डाळिंबाचे आरोग्याला फायदे

डाळिंबाचे आरोग्याला फायदे

डाळिंबाचा रस प्यायल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. डाळिंबामुळे आपल्या शरीराची पचन शक्ती सुधारते आणि पचन सुधारल्याने शरीराला आपोआपच फायदे मिळू लागतात.

१) शरीरामधील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. 
आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळिंब ज्यूस किंवा डाळिंब खूपच कामी येते आणि ह्यामुळे आपली शुगर लेव्हल मेंटेन राहून आरोग्यही चांगले राहते. 

२) रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते:
डाळिंबामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत तर होतेच शिवाय हिरड्या मजबूत होऊन आपल्या दातांची दुर्गंधीही दूर होण्यास खूप मदत होते.

३) शरीराची पचनशक्ती वाढण्यास खूपच मदत होते:
डाळिंब्यामध्ये असलेल्या पौस्टिक औषधी तत्त्वांमुळे हृदय, पोट, यकृत यांचं कार्य व्यवस्थित चालण्यास खूप  मदत होते. वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास डाळिंब ज्युस महत्वाचा ठरतो, तसेच उन्हाळ्यात डाळिंब ज्यूस प्यायल्याने शरीराला नैसर्गिक पोषण मिळते आणि तहान कमी होते. पचनशक्ती  वाढवण्यास तसेच त्वचा निरोगी राखण्यासही डाळिंब खूप उपयोगी पडते. 
Regards

संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.comखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या