बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

अपुरी झोप म्हणजे मधुमेहाला आमंत्रण

अपुरी झोप म्हणजे मधुमेहाला आमंत्रण


सध्या आपण जर पहिले तर बऱ्याच लोकांना मधुमेह होण्याचे लठ्ठपणा हे एक जनरल कारण दिसून येत आहे त्याचप्रमाणे इतरही कारणे हेल्थ चेकअप केल्यावर दिसून येतात पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात ज्या व्यक्ती पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी-जास्त होत राहते आणि हे एक प्रमुख कारण भविष्यात मधुमेहाला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत होऊ लागले आहे. तसेच ही एक संशोधकांच्या मते एक जागतिक समस्या होऊन बसली आहे आणि सध्या आपला भारत देश हा मधुमेही लोकांची जागतिक राजधानी आहे ज्यात लठ्ठपणा हे एक प्रमुख कारण समोर येत आहे. जितकी झोप कमी होईल त्या प्रमाणात शरीर देखील तितकेच आळसावलेले आणि थकलेले जाणवते परिणामी लवकर ऊर्जा मिळवण्याकरिता अनेक कॅलरी आणि कर्बोदकांचं सेवन त्या व्यक्तीकडून केलं जातं.
दररोज पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्वाचे सांगावेसे वाटते की दररोज ते घेत असलेल्या कमी झोपेमुळे इतर व्यक्तींपेक्षा त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त संभवतो असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. अशा लोकांमध्ये साहजिकच ग्लुकोजचं प्रमाण सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी-जास्त होत राहते, आणि त्यामुळे भविष्यात मधुमेह होण्याचा धोकाही अधिक संभवतो.
आत्ताच म्हटल्याप्रमाणे पुरेशी झोप न मिळाल्याने ग्लुकोजचे प्रमाण त्या व्यक्तिंच्या शरीरात पुरेसे राखले जात नाही, तात्पर्याने अशा व्यक्तींच्या शरीरात इन्शुलीन पुरेशा प्रमाणात स्र्ववत नाही. त्यामुळे टाईप-2 मधुमेह होण्याची शक्यता वाढते आणि सध्या बरेच लोक ह्या टाईप-2 मधुमेहाने त्रस्त आहेत हे बऱ्याच डॉक्टरांकडे येणाऱ्या केसेस वरून सध्या समोर येत आहे. झोपेच्या अभावामुळे इन्शुलीनची निर्मिती करणाऱ्या पेशींच्या कामात अडथळे निर्माण होऊन रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखली न गेल्याने मधुमेह होण्याची शक्यताही वाढते.
इथे मला एक आवर्जून सांगावेसे वाटते की जितके जास्त दिवस तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही, तेवढेच ती झोप भरून काढणं भविष्यात तितकंच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अशक्य होत जाईल. असं झाल्यास अशा व्यक्तीला कमी झोपण्याची सवय होऊन त्याची परिणती येणाऱ्या काळात मधुमेह होण्यात होईल.
बहुतेक वेळा असे दिसून आले आहे की काही लोक हे सहा तासांहून कमी झोप घेतात आणि हे असे एका संशोधकांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. म्हणूनच जर ह्या गोष्टीवर मात करायची असेल तर झोपेचे वेळापत्रक ठरवून घेऊन ठरावीक वेळी झोपावे आणि सकाळी ठरावीक वेळेचा अलार्म लावून उठावे अशामुळे आपले शरीरही ह्या वेळापत्रकाला सरावून शरीरालाही पुरेशी विश्रांती मिळेल. रात्री नेहमी लवकर झोपावे, शक्यतो टीव्ही आणि मोबाईलचा वापर झोपण्याअगोदर करणे टाळा आरोग्यदायी आहार घ्या आणि नियमितपणे व्यायाम करा.
तसं पाहायला गेलं तर प्रत्येकालाच आपल्या शरीरासाठी हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते त्याचप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही गरजेची आहे. वैज्ञानिकांच्या संशोधनाप्रमाणे झोपेमुळे आपल्या शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तन हे रोजच्या रोज होत असते, त्यामुळे शरीराबरोबरच मेंदूलाही रोजच्या रोज आराम मिळतो. अपुऱ्या झोपेमुळे दुस-या दिवशी थकवा जाणवतो आणि ह्याचा अनुभव प्रत्येकालाच त्याचा जीवनात आला असेल. म्हणूनच पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. चांगली आणि पुरेशी झोप हवी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
१) सर्वसाधारणपणे सहा ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.
२) झोपण्याची आणि उठण्याची एक योग्य वेळ निश्चित असावी. शक्यतो लवकर झोपावे.
३) मनातील चिंता, काळजी दूर करून झोपावे, शक्यतो झोपेपूर्वी टीव्ही आणि मोबाईलचा वापर टाळावा.
४) दिवसभरात सकस आणि पौस्टिक आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम देखील करावा.
Regards


संबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.freepik.com

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

पेरूचे सेवन करून रहा फिट

पेरूचे सेवन करून रहा फिट 


तसे पाहायला गेले तर स्वतःचे आरोग्य निरोगी राहावे ह्यासाठी आपण नेहमीच विविध उपाय योजना करत असतो. यासाठी आपण फळांचे आणि भाज्यांचे सेवन अधिक करतो तसेच व्यायाम देखील करतो, जे आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक असते. आत्ताच उल्लेखल्याप्रमाणे आपण फळांचे सेवन आरोग्य चांगले राहण्यासाठी करतो म्हणूनच आज मी तुम्हाला येथे पेरू ह्या फळाचे काही उपयुक्त फायदे सांगणार आहे.

बॉडी फिट ठेवण्यासाठी: पेरूमधील पौष्टिक तत्व शरीराला फिट ठेवण्यात मदत करतात म्हणूनच पेरू शक्यतो सकाळच्या वेळेत खावेत जेणेकरून त्यामधील पौष्टिक तत्व आपल्या शरीराला सकाळीच मिळून आपल्याला दिवसाच्या सुरवातीलाच एक ऊर्जा मिळू शकते.

वजन कमी करण्यासाठी: सध्याच्या धावपळीच्या जीवनात लठ्ठपणा हा एक सिरीयस विषय बनला असून ह्या लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्ट्रॉल असते. पेरूमधील पौस्टिक तत्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यास खूपच उपयुक्त ठरतात त्यामुळे वजन नियंत्रणात किंवा कमी करण्यासाठी आपल्या डाईट मध्ये पेरूला आवर्जून स्थान द्या.


डोळे उत्तम राहण्यासाठी: डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए ची नेहमीच गरज भासते पेरूमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असल्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यात हे फळ नेहमीच सक्षम ठरते.

त्वचा उजळण्यासाठी: स्त्री असो वा पुरुष सर्वांनाच त्यांची त्वचा नेहमीच उजळ राहावी असे वाटते पेरूमध्ये पोटॅशिअम तत्व असल्यामुळे याच्या सेवनाने त्वचा उजळते आणि पुरळ, काळे डाग दूर होण्यास मदत होते.


व्हिटॅमिन सी : पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे आजारांना दूर ठेवण्यास खूपच उपयुक्त ठरते. तसेच अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास ऊपयुक्त ठरते.

Regards


संबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.freepik.com

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

जेवणानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अपायकारक

जेवणानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अपायकारक


कुठलाही ऋतू असो काही लोकांना साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे अधिक आवडते आणि त्यातही अशा काही लोकांना खासकरून जेवताना तसेच जेवणानंतरही थंड पाणी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय आपल्या शरीरासाठी खूपच अपायकारक आहे हे तुम्ही जाणून घ्या.
जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास याचा थेट परिणाम शरीराच्या पाचनशक्तीवर होऊन परिणामी शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते.
जेवणानंतर लगेचच थंड पाणी प्यायल्यास त्याचा थेट परिणाम पित्ताशयावर होतो, तसेच मानवी शरीराचे सामान्य तापमान ३७ डिग्री सेल्सियसपर्यंत असते म्हणूनच साधे पाणी पिणे केंव्हाही चांगलेच कारण थंड पाण्यामुळे आपल्या शरीराला त्याचे ३७ डिग्री तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते 


बऱ्याचदा अधिक थंड पाणी प्यायल्याने टॉन्सिल्सचा त्रास होण्याचा देखील जास्त संभव असतो, तसेच जेवणानंतर थंड पाणी प्यायल्याने हृदयविकाराच्या समस्या अधिक वाढीस लागतात. थंड पाणी प्यायल्याने पाचनक्रिया मंदावून वजन वाढण्याचा धोका अधिक संभवतो.

Regardsसंबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.google.com

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

जेवणानंतर लगेच पिऊ नका पाणी

जेवणानंतर लगेच पिऊ नका पाणी


बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते, पण एका संशोधनात असे आढळून आले आहे की जेवणानंतर लगेच पाणी पायल्यामुळे शरीरावर कालांतराने वाईट परिणाम होतो.
असेही दिसून आले आहे की जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे खाल्लेलं अन्न पचण्यास बाधा येते आणि पोट सुटण्याचा धोका निर्माण होतो जो कालांतराने भविष्यात आजारांसाठी निमंत्रण ठरू शकते.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये तर काही वेळाने प्यावे.
पाणी पिऊ नये असेही लिहीले आहे तसेच फार पूर्वी ऋषी वागभट यांनी देखील ह्या गोष्टीचा उल्लेख त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. पण आज आपल्यातील बरेच जण जेवणानंतर लगेच पाणी पिताना आपल्याला दिसून येतात.
आयुर्वेदामध्येही असे म्हंटले आहे की जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे जठरावर त्याचा विपरित परिणाम होतो कारण जठर हे अन्न पचवण्याचं काम करतं.
म्हणूनच जेवणाच्या साधारण अर्धा तास आधी आणि जेवणाच्या नंतर २ तासांनी पाणी प्यायल्यामुळे
पचनशक्ती सुधारण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारांचे उगम स्थान असलेल्या पोटाच्या समस्याही दूर होतात.
Regards


संबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.google.com

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

पाणी पिऊन देखील घटवू शकता तुम्ही तुमचे वजन

पाणी पिऊन देखील घटवू शकता तुम्ही तुमचे वजन


साधारण आपल्या सर्वांना हे तर माहीतच आहे की मानवी शरीरात ७० टक्के पाणी असते. म्हणूनच ह्या पाण्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या शरीरावर कायमच होत असतो. डॉक्टरसुद्धा कुठल्याही आजाराचे सोलुशन देताना आपल्या पेशंटला दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात कारण मुबलक प्रमाणात पाण्याची मात्रा शरीरात असल्यास चयापचयाची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. संशोधकांच्या मते वजन कमी करण्याच्या थेरपीमध्ये वॉटर थेरपीचा समावेश केल्यास दिवसभरात खाण्यापिण्याबरोवर जर योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर निश्चितच आपण वजन कमी करु शकतो.
वजन घटवण्याचे काही सोप्पे उपाय
१. सकाळी उठल्या उठल्या काहीही खाण्याआधी रिकाम्यापोटी साधारण २ ग्लास पाणी प्या.
२. ब्रेकफास्ट केल्यावर साधारण ३० मिनिटांनी २ ग्लास पाणी प्या.
३. शरीरातील अॅसिड इफेक्ट कमी करण्यासाठी दिवसभरात चहा अथवा कॉफी ह्यांचे सेवन शक्य तितके कमी करून जास्तीतजास्त पाणी प्या. 
४. लंच अथवा डिनर घेण्याआधी साधारण ३० मिनिटे २ ग्लास पाणी प्या.
५. झोपण्याआधी आणि रात्रीच्या जेवणानंतर (३० मिनिटांनी) २ ग्लास पाणी प्या ज्यामुळे सकाळी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर निघण्यास मदत होईल.
६. दिवसभरच्या कामामध्ये व्यस्त असताना एकाच वेळेस भरपूर पाणी पिण्यापेक्षा दर काही तासांनी पाणी प्या ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही.

७. दिवसभरात कुठलेही कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर भर द्या ज्यामुळे शरीरातील शरीरात साखरचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल.
Regards


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

ऑफिस जॉब करता करता हेल्दी राहण्याच्या टिप्स..

ऑफिस जॉब करता करता हेल्दी राहण्याच्या टिप्स..


काही अपवाद वगळता सध्याच्या काळात आपण जर पहिले तर ऑफिसच्या कामाची पद्धत ही एका जागी बसून काम करण्याची आहे, पण जर अशा ठिकाणी दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम करणं हे आरोग्यासाठी
देखील तितकेच नुकसानकारक आहे. एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, हृदय रोग, मधुमेह यांसारखे आजार कालांतराने बळावतात पण जर थोडी काळजी घेतली तर ह्या अशा गोष्टींपासून आपण स्वतःला
जास्तीत जास्त दूर ठेवण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकाल.

  १.      पाणी भरपूर प्या...

कुठल्याही प्रकारच्या शीतपेयांचे अधिक सेवन टाळा कारण कृत्रिम गोडसरपणाचा अनुभव देणारे हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. हे असे उपलब्ध असलेले ड्रिंक्स मानवी शरीरातील कॅलरीज वाढवत नाही तर दात, हृदय आणि पाचनतंत्र बिघडवण्यासाठी देखील कारणीभूत ठरतात. ह्या सगळ्यांऐवजी तुम्ही स्वतःला भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घ्या ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनपासून दूर राहण्यास मदतच होईल तसेच शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्यासही मदत होते.

  २.       फास्ट फूड टाळा

कुठल्याही प्रकारचे फास्ट फूड खाण्याऐवजी पोषणदायक आहाराची निवड करा.घरातूनच बनवून आणलेले पदार्थ हे केंव्हाही चांगलेच तसेच कडधान्य, फळं किंवा काजू-बदाम हा एक खूपच चांगला ऑप्शन ठरू शकतो.
३.      जमल्यास उभं राहून काम करण्याचा प्रयत्न करा
तसं पाहायला गेलं तर ज्या ऑफिसमध्ये बसून काम असते तिथे क्वचितच उभं राहायला मिळते पण उभं राहणं हे बसून राहण्यापेक्षा केव्हाही चांगलंच, उभं राहिल्यानं वजन वाढणं आणि लठ्ठपणा यांपासून दूर राहता येते. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वापरास येऊन रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो.  आपल्याला ऑफिसामध्ये असताना काही फोन कॉल्स येत असतील, तर अशा वेळेस कॉल घ्यायचा असेल तर बसून राहण्याऐवजी उभं राहून फोन घ्या. शक्य असेल तर दर थोड्या वेळाने / तासांनी  ऑफिसमधील पॅसेज मध्ये चाला. 
४. पायऱ्यांचा जास्तीत जास्त वापर करा
पायऱ्यांचा वापर करणं केव्हाही चांगलं, पायऱ्या चढल्यानं हृदय फिट राहण्यास मदत होते तसंच पायांच्या मांसपेशीही मजबूत होतात. ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी तळ मजल्यावरून शक्यतो लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा वापर करा आणि जर ऑफिस खूपच उंचावर (उदा. १० वा मजला ) असेल तर काही मजले चालत जा आणि मग उरलेले मजले लिफ्टने जा.Regardsसंबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

रागावर नियंत्रण कसे मिळवाल?

रागावर नियंत्रण कसे मिळवाल?


साधारण मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की त्या व्यक्तीला राग येतो आणि तसे पाहायला गेले तर क्रोध ही एक मानवी भावना आहे. पण हाच जेंव्हा आटोक्याबाहेर जातो तेंव्हा त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि ह्यातूनच अनेक समस्या देखील निर्माण होतात. ह्या समस्या त्या वक्तीच्या वैयक्तिक भावनांशी निगडित असतात ज्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते आणि ह्याचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो.
अशा रागीट व्यक्तींना समाजात वावरताना खूप कठीण होऊन जाते आणि इतरांच्या बोलण्याचे चुकीचे अर्थ लावले जातात तसेच अशा व्यक्तींना कुठल्याही गोष्टींची वाईट बाजूच दिसते आणि चांगली बाजू असे लोक त्वरित मान्य करत नाही. अशा व्यक्तींच्या कुटुंबातील माणसांच्या जगण्यावरही याचा वाईट परिणाम होतो तसेच क्रोध हे हृदय आणि रक्तदाबाच्या समस्याही निर्माण करते. म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
रागावर नियंत्रण मिळवण्याचे काही सोप्पे उपाय:
१. तुमच्या बाबतीत घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याचा सर्वप्रथम  नीटपणे विचार करा.
. आपल्याला राग कशामुळे येतो याचे कारण सर्वप्रथम जाणून घ्या. राग आल्यावर श्वास आणि हृद्याचे ठोके वाढत जातात तर सर्वप्रथम त्यावर नियंत्रण मिळवा.
. राग येत असेल तेव्हा स्वतःला शांत ठेवा आणि मनातल्या मनात अंक मोजा सुरवातीस कमीत कमी दहा किंवा गरज असल्यास त्यापेक्षा जास्त अंक मोजा, ह्यामुळे तुमच्या मनाला आणि संपूर्ण शरीराला शांत होण्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल.
. वरील दिलेल्या गोष्टींचे पालन केल्यास हळू हळू तुम्हाला तुमच्या रागावर सहजच नियंत्रण मिळवता येईल आणि एखाद्या प्रसंगात राग शांत झाल्यावर तो राग सकारात्मक पद्धतीने सौम्य भाषेत समोरच्या व्यक्तीबरोबर व्यक्त करता येईल त्यामुळे इतरांना न दुखावता तुम्हाला अगदी सहज व्यक्त होता येईल.
. रात्री पुरेशी झोप घ्या- सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याच व्यक्तींची झोप पूर्ण होत नाही, रात्रीची कमीतकमी ७ ते ८ तास झोप घेतल्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रसन्न तर वाटेलच आणि स्वतःच्याबाबतीत घडणाऱ्या परिसथितीवर नियंत्रण मिळवता येईल. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टीव्ही पाहायचे टाळा.    
. मंद श्वास घ्या - जेंव्हा राग येतो तेंव्हा साहजिकच श्वासाची गती वाढते आणि ती व्यक्ती मोठ्याने आणि जोरात श्वास घेते अशा वेळेस साधारण ३ सेकंद श्वास रोखून धरा, १ ते ३ अंक मोजा आणि हळूहळू श्वास सोडा.ही क्रिया राग आल्यावर ३ ते ४ वेळा तरी करा, काही वेळेस जास्त करावे लागले तरी थांबू नका.

Regardsसंबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: https://www.freepik.com

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

सतत एसीमध्ये बसण्याचे शरीरावर होणारे परिणाम:

सतत एसीमध्ये बसण्याचे शरीरावर होणारे परिणाम:


हल्लीच्या काळात आपण पाहिले असेल की बरेच जण हे ऐरकंडिशन मधेच ९ ते १० तास काम करतात अगदी लहान ऑफिस असो व कोणते मोठे कॉर्पोरेट ऑफिस, ऐरकंडिशनशिवाय काम करण्याची कल्पनाच आजच्या काळात आपण करू शकत नाही, हे झाले ऑफिसमधले परंतु आज कित्येकांच्या घरातदेखील ऐरकंडिशन असतो मात्र सतत एसीमध्ये कामानिमित्त किंवा इतर कारणांनी राहिल्याने शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक वाढते. यामुळे ताप, इन्फेक्शन, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. आता आपण काही परिणामाची यादी पाहूया.  
सांधेदुखी: सतत एसीमध्ये राहिल्याने कालांतराने त्यामधून निघणाऱ्या हवेमुळे सांधेदुखीचे आजार सतावतात. ह्याचे मूळ कारण असे की एसीमध्ये स्वाभाविकच खूप आल्हादायक वाटते आणि शरीराची हालचाल फारच कमी होते आणि ह्यामुळे सांधे एकाच स्थितीत बराच वेळ राहिल्याने त्याचे परिणाम कालांतराने दिसून येतात.
थकवा - साधारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की एसीचे तापमान खूपच कमी असते ज्यामुळे मानवी शरीराला त्याचे नैसर्गिक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक मेहेनत घ्यावी लागते आणि ह्यामुळे नकळतपणे शरीरात थकवा निर्माण होतो आणि शरीराचा स्टॅमिनादेखील कमी होत जातो आणि अशा व्यक्तींना लगेचच थकवा देखील जाणवतो.
अॅलर्जीची समस्या उध्दभवणे - एसीमधील फिल्टर बराच काळ साफ केले गेले नसतील तर अॅलर्जी, सर्दी-खोकल्यासारखे आजारही होऊ शकतात. ह्या अशा साफ न केलेल्या फिल्टरमधून निघणाऱ्या हवेमुळे, तसेच बॅक्टेरिया आणि धुळीमुळे अॅलर्जी होण्याचा धोका अधिक असतो.
त्वचा कोरडी पडणे - एसीमध्ये नॅचरल हवा बाहेर येत नाही तसेच ह्यामध्ये असलेल्या गॅसमुळे त्वचा कोरडी पडण्यास सुरवात होते आणि ह्यामुळेच त्वचेची ऍलर्जी देखील होते. तसे पाहायला गेले तर शरीरातून काही प्रमाणात घामाचे उत्सर्जन होणे शरीरासाठी खूपच महत्वाचे आहे आणि जर आपण पाहिले तर आपल्याच लक्ष्यात येईल की आपणास दिवसभरात किती घाम येतो?? 
सायनस - एका संशोधनादरम्यान असे समोर आलेय की, जे लोक सतत एसीमध्ये बसून असतात त्यांना कालांतराने सायनसची समस्या जाणवण्यास सुरवात होते.


Regardsसंबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.google.com

शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

वजन कमी करताना घ्यायची काळजी:

वजन कमी करताना घ्यायची काळजी: 

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी खूप दिवसापासून उपाय अमलात आणत असतात तरी काही लोकांना हवा तसा परिणाम साध्य करताना अडचणी येतात तर अशातच वजन कमी करायचे असेल तर खाली दिलेल्या काही गोष्टी दुरुस्त करून तुम्हीही योग्य परिणाम मिळवू शकता.

