रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

रागाला औषध काय?

रागाला औषध काय?


जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला कधी रागच आला नाही, ते व्यक्त करण्याचे प्रकार प्रत्येकाचे वेगळे आहेत. एक ह्यात अशी पद्धत आहे की त्या व्यक्तीला वाटते की आपली या जगात काहीच किंमत नाही आणि ती पटवून देण्यासाठी असे लोक कायम प्रत्येकाशी वाद घालताना आढळून येतात. एक दुसरा प्रकार आहे ज्यात असे लोक आहेत जे रागाच्या भरात इतरांना शारीरिक इजा पोहोचवण्याचं काम करतात आणि दुर्दैवाने ह्याचे प्रमाण हल्ली खूपच वाढू लागले आहे आणि ही एक खरोखरच चिंतेची बाब आहे. असेही काही लोक आहेत ज्यांना असे वाटते की प्रत्येक कारणासाठी आपणच  दोषी आहोत म्ह्णून त्या दबावाखाली असे लोक रागराग करून , विक्षिप्त वागतात. कधी कधी तर काही लोकांचा राग इतका अनावर होतो की  ते स्वत:ला शारीरिक इजा पोहोचवतात. तर काहींना आपण एकटेच आहोत असे वाटत राहते आणि त्यांना आपलं कोणी नसल्याचं सारखं वाटत असतं. ह्या अशा विविध प्रकारे लोक राग व्यक्त करत असतात त्यामुळे अशा लोकांकडून काही नकारात्मक पाऊल उचलण्याचीही शक्यता असते. म्हणूनच अशा लोकांबरोबर प्रेमाने, आपुलकीने वागलं पाहिजे व त्यांना रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

परंतु रागावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे आणि त्यासाठी मी इथे काही टिप्स देत आहे:

१. जमेल तेव्हा किंवा फावल्या वेळात तुमचे छंद झोपासा आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि हा काही शेवट नाही असे सारखे मनाला सांगा आणि खचून न जाता नव्या जोमाने पुढे जा.

२. जिथे खरंच तुमची चूक असेल तर क्षमा मागा, पण प्रत्येक गोष्टीसाठी क्षमा मागण्यापेक्षा तुमची चूक नाही हे इतरांना पटवून द्या. तसेच भूतकाळात केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत ह्याची जाणीवपूर्वक पुरेपूर काळजी घ्या.

३. तुम्ही आतापर्यंत काय चुका केल्या आणि किती बरोबर वागलात याची नोंद ठेवा अर्थातच एक डायरी बनवा जेणेकरून तुम्हालाच तुमचे वागणे सुधारलेले दिसून येईल तसेच एक कायम लक्षात ठेवा तुमची स्पर्धा ही दुसऱ्यांशी नसून स्वत:शीच आहे ह्याची कायंम जाणीव असू द्या.

४. तुम्ही किती चांगले आहात, हे इतरांना पटवून देण्यापेक्षा ते स्वत:च्या मनावर ठामपणे बिंबवा दुसऱ्यांना ते आपोआपच कळेल.

 

Regards 


https://www.google.co.in

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

मन करा रे प्रसन्न!

मन करा रे प्रसन्न!

आज आपण जी काही ध्येय गाठण्यासाठी सगळी धडपड करत आहोत ती करताना आपल्याला अनेक प्रसंग असे उद्भवतात ज्याने नकारात्मक विचार आपल्या मनात डोकवतात. मात्र आता या सगळ्या नकारात्मक गोष्टींना तुम्ही सहज बाय-बाय करु शकता.

व्यक्ती कोणीही असो लहान असो व मोठा, श्रीमंत असो व गरीब, प्रत्येकाचे आयुष्य हे यश-अपयश, सुख-दु: ख, सकारात्मकता-नकारात्मकता या सगळ्या गोष्टींचं मिळून बनलेलंच आहे. जीवनात सगळंच आपल्या मनासारखं घडलं तर प्रत्येकालाच आनंद होतो पण यश मिळवायचं असेल तर मेहनत ही घ्यावीच लागते ह्यामध्ये कधी मनासारखं, अपेक्षित यश मिळतं तर कधी आपली मेहनत कमी पडते. आपले ध्येय गाठण्यासाठी ही सगळी धडपड करत असताना अनेक प्रसंग असे उद्भवतात ज्याने नकारात्मक विचार आपल्या मनात डोकवतात आणि ह्याला जगातली कुठलीच व्यक्ती अपवाद नाही हे तर सगळ्यांच्या बाबतीत होते. मात्र ह्या नकारात्मक गोष्टीवर काही थोड्याच लोकांना विजय मिळवता येतो तर बरेच जण अपयशी होतात पण आता मात्र  सगळ्या नकारात्मक गोष्टींना तुम्ही  बाय-बाय करू शकता.

