रागावर नियंत्रण कसे मिळवाल?

रागावर नियंत्रण कसे मिळवाल?


साधारण मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की त्या व्यक्तीला राग येतो आणि तसे पाहायला गेले तर क्रोध ही एक मानवी भावना आहे. पण हाच जेंव्हा आटोक्याबाहेर जातो तेंव्हा त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि ह्यातूनच अनेक समस्या देखील निर्माण होतात. ह्या समस्या त्या वक्तीच्या वैयक्तिक भावनांशी निगडित असतात ज्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते आणि ह्याचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो.
अशा रागीट व्यक्तींना समाजात वावरताना खूप कठीण होऊन जाते आणि इतरांच्या बोलण्याचे चुकीचे अर्थ लावले जातात तसेच अशा व्यक्तींना कुठल्याही गोष्टींची वाईट बाजूच दिसते आणि चांगली बाजू असे लोक त्वरित मान्य करत नाही. अशा व्यक्तींच्या कुटुंबातील माणसांच्या जगण्यावरही याचा वाईट परिणाम होतो तसेच क्रोध हे हृदय आणि रक्तदाबाच्या समस्याही निर्माण करते. म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
रागावर नियंत्रण मिळवण्याचे काही सोप्पे उपाय:
१. तुमच्या बाबतीत घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याचा सर्वप्रथम  नीटपणे विचार करा.
. आपल्याला राग कशामुळे येतो याचे कारण सर्वप्रथम जाणून घ्या. राग आल्यावर श्वास आणि हृद्याचे ठोके वाढत जातात तर सर्वप्रथम त्यावर नियंत्रण मिळवा.
. राग येत असेल तेव्हा स्वतःला शांत ठेवा आणि मनातल्या मनात अंक मोजा सुरवातीस कमीत कमी दहा किंवा गरज असल्यास त्यापेक्षा जास्त अंक मोजा, ह्यामुळे तुमच्या मनाला आणि संपूर्ण शरीराला शांत होण्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल.
. वरील दिलेल्या गोष्टींचे पालन केल्यास हळू हळू तुम्हाला तुमच्या रागावर सहजच नियंत्रण मिळवता येईल आणि एखाद्या प्रसंगात राग शांत झाल्यावर तो राग सकारात्मक पद्धतीने सौम्य भाषेत समोरच्या व्यक्तीबरोबर व्यक्त करता येईल त्यामुळे इतरांना न दुखावता तुम्हाला अगदी सहज व्यक्त होता येईल.
. रात्री पुरेशी झोप घ्या- सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याच व्यक्तींची झोप पूर्ण होत नाही, रात्रीची कमीतकमी ७ ते ८ तास झोप घेतल्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रसन्न तर वाटेलच आणि स्वतःच्याबाबतीत घडणाऱ्या परिसथितीवर नियंत्रण मिळवता येईल. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्ही पाहायचे टाळा.    
. मंद श्वास घ्या - जेंव्हा राग येतो तेंव्हा साहजिकच श्वासाची गती वाढते आणि ती व्यक्ती मोठ्याने आणि जोरात श्वास घेते अशा वेळेस साधारण ३ सेकंद श्वास रोखून धरा, १ ते ३ अंक मोजा आणि हळूहळू श्वास सोडा.ही क्रिया राग आल्यावर ३ ते ४ वेळा तरी करा, काही वेळेस जास्त करावे लागले तरी थांबू नका.

Regardsसंबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या