हृदय रोगाची लक्षणे

हृदयरोगाची प्रमुख कारणे 


सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तसेच पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि काही व्यसनांमुळे हार्ट अॅटॅकचा धोका अधिक वाढू लागलेला आहे, तसेच हल्लीच्या काळात आपण पाहत आहोत कि खूप लहान वयात लोकांना हार्ट अॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे.

१) व्यसने - धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयीनमुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढण्याची आणि बळावण्याची शक्यता अधिक असते.
२) पोषक आहाराचा अभाव - हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बरेच जण सकाळचा ब्रेक फास्ट न करता त्यांच्या कामावर निघून जात आहेत ह्यामुळे भविष्यात लठ्ठपणा वाढून हार्ट अॅटॅकचा धोका वाढण्याच्या शक्यता अधिक आहेत. तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे पोषक आहाराचे सेवन खूप कमी होत चालले आहे.
३) नियमित व्यायामाचा अभाव - जर चांगले आरोग्य हवे असेल तर त्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा असतो. पण व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम बऱ्याच लोकांकडून केला जात नाही आणि हे कारणही हार्ट अॅटॅकला कारणीभूत ठरत आहे.
४) अनियमित रक्तदाब - अनियमित रक्तदाबामुळे देखील हार्ट अॅटॅकचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते आणि तो जर नीट ठेवायचा असेल तर योग्य आहार, नियमित व्यायाम करणे खूपच गरजेचे आहे.

Regardsसंबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.comखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: : 


कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या