तासंतास बसून काम करताय, तर मग वेळीच काळजी घ्या!!!!

तासंतास बसून काम करताय, तर मग वेळीच काळजी घ्या!!!!


आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत कामाच्या व्यापामुळे बऱ्याच जणांना आरोग्याकडे फारसे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे जेवणाच्या अयोग्य वेळा, कमी झोप, कामाचा अधिक ताण या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. ह्यातच कामाच्या ठिकाणी अधिक वेळ द्यावा लागत असल्याने कुटुंबासोबत कमी वेळ मिळतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ताण, टेन्शन तसेच शारीरिक आणि मानसिक देखील स्वास्थ्य बिघडण्याने होतो.
या सगळ्यांपासून दूर जाण्यासाठी बरीच माणसे चुकीच्या आणि वाईट सवयींकडे ओढली जात आहेत. मग ताण दूर करण्यासाठी धूम्रपान, वारंवार चहा / कॉफी यांचे सेवन जास्त केले जाते. मात्र ह्या सवयी देखील धोकादायक आहेत. तसेच आजकाल आपल्या कामाची पद्धत ही एकाच जागी तासंतास बसून काम करण्याची आहे. ही बैठी जीवनशैली धोकादायक आहे कारण आपल्या शरीराची फारच कमी हालचाल ह्यामुळे होते आणि मग भविष्यात अधिक समस्यांना आमंत्रण देखील ह्यामुळेच मिळते.
एका संशोधनात असे आढळून आले आहे की एका तासाहून अधिक वेळ एकाच जागी बसून काम केल्याने मेटाबॉलिझम कमी होते ह्याचा परिणाम कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाण्याने होतो. ह्यातीलच एका शोधात हाती आलेल्या माहितीनुसार, शारीरिक हालचाल खूपच कमी झाल्याने आणि त्यातील अनियमिततेमुळे हृद्यासंबंधित आजार बळावण्याची शक्यता, तसेच मधुमेहाची शक्यता अधिक वाढते. एका माहितीनुसार जगामध्ये सर्वाधिक जास्त, भारत देशात सर्वाधिक रुग्ण हे मधुमेहाची लागण झालेले आहेत.
अधिक वेळ बसल्याने बऱ्याच आजारांना निमंत्रण मिळते:
सध्या जर आपण पहिले तर ऑफीसमध्ये काम करणारे अधिकतर लोक ९-१० तास बसलेले असतात, त्यातच कधी कधी कामाची वेळ वाढते देखील, त्यामुळे अशा लोकांची झोपही ८ तास होत नाही ह्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. एका संशोधनानुसार असे दिसून आले की, तासंतास बसून राहणे हे कुठल्याही व्यसनाइतके धोकादायक आहे. आजकाल जर आपण पहिले तर बरीचशी कामे ही बसूनच होत आहेत.

कामाचे स्वरूप बदलले पाहिजे:
अशा प्रकारचा धोका लक्षात घेता काही संस्थांनी आपले कामाचे स्वरूप बदलून उभे राहून काम करण्याचे कल्चर केले आहे तसेच काम करण्यासाठी थोडे उंच डेस्क बनवले गेले आहेत. परंतु आजही बऱ्याच संस्थांमध्ये बसूनच काम केले जाते आणि म्हणूनच आपल्या आरोग्यासाठी आपण स्वतःपासून सुरवात केली पाहिजे जसे की रोजच्यारोज चालणे अथवा व्यायाम करणे जेणेकरून शारीरिक हालचाल होईल तसेच कामाच्या ठिकाणी अधून मधून जमल्यास फेरी मारणे अथवा आपल्या खुर्चीतच बसून काही शारीरिक व्यायाम करता आले तर ते जरूर करावेत.
Regards

तासंतास बसून काम करताय, तर मग वेळीच काळजी घ्या!!!!

संबंधीत इमेज / चित्र :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या