सफरचंद खाण्याचे फायदे


सफरचंद खाण्याचे फायदे


तुम्ही बाजारात फेरफटका मारल्यास तुम्हाला हमखास वर्षाचे बाराही महिने दिसणारे फळ म्हणजे सफरचंद,आरोग्यपूर्ण जीवनशैली आत्मसात करायची असेल तर रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सध्याच्या मॉडर्न लाइफस्टाइल मध्ये लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आपले आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वपुर्ण क्षार सफरचंदात असतात, म्हणूनच वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असणारे सफरचंद रोज एक तरी खावे.
सफरचंदात मोठ्या प्रमाणात 'लोह' असते तसेच ह्यामध्ये ग्लूकोज, पोटॅशियम, फॅास्फरस यासारखी उपयुक्त द्रव्ये असतात तसेच  'ब' आणि 'क' जीवनसत्वेही असतात.

आता आपण सफरचंदाचे काही उपयोग जाणून घेऊयात ,

१) सफरचंदामधील नैसर्गिक औषधी गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील पेशींचे रक्षण होते आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.

२) सफरचंदाची साल शरीरातील कफची समस्या दूर करण्यास खूप उपयुक्त आहे म्हणून सफरचंद सालीसकट खावे.

३) सफरचंदात असलेल्या फायबरमुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

सफरचंद हे एक  आयुर्वेदिक गुणकारी फळ आहे आणि ते आपल्याला नेहमीच उपलब्ध असते कधीही खाण्यापूवी सफरचंद नेहमी स्वच्छ धुवून खावेत.

Reagrds

सफरचंद खाण्याचे फायदे
सफरचंद खाण्याचे फायदे

संबंधीत इमेज / चित्र :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या