ऑफिसमधल्या वातावरणानं वाढतंय तुमचं वजन? - पहा ही 6 कारणं.

ऑफिसमधल्या वातावरणानं वाढतंय तुमचं वजन? - पहा ही 6 कारणं.


आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता मी जो सांगणार आहे तो अनुभव नक्कीच आला असेल आणि तो म्हणजे "काय साहेब तब्येत एकदम सुधारली आहे, नोकरी मानवलेली दिसते." पण खरं कारण आपल्यालाच माहित असते पोटाचा घेर तासंतास एकाच जागी बसून वाढत जातोय त्यामुळे वजनही वाढतंय, अॅसिडीटीने तर पिच्छा पुरवलाय व्यायाम तर कित्येक कोस दूरच राहिलाय साधे चालणे सुद्धा होत नाही. पण हे केवळ  बैठय़ा कामानं नव्हे तर ऑफिसच्या वातावरणानेही होत आहे कारण ते काही आपल्याला बदलता येत नाही तरी सुद्धा आपण त्या वातावरणात स्वतःकडे नक्कीच लक्ष देऊ शकतो कारण दिवसातला साधारण ७०% वेळ आपण कामाच्या ठिकाणी असतो.  
) सध्याच्या ऑफिस कल्चर मध्ये तासंतास बसून काम असल्यामुळे बऱ्याचवेळा प्रत्येकजण काही ठराविक वेळाने, काही ना काही खाण्यापिण्याच्या ऑर्डर ह्या जागेवरच मागवतो आणि ह्यात आपण किती खातोय याचं अनेकांना भानच उरत नाही आणि ह्याचा थेट परिणाम, वजन वाढतंच जाण्यात होत आहे.

) तसे पहायला गेले तर आज बरेच जण हे हेल्थ कॉन्शस झालेले आहेत त्यामुळे घरून डबा आणणे किंवा मग घरगुती डबा पैसे देऊन मागावण्याचे प्रमाण वाढले असले तरी संध्याकाळी चार ते सहा या वेळेत भूक लागते आणि ह्या वेळेस काहीतरी खावंसं वाटते मग भेळ, वडे, असं काहीबाही खाल्ले जाते, तर हे टाळता येईल का? ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष्य दिले पाहिजे.

) वैज्ञानिकांच्या संशोधनातून असे सिद्ध झालेय की जर आपल्या कामाच्या ठिकाणी अंधारं वातावरण, डीमलाइट असेल, सूर्यप्रकाशच येत नसेल तर या वातावरणात सतत काही ना काही खावंसं, प्यावंसं वाटतं. ह्यात मुख्य मुद्दा हा सूर्यप्रकाशाचा आहे कारण आज सर्वच ऑफिसमध्ये वातानुकूलित ( Air Condition ) यंत्रणा असते त्यामुळे सूर्यप्रकाश येण्याचा संबंधच येत नाही त्यामुळे अशा वातावरणात आपल्या खाण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला हवं आणि वेळ मिळेल तसं प्रकाशात चक्कर मारुन यायला हवी.

ज्यांच्या कामाच्या वेळा, शिफ्ट, जेवणाच्या वेळा सतत बदलतात त्यांचं वजन झपाटय़ानं वाढण्याची जास्त शक्यता असते.

) कामाचा  स्ट्रेस आला तरी अनेकजण काम करताना वेफर्स , बिस्टिकं, चिप्स, खारे शेंगदाणे, शेव खातात आणि अशा खाण्याने कालांतराने वजन वाढू लागतं.

) टार्गेट कम्प्लिट करण्याच्या दबावाखाली अनेकजण उशिरा किंवा काम करता करता जेवतात, खातात, आणि आपण किती खातोय याकडे त्यांचं लक्षच नसतं आणि अशामुळे  वजन वाढतच जातं आणि अनेक लाइफस्टाइलशी निगडित आजारही मग मागे लागतात.


जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO – World Health Organisation) एका अहवालानुसार जगात ७०% आजाराच्या केसेस ह्या लाइफस्टाइलशी निगडित आढळून येत आहेत. तर मग वेळीच सावधगिरी बाळगा आणि चांगल्या सवयीची सुरवात करा.
Regards

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या