वजन कमी करताना घ्यायची काळजी:

वजन कमी करताना घ्यायची काळजी: 

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी खूप दिवसापासून उपाय अमलात आणत असतात तरी काही लोकांना हवा तसा परिणाम साध्य करताना अडचणी येतात तर अशातच वजन कमी करायचे असेल तर खाली दिलेल्या काही गोष्टी दुरुस्त करून तुम्हीही योग्य परिणाम मिळवू शकता.

ब्रेकफास्ट करण्याचे टाळणे:
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्ट न करण्याची चूक करतात.  ब्रेकफास्ट करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण रात्रीच्या जेवणानंतर सकाळपर्यंत साधारण १० ते १२ तासांनी आपल्या पोटात चांगले खाद्य जाणे अत्यंत आवश्यक आहे कारण याने आपल्याला दिवसभर काम करण्याची शक्ती प्राप्त होते. नाश्त्यात प्रोटीन आणि फायबर आढळणाऱ्या पदार्थांचे आवर्जून सेवन केले पाहिजे.

न्यूट्रिएंट्सला कमी न लेखणे:
वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास कार्ब आणि प्रोटीन असलेले आहार सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्यासाठी आपल्या आहारात जाणीवपूर्वक अंडी, मासे,डाळ, सोयाबीन तसेच रोस्टेड चिकनचा समावेश करावा. 

लो फॅट आहार गैरसमज:
वजन कमी करण्याच्या नादात बरेच लोक फॅट वाढेल म्हणून लो फॅट किंवा जिरो फॅट सारख्या पदार्थांचे सेवन अती प्रमाणात करतात आणि इथेच चुकीचे वर्तन नकळतपणे केले जाते. अशा पदार्थांचे सेवन हे नेहमीच लिमिटमध्ये केले पाहिजे. आपल्या शरीराला नेहमीच हेल्दी फॅटची देखील खूपच आवशक्यता असते आणि ते आपल्याला अक्रोड, बदाम ह्यासारख्या पदार्थांमधून मिळू शकतात. 

टीव्ही बघत अथवा मोबाइल पाहत जेवणे:
अनेक लोकं जेवताना टीव्ही बघणे पसंत करतात आणि सध्या ह्यामध्ये मोबाईलची पण भर पडली आहे. अशामुळे जेवण्यावरून लक्ष दूर होतं आणि अनेकदा नकळत भुकेपेक्षा अधिक आहार घेतला जातो, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो, म्हणूनच जेवताना सर्व लक्ष केवळ आणि केवळ जेवण्यावर असावे ना की इतर मनोरंजनावर.

नियमित व्यायाम करावा:

वजन कमी करताना आपले ध्येय हे वजन कमी करणे हेच असले पाहिजे आणि ह्यासाठी हार्ड वर्कआउटची गरज असते. ह्यामध्ये कुठलाही शॉर्टकट नसून आपल्याला ह्यासाठी वेळ काढावा लागेल आणि साधारणपणे इच्छित परिणाम साध्य व्हायला ३ महिन्यांचा काळ जावा लागतो हे समजून घ्यावे. हार्ड वर्कआउट नाही तर सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे चालणे आणि हे तुम्ही कुठेही आणि केंव्हाही करू शकता. कमीतकमी अर्धा तास तरी चालायला जा.

Regards


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या