आपल्या आयुष्यात आता नव्याने एक सकारात्मक सुरुवात कशी कराल याच्या काही टिप्स खास माझ्या वाचकांसाठी मी येथे घेऊन आलो आहे –


ध्यानधारणा किंवा योग करा

सध्या जागतिक पातळीवर सर्वच ठिकाणी आपल्या भारतीय योग अभ्यासाचे महत्व प्रचंड वाढलेले आहे, त्यामुळे मनाला ताण देणाऱ्या गोष्टीपासून दूर जायचं असेल तर योग आणि ध्यानधारणा हा त्याच्यावरचा उत्तम पर्याय आहे ज्याने मानसिक तसंच शारीरिक आराम मिळण्यास खूपच मदत होते.

भरपूर हसा.
खळखळून, मनमुराद शेवटचं कधी हसलात हे तुम्हाला आठवतं का? सध्याच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या आयुष्यात बरेच जण हसण्याचेच विसरले आहे आणि हसण्याने ताण हलका होऊन आयुष्यही वाढतं हे तर सर्वच जाणतात, त्यामुळे मनमुराद हसा ह्यासाठी कॅमेडी सीरिअल पहा किंवा लाफ्टर क्लबला जॉईन व्हा.


सकारात्मक लोकांच्या सान्निध्यात
जेव्हा नकारात्मक विचार मनात डोकवायला लागतील तेव्हा सकारात्मक लोकांच्या सान्निध्यात वेळ घालवा किंवा वेळ काढून मोटिवेशनल प्रोग्रॅमला जा, जेणकरुन तुम्ही नकारात्मक विचारांच्या विळख्यातून बाहेर पडाल.

सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करा.
तसं पाहायला गेलं तर हे वर वर कठीण वाटते पण सरावाने हे नक्कीच शक्य आहे, एकदा का नकारात्मक विचारांनी आपल्या मनात घर केलं आणि आपण त्याच विचारात राहिलो तर आयुष्याची आर्धी लढाई आपण तिथंच हारतो. त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक विचारसरणीचा जाणीवपूर्वन अवलंब करा.


बळी पडू नका.
स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या कारण तुम्हीच तुमचं आयुष्य घडवता. कोणत्याही नकारात्मक विचारांना बळी पडू नका.


इतरांना मदत करा.
आजकाल पाहायला गेलं तर बरेच जण फक्त स्वतःचा विचार करताना दिसतात, माझं कसं चांगलं होईल ह्यावर जास्त लक्ष असतं म्हणूनच केवळ स्वत:बद्दल विचार करणं सोडा आणि थोडं इतरांसाठी देखील  जगा. इतरांना मदत करून समाजोपयोगी कार्य करा कारण इतरांसाठी काही केल्याचा आनंद तुम्हाला खूप काही शिकवून जाईल.


पुढे चला
व्यक्ती कोणीही असो कोणीच सगळ्या बाबतीत परफेक्ट नसतो हे आधी लक्षात घ्या. स्वत:च्या चुकांमधून काहीतरी शिका , तीच चूक पुन्हा न करता पुढे चला, यश तुमचेच असेल.


गाणं म्हणा
तुमचा आवाज कसाही असो पण गाणं म्हणण्याने ताण हलका होतो, हे खरं आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल तेव्हा गाणं म्हणा ह्याने नक्कीच बरे वाटेल अगदीच नाही तर आवडती गाणी ऐका.

स्वत:चं कौतुक करा
तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात गाठलेल्या सर्व ध्येयांची यादी करून त्यासाठी स्वत:चं वेळोवेळी कौतुक करा, कारण आपली स्पर्धा ही इतर कोणाबरोबर नसून आपल्याशीच आहे हे कायम लक्षात असुद्या.


सुविचार वाचा.
सकारात्मक विचार आणि यशस्वी व्यक्तींचे अनुभव सतत वाचत राहा. यातून तुम्ही खूप काही शिकाल.Regards

 http://slideplayer.com

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

वाढता वाढता वाढे!!!

