दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय


दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय 


सध्याचे जीवन आपण कितीही मॉडर्न म्हंटले तरी देखील आजकालची जीवनशैली ही अतिशय गुंतागुंतीची आणि धावपळीची आहे आणि ह्या अशाच जीवनशैलीमध्ये आपल्याला बरीच कामे देखील करावी लागतात आणि ती कामे करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ऊर्जा असणे आवश्यक आहे. पण ह्या कामाच्या रगाड्यात कुठेतरी, "आरोग्य ही खरी संपत्ती आहे" ह्याचे कुठेतरी विस्मरण झालेले दिसते आणि जर तब्बेत ठणठणिक असेल तर कामे करणे देखील सोपे होऊन ती करण्यास उत्साह वाटतो. परंतु जर आपण आपल्या आहारात काही योग्य बदल केल्यास ह्या अशा धावपळीच्या काळातदेखील आपले शरीर चांगले ठेवू शकतो तसेच आपल्या शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकवून ठेवू शकतो.

खाली दिलेले काही सोपे उपाय करून तुम्ही तुमचे आरोग्य चांगले राखू शकता

१) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बरेच लोक सकाळचा ब्रेकफास्ट न करताच कामावर निघून  जातात, तर सकाळचा ब्रेकफास्ट कधीही चुकवू नका आणि दिवसभरात कामावर असताना एकाच वेळी खूप न खाता थोड्या थोड्या वेळच्या अंतराने थोडं थोडं खा.

२) ऑफिसमध्ये काम करताना बऱ्याच लोकांना चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते, तर तसे न करता तुम्ही जाणीवपूर्वक गाजर, काकडी यांसारख्या भाज्या / सलाड तसेच फळे खाण्याची सवय लावा.

३) प्रवासादरम्यान किंवा ऑफीसमध्ये किंवा घरी असताना भूक लागली की बिस्कीटे किंवा खारी, टोस्ट यांसारखे पदार्थ खाण्यापेक्षा फळे खाण्याची सवय लावा कारण चहासोबत मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात.

४) जे लोक फिल्ड जॉब करतात त्यांनी नारळ पाणी, फळांचा ज्यूस, लिंबाचे किंवा कोकम सरबत घ्यावे कारण सतत उन्हात फिरण्याने जास्त घाम येतो आणि थकल्यासारखे वाटते म्हणूनच सोबत पाण्याची बाटली ठेवावी. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे.

५) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयींसोबत पुरेशी झोप देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.म्हणूनच लवकर झोपण्याची स्वतःला सवय लावा आणि शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी टीवी अथवा मोबाईल चा वापर टाळावा.

६) सध्या रेडी टू ईट पदार्थ तसेच फास्ट फूड अगदी सहज उपलब्ध होतात ह्या अशा फूडमुळे  लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे हे असे पदार्थ टाळलेलेच बरे.

Regards

दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय
दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय 
संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या