रोज सकाळी खा मूठभर भिजवलेले चणे


रोज सकाळी खा मूठभर भिजवलेले चणेकडधान्यात मोडणारे उसळी, भाज्यासाठी वापरलेले चणे आरोग्यासाठी नेहमीच उपयोगी आणि  पौष्टिक असतात तसेच जर भिजवलेले चणे खाल्ल्यास यातून प्रोटीन, फायबर, खनिजे आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात म्हणूनच रोज सकाळी एक मूठ भिजवलेले चणे खाल्ल्यास शरीरासाठी मोठे फायदेशीर आहे.

साधारण माहिती मिळवल्यास आपणाला असे दिसून येते की चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते तसेच अॅनिमियासारख्या आजारांवरदेखील चणे खूपच फायदेशीर ठरते चण्यांमध्ये फॉस्फरस, आणि मँगनीजसारखी खनिजे असतात ज्यामुळे त्वचेचे विकार दूर होतात. तसेच चण्यांमधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड कोलस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.

आपल्या सर्वांना दूधजन्य पदार्थामध्ये जसे की दूध, आणि दह्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते तितकेच ते चण्यामध्येदेखील असते, त्यामुळे हाडे मजबूत होण्यास खूप मदत होते, तसेच चण्यात फॉस्फरसची मात्रा अधिक असल्याने हिमोग्लोबिनचा स्तर वाढण्यास तसेच तो मेंटेन ठेवण्यास मदतच होते.

Regards
रोज सकाळी खा मूठभर भिजवलेले चणे
रोज सकाळी खा मूठभर भिजवलेले चणे


संबंधीत इमेज / चित्र :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या