वाढता वाढता वाढे!!!


सध्या पाहायला गेले तर बरेच जण हे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत आहेत.पोटाची चरबी कमी करण्यावर त्यांचा जास्त भर आहे. मात्र, काही दिवसांनी इतर शरीराचं वजन कमी होत असल्याचं दिसून येते पण पोटाचा घेर तितकाच राहतो आहे. जीम ट्रेनर सांगतात, की केवळ एका भागाचा वेटलॉस होत नाही. फुल बॉडी वेट लॉसला महत्त्व आहे. असं का?  मग अशातच लोकांना हात-पाय बारीक दिसतील आणि पोटाचा घेर तसाच राहाण्याची भीती वाटते. यावर मी तुम्हाला सोप्या भाषेत मार्गदर्शन करणार आहे.

 

सध्याच्या आधुनिक जीवनशैली मुळे अनेकांचा पोटाचा घेर वाढताना दिसून येत आहे, स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही हा प्रकार होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे. पोटावर जमलेली चरबी हटवणं अवघड आहे; पण अशक्य नक्कीच नाही. म्हणूनच योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि सबुरी / संयम ह्यांचे योग्य पालन हे करायलाच हवे कारण पोटावर जमलेली चरबी ही मधुमेह, हृदय, स्मृतीभ्रंश, रक्तदाब अशा भविष्यकाळात होऊ शकणाऱ्या अनेक आजारांची निर्मिती असते.

 

तुमचा पोटाचा घेर बाकी शरीराच्या मानानं जास्त आहे म्हणूनच तुम्ही खालील व्यायाम पद्धती आणि आहार यांची सांगड घालणं आवश्यक आहे.

व्यायामप्रकार

१.जगातला सगळ्यात सोप्पा व्यायाम म्हणजे नियमित आणि 

जमेल तस जलद चालणं किंवा

२.टेकडी चढणं

३.पोहणं, सायकल चालवणं

ह्या पाकी कुठलाही व्यायामप्रकार किमान ४० मिनिटं प्रतीदिवस असं आठवड्यातून किमान पाच दिवसतरी करा.


स्थिर व्यायामप्रकार


खाली दिलेले व्यायामप्रकार हे योग्य मार्गदर्शखालीच करावेत

१.योगासनं, पवनमुक्तासन, धनुरासन, भुजंगासन

२.सूर्यनमस्कार, किमान बारा

३.पुशअप्स


वर दिलेले व्यायाम एकाच दिवशी विभागून करा आणि सावकाश करा. श्वासावर लक्ष असू द्या. व्यायामाचा अवधी हळूहळू वाढवा. वारंवार किंवा रोज पोटाचा घेर मोजण्यापेक्षा १५ दिवसांतून एकदा मोजा.

आहारामध्ये खालील टाळा


१.  गोड पदार्थ


२. मैद्याचे पदार्थ


३. सॉफ्टड्रिंक


४. जंक फूड


५. प्रक्रिया केलेले पदार्थ


आपल्या रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या, कोशिंबीर, उसळी, साय काढलेलं दूध, फुलका किंवा भाकरी यांचा आवर्जून समावेश करा. एकदम भरपूर जेवण्यापेक्षा आहार दिवसातून चारवेळा विभागून घ्या. रात्रीचे जेवण कमी करा शक्यतो पचायला जड असलेले पदार्थ खाणे टाळा, रात्रीचं जेवण आणि झोपायची वेळ यामध्ये किमान दोन तासांचं अंतर असावं म्हणून लवकर जेवणाची सवय लावा. रात्री किमान सात तास झोप मिळणं आवश्यक आहे कारण अपुरी झोप वजन वाढायला तसेच मानसिक आरोग्य बिघडायला कारणीभूत ठरते.

 

खालील गोष्टींपासून सावध राहा.


१.थोड्या कालावधीत भरमसाठ वजन कमी करणाऱ्यांना जाहिरातींबद्दल नीट माहिती काढूनच मग योग्य तो निर्णय घ्या, जमल्यास अशा जाहिरातींकडे दुर्लक्ष करा.

२. वजन कमी करणाचे कोणतेही शॉर्टकट नसून आहार नियंत्रण आणि व्यायाम हा अंतिम आणि शाश्वत उपाय आहे हे लक्षात घ्या

३. व्यायाम, आहार आणि औषधानं अपेक्षित परिणाम न मिळाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. एक लक्षात घ्या, की  सुखवस्तू जीवनशैली बदलल्यास म्हणजेच जागच्या जागी काम करणे टाळल्यास पोटावरील चरबीला कायमचं कमी करता येतं.

Regards

 

https://truweight.in

गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

जीवनशैलीत योग्य बदल करा!!!

जीवनशैलीत योग्य बदल करा!!!


सध्या डॉक्टरांच्या अहवालानुसार जर पहिले तर आज बऱ्याच लोकांना उच्च रक्तदाब आणि त्याचं प्रमाण वाढणं हे दोन्ही आजार प्रकर्षाने दिसून येत आहेत परंतु तसे पाहायला गेले तर हे दोन्ही आजार नसून, चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार तसंच मानसिक ताणतणाव यांच्या परिपाकामुळे निर्माण झालेली शरीरप्रवृत्ती आहे. अशा व्यक्तींना इतर निरोगी व्यक्तींपेक्षा कित्येक पटीनं जास्त आजार असण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवणं आत्यंतिक गरजेचं आहे.

आपल्या वयानुसार आपला रक्तदाब हा नेहमीच नियंत्रणात असणं हे गरजेचंच आहे जर आपण रक्तदाबाची औषधं घेताय म्हणजे रक्तदाब स्थिर आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर, हे असे घडण्यापूर्वी रक्तदाब नियमितपणे फॅमिली डॉक्टरकडून किंवा डिजिटल अॅटॉमॅटिक मशीन विकत आणून घरच्या घरी तपासणं हे जास्त गरजेचं आहे.


रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी...

जर आपले वजन जास्त असेल तर कमी करण्यावर कटाक्षाने भर द्या

तुमच्या प्रकृतीला झेपेल असा कोणताही व्यायाम करा.

अगदीच नाही तर रोज सकाळी लवकर उठून चालायला जा.

तुमचा स्टॅमिना वाढल्यावर जलद चालणं, सायकलिंग, पोहणं, सूर्यनमस्कार हे व्यायाम नियमितपणे सुरूच ठेवा.

रात्रीची साधारण ७ ते ८ तास झोप घ्या. तसेच झोपण्यापूर्वी किमान ५ मिनिटे तरी मेडिटेशन करा आणि दिवसभर घडलेल्या घटनांचा तसेच कामाचा मनातल्या मनात आढावा घ्या. ह्या प्रक्रियेलाच सेल्फ टॉकिंग असे म्हणतात त्यामुळे रक्तदाबाला कारणीभूत असलेल्या मनावर तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवायला जमेल.


Regards


 

 

http://www.bostonmagazine.com

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

दर्जेदार आयुष्य जगा!

दर्जेदार आयुष्य जगा!


तसं पाहायला गेले तर गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकालाच दर्जेदार आयुष्य जगावेसे वाटते आणि प्रत्येकजण त्यासाठी झटत देखील असतो, येणारा प्रत्येक दिवस हा चांगल्या प्रकारे घालवून त्याला बाय बाय करावा आणि येणाऱ्या नव्या दिवसाचे आनंदाने स्वागत करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. आपण प्रत्येक वेळेस काही ना काही संकल्प करतच असतो आणि ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्नही  करतो. माझे प्रत्येकाला हेच सांगणे असते की तुम्ही सर्वप्रथम आरोग्याच्या दृष्टीने नवीन काही ध्येय ठरवा. अगदी लहानसहान गोष्टीपासून सुरुवात करा.

कुटुंब, रिलेशनशिप, करिअर, आरोग्य आणि वैयक्तिक विकास यापैकी कोणत्याही एका गोष्टीबाबत ध्येय निश्चित करून ते कागदावर लिहून काढा आणि ते तुम्हाला सतत दिसेल अशा ठिकाणी ठेवून ते गाठण्यासाठी स्वत:ला पुरेसा वेळ द्या.

मग दुसऱ्या ध्येयाकडे वळा आणि असे करत करत प्रत्येक ध्येय पुन्हा करा. दर्जेदार आयुष्य जगण्यास प्राधान्य द्या तसेच तुम्ही जसं आहात तसंच  स्वत:ला स्वीकारा आणि पुढे चालत राहा.