ब्रेकफास्ट करण्याचे टाळणे:
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्ट न करण्याची चूक करतात.  ब्रेकफास्ट करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण रात्रीच्या जेवणानंतर सकाळपर्यंत साधारण १० ते १२ तासांनी आपल्या पोटात चांगले खाद्य जाणे अत्यंत आवश्यक आहे कारण याने आपल्याला दिवसभर काम करण्याची शक्ती प्राप्त होते. नाश्त्यात प्रोटीन आणि फायबर आढळणाऱ्या पदार्थांचे आवर्जून सेवन केले पाहिजे.

न्यूट्रिएंट्सला कमी न लेखणे:
वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास कार्ब आणि प्रोटीन असलेले आहार सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्यासाठी आपल्या आहारात जाणीवपूर्वक अंडी, मासे,डाळ, सोयाबीन तसेच रोस्टेड चिकनचा समावेश करावा. 

लो फॅट आहार गैरसमज:
वजन कमी करण्याच्या नादात बरेच लोक फॅट वाढेल म्हणून लो फॅट किंवा जिरो फॅट सारख्या पदार्थांचे सेवन अती प्रमाणात करतात आणि इथेच चुकीचे वर्तन नकळतपणे केले जाते. अशा पदार्थांचे सेवन हे नेहमीच लिमिटमध्ये केले पाहिजे. आपल्या शरीराला नेहमीच हेल्दी फॅटची देखील खूपच आवशक्यता असते आणि ते आपल्याला अक्रोड, बदाम ह्यासारख्या पदार्थांमधून मिळू शकतात. 

टीव्ही बघत अथवा मोबाइल पाहत जेवणे:
अनेक लोकं जेवताना टीव्ही बघणे पसंत करतात आणि सध्या ह्यामध्ये मोबाईलची पण भर पडली आहे. अशामुळे जेवण्यावरून लक्ष दूर होतं आणि अनेकदा नकळत भुकेपेक्षा अधिक आहार घेतला जातो, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो, म्हणूनच जेवताना सर्व लक्ष केवळ आणि केवळ जेवण्यावर असावे ना की इतर मनोरंजनावर.

नियमित व्यायाम करावा:

वजन कमी करताना आपले ध्येय हे वजन कमी करणे हेच असले पाहिजे आणि ह्यासाठी हार्ड वर्कआउटची गरज असते. ह्यामध्ये कुठलाही शॉर्टकट नसून आपल्याला ह्यासाठी वेळ काढावा लागेल आणि साधारणपणे इच्छित परिणाम साध्य व्हायला ३ महिन्यांचा काळ जावा लागतो हे समजून घ्यावे. हार्ड वर्कआउट नाही तर सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे चालणे आणि हे तुम्ही कुठेही आणि केंव्हाही करू शकता. कमीतकमी अर्धा तास तरी चालायला जा.

Regards


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

वजन वाढवण्यासाठी खा हे पदार्थ

वजन वाढवण्यासाठी खा हे पदार्थ


आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच वजन कमी करण्याच्या जाहिराती पाहतो पण वाढवण्यासाठी पाहायला गेले तर तशा खूपच कमी जाहिराती आपल्या नजरेस पडतात. तसे पाहायला गेले तर वजन वाढवणे हे कमी करण्यापेक्षा थोडे जास्त मेहनतीचे काम आणि ह्यातच वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते, त्यासाठी त्या व्यक्तीला जास्तीत जास्त खाण्याची गरज असते. ह्या सर्व कॅलरीज रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास तुम्ही अगदी सहजपणे नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता.
एका ठिकाणी वाचनात आलेल्या माहितीनुसार मी आज तुम्हाला काही सोप्या पद्धती येथे सांगत आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता.
बटाटे - तसे नेहमीच उपलब्ध असलेला हा खाद्यपदार्थ पाहायला गेल्यास ह्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन सी असते. त्यामुळे आपल्या जेवणात बटाट्याचा समावेश केल्यास वजन वाढीस नक्कीच फायदा होऊ शकेल.  
पीनट बटर - नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास पीनट बटर हा एक छान आणि उत्तम पर्याय आहे, रोज एक चमचा हे बटर खाल्ले तर नक्कीच फायदा आहे.
मिक्स ड्रायफ्रुट - सुपरमार्केट्मधे नेहमीच आकर्षक पद्धतीने ठेवलेला सुका मेवा सर्वांनाच आकर्षित करतो ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात तसेच यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रोटीन, व्हिटामिन ई आणि फायबर असल्याने शरीरासाठी खूपच उपयुक्त आहेत.   
अंडी - ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटामिन डी आणि चांगले कोलेस्ट्रॉल असल्यामुळे हे एक वजन वाढीसाठी उत्तम खाद्य आहे.
चीज - एका प्राप्त माहितीनुसार साधारण १० ग्रॅम चीजमध्ये ४०० कॅलरीज असतात. तसेच ह्यामध्ये प्रोटीन्स, व्हिटामिन्स, मिनरल्स, फॅट आणि कॅल्शियम असते. सुपरमार्केट मध्ये चीजचे चौकोनी क्यूब उपलब्ध असतात आणि ह्याचा समावेश तुम्ही दररोज ब्रेकफास्टमध्ये केल्यास वजन वाढण्यास नक्कीच मदत होते.  

