जांभई का येते?

जांभई का येते? 


जांभई येणे हे तसे पाहायला गेल्यास काही आपणासाठी नवीन नाही पण जर सतत जांभई येणे हे काही आजाराचे किंवा शारीरिक समस्या वाढण्याचे संकेतही असू शकतात. म्हणूनच तुम्हाला वारंवार जांभई येत असेल, तर जांभई का येते याची कारणे देखील समजून घेणे आवश्यक आहे, कदाचित हे काही आजाराचे किंवा शारीरिक समस्या वाढण्याचे संकेतही असू शकतात. म्हणूनच ह्याची काही मूळ कारणे जर आपण जाणून घेतली तर आपणच ह्यावर काही उपाय करू शकू.

जांभई येण्याची कारणे
१) दिवसभराचा किंवा प्रवासाचा थकवा
२) झोप कमी होणे
३) काही औषधोपचार चालू असतील तर त्या औषधांमुळे
४) शरीराचे तापमान कमी होणे
५) मेंदूच्या कार्यांमध्ये बिघाड, जर झोप व्यवस्थित नसेल तर हे होऊ शकते.
६) मेंदूचे कार्य मंदावल्यास जांभईचे प्रमाण वाढते

जांभई येऊ नये म्हणून करायचे उपाय
१) सतत जांभई येत असेल तर दीर्घ श्वास घ्या.
२) नाकातून श्वास आत घेऊन तोंडाद्वारे बाहेर टाका, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल आणि मेंदूच्या कार्यात वृद्धी होण्यास मदत होईल.
३) सतत जांभई येत असेल तर एखादा विनोदी व्हिडीओ पाहावा जेणेकरून जांभईचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल कारण विनोदी व्हिडीओ जांभईचे प्रमाण कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे.

Regards

जांभई का येते?

जांभई का येते? 


संबंधीत इमेज / चित्र :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या