एखाद्याला त्यांच्या दिसण्यावरुन किंवा पेहरावावरुन ओळखू नका.

सर्वप्रथम खाण्याच्या सवयी बदला आणि स्वत:च्या चुकांमधून काहीतरी शिका, नेहमी आत्मपरीक्षण करा आणि ध्यान-धारणा करा.

इतरांशी स्पर्धा करणं टाळून तुमची स्पर्धा हि स्वतःशीच आहे हे नेहमीच ध्यानात ठेवा.

आयुष्य आनंदाने जगा आणि अध्यात्माला आयुष्यात स्थान द्या, त्यासाठी व्यायाम, योग आणि मुबलक झोप घ्या.


Regards

 
http://streamafrica.com

मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे??

मानसिक स्वास्थ्य कसे हाताळावे??

आज जर आपल्याला चांगले आयुष्य हवे असेल तर आपल्याला व्यायाम, डाएट या सगळ्याचं काटेकोरपणे पालन हे केलंच पाहिजे पण मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य त्याचं नियंत्रण कसे करायचे? हा प्रश्न बहुतांश जणांना भेडसावतोय, तर मानसिक स्वास्थ्य कसं सुधारावं याविषयी काही टिप्स.

सध्या बरेच लोक आपल्या फिटनेसवर भर देताना आढळून येतात विशेष म्हणजे आजची तरुण पिढी ह्यात आघाडीवर आहे, एकंदरच अनेकजण शारीरिक स्वास्थ्याबद्दल अधिक जागरूक झालेत. पण मानसिक स्वास्थ्याचं काय? हा प्रश्न अनेकांना सध्या भेडसावतच आहे. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धातत्मक युगात आपापल्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण झटत आहे पण त्याबरोबरच वाढत्या ताण-तणावामुळे नैराशासारख्या मानसिक आजाराला अनेकजण बळी पडत आहेत.

दिवसागणिक शारीरिक आरोग्य सुधारण्यावर भर देताना मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. उत्तम शिक्षण, करिअर आणि दर्जेदार जीवनशैली बरोबरच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.

मानसिक आरोग्य कसं सुधारावं याची माहिती आपण आज जाणून घेऊया.


मला ते जमणार नाही’ किंवा ‘मला हे काम येतच नाही’ असे जर विचार तुम्ही मनात आणले तर तुमच्यात पराभवाची भावना अधिक दृढ होईल म्हणून असे विचार करून स्वतःच्या मनाचं असं खच्चीकरण कधीच करु नका. स्वतःच्या प्रबळ बाजू शोधून काढा आणि आत्मपरीक्षण करा कारण हे नेहमीच लक्षात ठेवा की आतापर्यंत तुम्ही स्वबळावर जे काही मिळवलं आहे ते तुमच्यामध्ये असलेल्या काही खास गुणांमुळे किंवा कौशल्यांमुळेच.

आपल्या आजूबाजूला असलेल्या काही मंडळींना आपले विचार, आपली काम करण्याची पद्धत काहीवेळा  आवडत नाही. म्हणूनच अशा लोकांची मर्जी राखणं किंवा त्यांना काय आवडतं हे पाहण्यापेक्षा तुम्ही स्वमूल्य जपत, आपल्या मनाला पटेल त्या पद्धतीने काम करावं.

प्रत्येक काम परफेक्टच व्हावे अशी नेहमीच स्वत:कडून अपेक्षा ठेवू नका कारण स्वत:वरच स्वत:च्या अपेक्षांचं ओझं लादणं हे अयोग्य असून तुमच्या मनाला थोडं स्वातंत्र्य देऊन तुमच्या स्वत:च्या अशा शैलीत यशाच्या दिशेने कूच करा.

कुठल्याही अडचणी फार क्षणिक असतात आणि त्यावर तुम्ही नक्कीच मात कराल असा आत्मविश्वास स्वत:च्या मनाला द्या आणि कुठलीही अडचण ही तुम्हाला नेहमीच काहीतरी शिकवून जाते ह्यावर ठाम विश्वास असू द्या.

बरेच जण हे आपला बराचसा वेळ हा इतरांना दोष देण्यात वाया घालवतात पण इथे एक गोष्ट लक्षत घ्या की दुसऱ्याला दोष दिल्याने तुमच्या परिस्थितीत काही बदल होणार नाही तर उलट त्याचा त्रास तुम्हालाच होईल म्हणून स्वत:च्या वागणुकीत सकारात्मक बदल करा.