केळी - वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असणारे हे फळ स्वस्त आणि मस्त उपाय आहे, ह्यामध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट आणि इतर पोषकतत्वांचा मोठा भरणा असतो. हे आपल्या शरीराला एनर्जी  वाढीसाठी उपयुक्त आहे म्हणूनच आपल्या आहारात केळ्याचा समावेश केल्यास नक्कीच तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.
Regardsसंबंधीत इमेज / चित्र :

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

तासंतास बसून काम करताय, तर मग वेळीच काळजी घ्या!!!!

तासंतास बसून काम करताय, तर मग वेळीच काळजी घ्या!!!!


आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत कामाच्या व्यापामुळे बऱ्याच जणांना आरोग्याकडे फारसे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे जेवणाच्या अयोग्य वेळा, कमी झोप, कामाचा अधिक ताण या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. ह्यातच कामाच्या ठिकाणी अधिक वेळ द्यावा लागत असल्याने कुटुंबासोबत कमी वेळ मिळतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ताण, टेन्शन तसेच शारीरिक आणि मानसिक देखील स्वास्थ्य बिघडण्याने होतो.
या सगळ्यांपासून दूर जाण्यासाठी बरीच माणसे चुकीच्या आणि वाईट सवयींकडे ओढली जात आहेत. मग ताण दूर करण्यासाठी धूम्रपान, वारंवार चहा / कॉफी यांचे सेवन जास्त केले जाते. मात्र ह्या सवयी देखील धोकादायक आहेत. तसेच आजकाल आपल्या कामाची पद्धत ही एकाच जागी तासंतास बसून काम करण्याची आहे. ही बैठी जीवनशैली धोकादायक आहे कारण आपल्या शरीराची फारच कमी हालचाल ह्यामुळे होते आणि मग भविष्यात अधिक समस्यांना आमंत्रण देखील ह्यामुळेच मिळते.
एका संशोधनात असे आढळून आले आहे की एका तासाहून अधिक वेळ एकाच जागी बसून काम केल्याने मेटाबॉलिझम कमी होते ह्याचा परिणाम कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाण्याने होतो. ह्यातीलच एका शोधात हाती आलेल्या माहितीनुसार, शारीरिक हालचाल खूपच कमी झाल्याने आणि त्यातील अनियमिततेमुळे हृद्यासंबंधित आजार बळावण्याची शक्यता, तसेच मधुमेहाची शक्यता अधिक वाढते. एका माहितीनुसार जगामध्ये सर्वाधिक जास्त, भारत देशात सर्वाधिक रुग्ण हे मधुमेहाची लागण झालेले आहेत.
अधिक वेळ बसल्याने बऱ्याच आजारांना निमंत्रण मिळते:
सध्या जर आपण पहिले तर ऑफीसमध्ये काम करणारे अधिकतर लोक ९-१० तास बसलेले असतात, त्यातच कधी कधी कामाची वेळ वाढते देखील, त्यामुळे अशा लोकांची झोपही ८ तास होत नाही ह्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. एका संशोधनानुसार असे दिसून आले की, तासंतास बसून राहणे हे कुठल्याही व्यसनाइतके धोकादायक आहे. आजकाल जर आपण पहिले तर बरीचशी कामे ही बसूनच होत आहेत.

कामाचे स्वरूप बदलले पाहिजे:
अशा प्रकारचा धोका लक्षात घेता काही संस्थांनी आपले कामाचे स्वरूप बदलून उभे राहून काम करण्याचे कल्चर केले आहे तसेच काम करण्यासाठी थोडे उंच डेस्क बनवले गेले आहेत. परंतु आजही बऱ्याच संस्थांमध्ये बसूनच काम केले जाते आणि म्हणूनच आपल्या आरोग्यासाठी आपण स्वतःपासून सुरवात केली पाहिजे जसे की रोजच्यारोज चालणे अथवा व्यायाम करणे जेणेकरून शारीरिक हालचाल होईल तसेच कामाच्या ठिकाणी अधून मधून जमल्यास फेरी मारणे अथवा आपल्या खुर्चीतच बसून काही शारीरिक व्यायाम करता आले तर ते जरूर करावेत.
Regards

तासंतास बसून काम करताय, तर मग वेळीच काळजी घ्या!!!!

संबंधीत इमेज / चित्र :

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

अक्रोड खाण्याचे महत्वपूर्ण फायदे

अक्रोड खाण्याचे महत्वपूर्ण फायदे


आपण जेंव्हा एखाद्या सुपरमार्केटमध्ये फेरफटका मारतो तेंव्हा आपल्याला हमखास नेहमीच नजरेस पडणारे फळ म्हणजे ड्रायफ्रुट्स आणि ह्यामध्येच एक आहे अक्रोड. साधारण माहितीनुसार अक्रोड खाल्याने रोगांना अटकाव होण्यास मदत होते तसेच तज्ज्ञांच्या एका अभ्यासानुसार मूठभर अक्रोडमध्ये ४ ग्रॅम प्रोटीन, २ ग्रॅम फायबर आणि मॅग्नेशियम असते आणि अक्रोड हे बाराही महिने उपलब्ध असते.

तसेच तज्ज्ञांच्या एका अहवालानूसार असे लक्षात येते की, "ओमेगा-3, अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असलेले अक्रोड हे एकमेव फळ आहे. जे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."
पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असे हे फळ वर्षभर उपलब्ध असते त्यामुळे अर्थातच ते वर्षभर तुम्ही खाऊ शकता. 

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे फक्त भारताचाच विचार केला तर ५०% लोकांना वजनाच्या समस्या आहेत लोकांच्या आहार पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत त्यामुळे बहुसंख्य लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत आणि ह्यामुळेच आज आजार जास्त आणि स्वस्थ जीवनशैली खूपच कमी होऊ लागली आहे.
म्हणूनच अशा सोप्या मार्गांचा अवलंब करून आपण नक्कीच एक सुधृढ आयुष्य जगू शकतो.
Regards


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा

लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा 


लठ्ठपणा ही सध्या एक जागतिक समस्या असून त्यावर वेळीच उपाय कारणे फारच गरजेचे आहे, जर आपण फक्त भारताचाच विचार केला तर सर्वाधीक लठ्ठ मुलांच्या संख्येत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. एका प्राप्त माहितीनुसार भारतात सुमारे १.४४ कोटी मुले ही अधिक वजनाची आहेत आणि हा लठ्ठपणा अनेक आजारांचे प्रमुख कारण असून हे आपण सर्वच जाणतो.

एका जागतिक पाहणीनुसार लठ्ठपणाच्या बाबतीत चीन पहिल्या तर, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, अतीवजन किंवा लठ्ठपणा असलेल्या मुलांना हृदयविकार किंवा मधुमेहाची शिकार ठरण्याची शक्यता अधिक असते, आणि ह्याची बरीच उदाहरणे आज लहान वयात येणाऱ्या हृदयविकाराच्या बातम्यांच्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहेत.

इंडियन मेडिकल असोशिएशन (आयएमए) चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांनी म्हटले आहे की, 'लठ्ठपणाची समस्या केवळ भारतच नव्हे तर, जगभरात वाढती आहे. त्यात लहान मुलांमध्ये लठ्ठपणा अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे. वेळी अवेळी जेवण, चुकीचा अहार, शरीराला योग्य प्रमाणात आवश्यक त्या प्रथिनांचा पुरवठा होणे, खाण्यात सतत जंकफूड्स येणे, व्यायामाचा आभाव आदी गोष्टींमुळे लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर वाढतो. काही बालकांमध्ये लठ्ठपणा हा अनुवंशीकही असतो', असेही अग्रवाल यांनी सांगितले. (Ref: www.zeenews.com)

सध्याच्या मुलांमध्ये सातत्याने एकाजागी बसून टीव्ही, कॉम्प्यूटर, मोबाईलवर गेम खेळण्याचे प्रमाण हे वाढतच चालले आहे आणि ह्यामुळेच मैदानी खेळांकडे बालक आणि पालकांचे दुर्लक्ष्य होत चालले आहे. म्हणूनच जर वेळीच सावध होऊन ह्यावर उपाय शोधून काढला तर ह्या अशा समस्यांचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते आणि ह्यासाठी सर्वप्रथम पालकांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे.


Regards

लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा
लहान मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा 


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.google.com

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...