स्ट्रेस मॅनेजमेंट


स्ट्रेस मॅनेजमेंट 


सध्याच्या टेकनॉलॉजि दुनियेत बऱ्याच लोकांना ताणतणाव, परीक्षेतील अपयश, व्यवसायातील अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा अशा गोष्टींमुळे तर तरुणांना प्रेमभंग, तीव्र नैराश्‍य किंवा तीव्र मानसिक आजार, व्यसनाधिनता अशा एक ना अनेक मानसिक आजार होत आहेत.

आजच्या स्पर्धात्मक युगात अपयश पचवू न शकल्याने बऱ्याच व्यक्ती नैराश्‍याच्या आहारी जात आहेत आणि त्यांना बरेच मानसिक आजारही होत आहेत. ह्या अशा कारणांमुळे  आपल्याला सर्वत्र मनोरुग्णांची संख्या झपाटयाने वाढलेली दिसून येत आहे एका जागतिक मानसिक आरोग्य फेडरेशनच्या आकडेवारीनुसार; सध्या जगातील 35 कोटी लोक विविध कारणांमुळे नैराश्‍यग्रस्त आहेत आणि त्यातील केवळ काही लोकच ह्यावर उपचार घेत आहेत.

एका सर्वेक्षणानुसार 2030 पर्यंत जगातील एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त असतील त्यामुळे आतापासूनच नैराश्‍य आणि मानसिक आजारासंदर्भात समाजात जनजागृती करणे अतिशय गरजेचे आहे. मानसिक आरोग्याची साधी व्याख्या म्हणजे दैनंदिन आयुष्यात येणा-या सगळ्या चांगल्या-वाईट अनुभवांना धीराने सामोरे जाणे, परंतु बरेच जण ह्यात अयशस्वी होताना दिसतात, जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात पण जेव्हा आयुष्याचा प्रवास खडतर होतो, आणि अशा वेळी नेमके काय करावे, कुणाला सांगावे आणि काय निर्णय घ्यावा हे खूपच महत्वाचे ठरते.

वारंवार आणि सतत त्याच त्या नको असलेल्या गोष्टींचा सारखा विचार करत राहिल्याने व्यक्ती नैराश्‍याच्या आहारी जातो, परंतु मला इथे एक सांगावेसे वाटते की नैराश्‍य हा उपचारांनी १००% बरा होणारा आजार आहे.

ह्या आणि अशाच नैराश्‍येतून मुक्ततेसाठी  डॉक्‍टरांच्या परवानगीने  औषधोपचारांचा मार्ग आपण अवलंबू शकतो, शरीरांतर्गत होणा-या जैविक बदलांमुळे आपल्या शरीरात निरनिराळे आजार बळावतात परंतु मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी डॉक्‍टरांच्या योग्य सल्यानुसार अँटी डिप्रेशन औषधे घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. काही अंशी अश्या लोकांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतल्यास त्यातूनही खूप चांगले परिणाम साध्य होऊ शकतात, अर्थातच डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञ हे त्या व्यक्तीच्या मानसिक आजारावर ठरवावे.

Regards

स्ट्रेस मॅनेजमेंट
स्ट्रेस मॅनेजमेंट 

संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या