बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

दररोज दही खाण्याचे फायदे

दररोज दही खा होतील अनेक फायदेतुम्हाला सर्वांना हे तर माहीतच आहे कि कुठलेही दूधजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी लाभदायकच असतात त्यातीलच एक आहे दही, दही खाणे हे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक मानले जाते. दह्यामधील विशिष्ट गुणधर्मामुळे  दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते, तसेच ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅस सारख्या समस्या असतील त्यांच्यासाठी दही एक उत्तम उपाय आहे.

१) सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना रात्रीच्या झोपेच्या समस्या उद्भवत आहेत , त्यांच्यासाठी दही हे एक उत्तम खाद्य आहे ज्यामुळे झोपेची समस्या हळू हळू कमी होण्यास मदतच होईल.

२) दह्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होण्यास मदत होते.

३) दह्यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते आणि तसेच  ज्या व्यक्तींना भूक कमी लागते त्यांनी जाणीवपूर्वक दह्याचे नियमित सेवन करावे.

४) दह्यामधील उपलबद्ध असलेल्या कॅल्शियममुळे आपल्या शरीरातील दातांना तसेच हाडांना चांगली  मजबूती मिळते.

५) आपण बऱ्याचदा पाहतो की वजन कमी करायचे असेल तर आपल्याला खूप साऱ्या जाहिराती नजरेस येतात पण ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी दह्यात बदाम, बेदाणे मिसळून खाल्ल्यास वजन वाढण्यास फायदा तर होतोच शिवाय शरीरामध्ये नैसर्गिक ताकदही मिळते.

६) शरीरातील हिटचे प्रमाण वाढल्यास बऱ्याचदा तोंड येते आणि जर असे झाल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा जेणेकरून ते लवकरात लवकर बरे होईल.

Regards

दही खाण्याचे फायदे
दररोज दही खाण्याचे फायदे

संबंधीत इमेज / चित्र:

सौजन्य: www.google.com

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे ...