अपुरी झोप म्हणजे मधुमेहाला आमंत्रण

अपुरी झोप म्हणजे मधुमेहाला आमंत्रण


सध्या आपण जर पहिले तर बऱ्याच लोकांना मधुमेह होण्याचे लठ्ठपणा हे एक जनरल कारण दिसून येत आहे त्याचप्रमाणे इतरही कारणे हेल्थ चेकअप केल्यावर दिसून येतात पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात ज्या व्यक्ती पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी-जास्त होत राहते आणि हे एक प्रमुख कारण भविष्यात मधुमेहाला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत होऊ लागले आहे. तसेच ही एक संशोधकांच्या मते एक जागतिक समस्या होऊन बसली आहे आणि सध्या आपला भारत देश हा मधुमेही लोकांची जागतिक राजधानी आहे ज्यात लठ्ठपणा हे एक प्रमुख कारण समोर येत आहे. जितकी झोप कमी होईल त्या प्रमाणात शरीर देखील तितकेच आळसावलेले आणि थकलेले जाणवते परिणामी लवकर ऊर्जा मिळवण्याकरिता अनेक कॅलरी आणि कर्बोदकांचं सेवन त्या व्यक्तीकडून केलं जातं.
दररोज पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्वाचे सांगावेसे वाटते की दररोज ते घेत असलेल्या कमी झोपेमुळे इतर व्यक्तींपेक्षा त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त संभवतो असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. अशा लोकांमध्ये साहजिकच ग्लुकोजचं प्रमाण सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी-जास्त होत राहते, आणि त्यामुळे भविष्यात मधुमेह होण्याचा धोकाही अधिक संभवतो.
आत्ताच म्हटल्याप्रमाणे पुरेशी झोप न मिळाल्याने ग्लुकोजचे प्रमाण त्या व्यक्तिंच्या शरीरात पुरेसे राखले जात नाही, तात्पर्याने अशा व्यक्तींच्या शरीरात इन्शुलीन पुरेशा प्रमाणात स्र्ववत नाही. त्यामुळे टाईप-2 मधुमेह होण्याची शक्यता वाढते आणि सध्या बरेच लोक ह्या टाईप-2 मधुमेहाने त्रस्त आहेत हे बऱ्याच डॉक्टरांकडे येणाऱ्या केसेस वरून सध्या समोर येत आहे. झोपेच्या अभावामुळे इन्शुलीनची निर्मिती करणाऱ्या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होऊन रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखली न गेल्याने मधुमेह होण्याची शक्यताही वाढते.
इथे मला एक आवर्जून सांगावेसे वाटते की जितके जास्त दिवस तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही, तेवढेच ती झोप भरून काढणं भविष्यात तितकंच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अशक्य होत जाईल. असं झाल्यास अशा व्यक्तीला कमी झोपण्याची सवय होऊन त्याची परिणती येणाऱ्या काळात मधुमेह होण्यात होईल.
बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की काही लोक हे सहा तासांहून कमी झोप घेतात आणि हे असे एका संशोधकांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. म्हणूनच जर ह्या गोष्टीवर मात करायची असेल तर झोपेचे वेळापत्रक ठरवून घेऊन ठरावीक वेळी झोपावे आणि सकाळी ठरावीक वेळेचा अलार्म लावून उठावे अशामुळे आपले शरीरही ह्या वेळापत्रकाला सरावून शरीरालाही पुरेशी विश्रांती मिळेल. रात्री नेहमी लवकर झोपावे, शक्यतो टीव्ही आणि मोबाईलचा वापर झोपण्याअगोदर करणे टाळा आरोग्यदायी आहार घ्या आणि नियमितपणे व्यायाम करा.
तसं पाहायला गेलं तर प्रत्येकालाच आपल्या शरीरासाठी हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते त्याचप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही गरजेची आहे. वैज्ञानिकांच्या संशोधनाप्रमाणे झोपेमुळे आपल्या शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तन हे रोजच्या रोज होत असते, त्यामुळे शरीराबरोबरच मेंदूलाही रोजच्या रोज आराम मिळतो. अपुऱ्या झोपेमुळे दुस-या दिवशी थकवा जाणवतो आणि ह्याचा अनुभव प्रत्येकालाच त्याचा जीवनात आला असेल. म्हणूनच पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. चांगली आणि पुरेशी झोप हवी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
१) सर्वसाधारणपणे सहा ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.
२) झोपण्याची आणि उठण्याची एक योग्य वेळ निश्चित असावी. शक्यतो लवकर झोपावे.
३) मनातील चिंता, काळजी दूर करून झोपावे, शक्यतो झोपेपूर्वी टीव्ही आणि मोबाईलचा वापर टाळावा.
४) दिवसभरात सकस आणि पौस्टिक आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम देखील करावा.
Regards


संबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या