 

Regards

 
http://www.empowher.com

सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

अॅसिडिटी टाळण्यासाठी काय कराल

अॅसिडिटी टाळण्यासाठी काय कराल 


तसे पाहायला गेले तर तज्ञांच्या मते, अॅसिडिटी हा कोणताही आजार नसून आजच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला तात्पुरता शारीरिक बदल आहे आणि ह्याचे मूळ कारण म्हणजे आपल्या रुटीनमध्ये आणि खासकरूनभोजनामध्ये झालेले बदल हे अॅसिडिटीचा त्रास वाढण्यास कारणीभूत आहेत पण ह्यात जर आपण बदल केला तर नक्कीच अॅसिडिटीचा त्रास टाळता येऊ शकतो.

अॅसिडिटीची मुख्य कारणे
छातीमध्ये जळजळ होऊन वेदना होणे .
अन्नाचं पचन योग्य प्रकारे झाल्यामुळे जीव घाबरल्यासारखा होणे .
घशात जळजळ होऊन आंबट ढेकर येणं.

अॅसिडिटी कशी टाळावी
आपल्या जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळा.
आजकाल कामाच्या दडपणामुळे अनेक लोक उशिरा जेवतात किंवा पटपट जेवतात त्यामुळे अर्थातच पचनक्रियेवर परिणाम होतो.
जेवढी भूक असेल तेवढेच किंवा त्यापेक्षा थोडं कमी अन्न खा.
तिखट, मसालेदार आणि जास्त तेल असलेल्या पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहा किंवा प्रमाणातच खा.
भोजनानंतर लगेचच आराम करता साधारण ३० मिनिटांनी थोडा वेळ तरी इकडेतिकडे फिरा.
रोज किमान आठ ते दहा ग्लास म्हणजे साधारण लिटर तरी पाणी प्या.

अॅसिडिटीची बेसिक कारणे
तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणाऱ्या तसंच अधिक प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना अॅसिडिटीचा सर्वाधिक त्रास होतो.
अधिक काळपर्यंत तणावात राहिल्यामुळे आणि बराच वेळ भुकेलं राहिल्यामुळे.
अधिक प्रमाणात फास्ट फुडचे सेवन केल्यामुळे.


अॅसिडिटीवर उपाय काय

आवळाः अॅसिडिटीवर आवळा खूपच गुणकारी आहे. अॅसिडिटीचा अधिक त्रास झाल्यास दोन चमचे आवळा पावडर आणि दोन चमचे साखर एकत्र करून ती पाण्यात मिसळून प्या. ही पावडर कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये सहज उपलब्ध आहे.

दहीः आपल्या रोजच्या आहारात द‌ही असू द्या तसेच दह्याची कोशिंबीरसुद्धा अॅसिडिटीवर परिणामकारक ठरते.

पाणीः कुठलाही ऋतू असो किंवा तुम्ही कुठेही असाल तरी दररोज भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे केवळ पचनालाच मदत होते असं नाही, तर शरीरातील विषारी द्रव्यंसुद्धा बाहेर पडतात.


हिरव्या भाज्याः हिरव्या भाज्या आणि मोड आलेली कडधान्यं खा. यात असलेल्या व्हिटॅमिन बी आणिव्हिटॅमिन ई मुळे अॅसिडिटी शरीराबाहेर काढण्यास मदत होते. Regards


 


 
 

http://accuhealth.in

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

मुलांनो टेन्शनला करा दूर

मुलांनो टेन्शनला करा दूर 

हल्लीच्या मुलांना परीक्षा म्हटलं की, पोटात गोळा येणं, हात-पाय थरथरणं, झोप न लागणं अशी सगळी टेन्शनची लक्षणं दिसू लागतात आणि याचे मूळ कारण हे आजची बदललेली जीवनशैली आहे पण या टेन्शनला आपण सहज दूर करो शकतो आणि ह्यासाठीच मी इथे तुम्हाला काही टिप्स देणार आहे ज्याने तुमचे टेन्शन नक्कीच दूर होईल. सध्याच्या स्पर्धात्मक आणि अभ्यासपूर्ण वातावरणात शाळा आणि कॉलेजांमध्ये परीक्षांचं टेन्शन हे येतंच त्यामुळे हृदयाचे ठोके वाढणं, पोटात गोळा येणं, झोप न लागणं, भूक न लागणं किंवा प्रमाणापेक्षा जास्त खाणं यासारखी लक्षणं दिसून येतात.

ज्याप्रमाणे तुमचे शिक्षक परीक्षेचं वेळापत्रक बनवून सांगतात त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करून रोज शाळेत काय शिकवलं त्याची घरी आल्यावर उजळणी करण्याची सवय स्वत:ला लावा. शाळेतून किंवा शिकवणीतून तुम्हाला जे काही नोट्स मिळतात त्यांचा व्यवस्थित संग्रह करा आणि रोज त्या नजरेखालून घाला.

अभ्यासाचं वेळापत्रक बनवा

परीक्षेच्या आदल्या रात्री जागून अभ्यास तुमच्या आरोग्यासाठी अयोग्य ठरू शकते त्यापेक्षा यापेक्षा दररोज वेळेचं व्यवस्थित नियोजन करुन अभ्यास करण्यावर भर द्या आणि साधारण ५० मिनिटे अभ्यास आणि त्यानंतर १० मिनिटांचं ब्रेक असं तुमचं अभ्यासाचं वेळापत्रक बनवून ब्रेकमध्ये पौष्टिक खा, थोडावेळ टिव्ही बघा किंवा एक फेरफटका मारुन या. प्रत्येक विषय नीट समजून पाठांतरापेक्षा त्यामधील संकल्पना समजून घेऊन अभ्यास करा. अभ्यासासाठी जिथे कमी आवाज आणि तुमचं लक्ष विचलित होणार नाही अशी जागा निवडा.


तब्येत सांभाळा

हल्लीची मुले ही मैदानी खेळ कमी आणि कॉम्पुटर आणि मोबाइल वर जास्त वेळ घालवताना दिसतात, ह्या गोष्टी टाळून जर थोडा व्यायाम आणि पौष्टिक अन्नाचं सेवन केले तर एकाग्रता वाढून चांगला अभ्यास होतो, हे काही सर्वेक्षणाद्वारे सिद्ध झालं आहे. टेन्शन किंवा एखाद्या गोष्टीचा ताण असला की काहीतरी चटपटीत खाण्यापेक्षा पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्या आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे पुरेशी झोपही काढा.


नेहमी उजळणी करा

कंटाळा टाळण्यासाठी मित्र-मैत्रिणींबरोबर सातत्याने अभ्यासाची उजळणी करा म्हणजे परीक्षेच्या वेळेस दडपण कमी होईल.

सकारात्मक विचार करा.

ह्यामध्ये आईवडिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असून जर ते मानसिक दृष्ट्या स्टेबल / प्रबळ  असतील तर ते आपल्या मुलांना सकारात्मक विचार देऊ शकतील कारण टेन्शनमुळे तुमच्या मुलांच्या मनात जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतील तेव्हा सकारात्मक विचार करण्यास पालकांनी नेहमीच त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. अगदी सहज सोपा उपाय म्हणजे ताण हलका करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि तो हळूवार सोडा ज्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. आपल्या शालेय जीवनातील यशाची कल्पना केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नक्की मिळेल.

परीक्षेच्यावेळी हॉलमध्ये


परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून मग त्यामधील सर्व प्रश्न नीट वाचा, ते वाचल्याने तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवायला साधारण किती वेळ लागेल याची कल्पना येईल. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्याप्रकारे येतं, तो प्रश्न आधी सोडवा आणि जर टेन्शन आलंच तर दीर्घ श्वास घेऊन सकारात्मक विचार करा.


शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

काम करा चाळीस तास

काम करा चाळीस तास


आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आज प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकासमोर कामाची उत्तुंग आव्हानं निर्माण केली आहेत; आणि त्यांचा सामना करण्यासाठी तज्ञांच्या मते ४० तास आठवड्यातून द्यावेत आणि बाकीचा वेळ आपल्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी वापरावा.

आजच्या ह्या अशा जीवनशैलीमुळे वाढता तणाव, असाइनमेंट्स, डेडलाइन्स आणि या सगळ्याशी जोडलेली पगारवाढ, अशा यच्चयावत कारणांमुळे खासगी क्षेत्रात काम करणारा सर्व स्तरातला कार्यकारी वर्ग कमालीच्या दबावाखाली आज वावरताना दिसत आहे तसेच प्रमाणाबाहेर कामाचे तासही त्यांच्या मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम करत आहेत. अशातच वजनवाढ, उच्च रक्तदाब, मधुमेह, पाठदुखी, कंबरदुखी, दृष्टिदोष, मानसिक चिंता, नैराश्य, निद्रानाश अशा थेट जीवनशैलीशी संबंधित आजारांना आज कित्येक लोकांना सामोरे जावे लागत आहे. अति काम आणि कमी झोपेमुळे प्रतिकारशक्ती कमजोर पडून, सर्दी-खोकल्यासारखे आजारही वरचेवर होताना दिसून येत आहेत
अशा जीवनशैलीशी निगडित वाढत चाललेल्या पेशंटच्या संख्येवर उपचार करताना डॉक्टर म्हणतात, ‘काम कमी करा. जरा आराम करा.’ काम कमी म्हणजे किती कमी? आठवड्याला किती तास? हे कसं ठरवणार? तज्ञांच्या एका संशोधनानुसार, आठवड्याला फक्त ४० तास काम केलं, तरच तब्येत उत्तम राहते. ४० तासांपेक्षा जास्त किंवा ३० तासांपेक्षा कमी काम केलं, तर ते आरोग्याला हानिकारक ठरू शकतं.

या संशोधनात असं जाहीर केलं आहे, की पुरुषांनी आठवड्यात ४० ते ४५ तास काम करायला हरकत नाही. पण स्त्रियांनी ३४ तासच काम करावं; कारण त्यांना रोज किमान - तास घरातल्या कामांची जबाबदारी सांभाळावी लागते. या संशोधकांनी आवर्जून नमूद केलं आहे की, जरी स्त्रियांचे ऑफिसच्या कामाचे तास जरी कमी असावेत तरी घर आणि ऑफिस ह्या अशा दोन्ही आघाड्यांवर स्त्रिया ह्या तसूभरही कमी नसतात.

आठवड्याचे सहा दिवस रोज ऑफिसमध्ये  १० ते १२ तास काम करणाऱ्या व्यक्ती आज आपल्या देशातही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात, भरपूर कष्ट केल्याशिवाय यश आणि पैसा मिळत नाही, असं मानणारा खूप मोठा वर्ग येथे आज आहे आणि या वर्गाला स्वतःच्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याच्या वेळांकडे, विश्रांतीकडे म्हणावं तेवढं लक्ष देता येत नाही. आयुष्यातील असंख्य सुखाच्या अनेक लहान लहान क्षणांना ते दूर लोटतात. आपल्या कुटुंबाकडेही त्यांना लक्ष द्यायला वेळ नसतो, अति कामाच्या तणावामुळे ते सतत थकलेले असतात आणि चाळिशीतच वृद्ध दिसू लागतात आणि बरीच दुखणीही पाठीशी असतात.अशावेळेस या अल्पवयातच नैराश्य आल्यास आश्चर्य वाटायला नको.  

आठवड्यात एकूण फक्त ४० तास काम करा, याचा अर्थ उरलेले तास झोपा काढा असा बिलकुलही होत नाही तर बाकीच्या वेळेत जीवनातील सर्व क्षेत्रात सहभागी होऊन आनंद मिळवा. आपले काम संपल्यावर उर्वरित वेळ विश्रांती, मुलांबरोबर किंवा कुटुंबासमवेत आणि मित्रमंडळीसह आनंदात व्यतीत केला पाहिजे, तसेच तुम्ही आवडते छंद जोपासणं, अधिक अपेक्षित आहे. खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे आणि आपल्या दिनचर्येत स्वतःसाठी आणि चिंतनासाठी वेळ आवर्जून काढावा.

थोडक्यात काय, तर  आजच्या जीवनशैलीनं प्रत्येकासमोर कामाची उत्तुंग आव्हानं निर्माण केली असल्याने त्यांच्याशी झगडण्यासाठी आठवड्यात ४० तास द्यावेत. बाकीचा वेळ आपल्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी वापरावा. आजकाल बऱ्याच कंपन्या मध्ये तासाचे वर्किंग कल्चर आले असून आठवड्यातले दिवस काम चालते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होत आहे.
Regards

 

 


https://www.techinasia.com  

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...