे की फायबर, व्हिटामिन ई आणि बी, आयर्न, मॅग्नेशियम ज्यामुळे आपल्या शरीराला बराच काळ भूक न लागता आपण अतिरिक्त खाण्यापासून दूर राहू शकतो. ह्यात बिट, काकडी, टोमॅटोचा आवर्जून समावेश करावा.
Regardsसंबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे ...