तरुण वयात वाढत्या रक्तदाबाची समस्या:

तरुण वयात वाढत्या रक्तदाबाची समस्या:सध्या आपल्याला वर्तमानपत्रांतून खूपवेळा अशा बातम्या दिसतात ज्यामध्ये एखाद्याला तरुण वयामध्ये हार्टअटॅक येऊन त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवला. बऱ्याचदा तरुण वयात एखादा आजार झाला आहे हे अनेकांना मान्य करणे जरा जड जाते आणि जरी त्या 
व्यक्तीला ते समजले तरी त्याबद्दल उपाय करण्याचे अनेकदा टाळलेजाते. पण अशा दुर्लक्षामुळे पूर्वी चुकूनच एखाद्याला होणाऱ्या रक्तदाबाची समस्या आताच्या काळात बऱ्याच लोकांना दिसून येते. 
ह्याची अनेक कारणे आहेत ती म्हणजे

१) अपुरा व्यायाम
२) वेळीअवेळी जेवणे
३) फास्टफूडचा आहारात जास्त समावेश
४) अपुरी झोप
५) पुरेसे पाणी न पिणे 

ह्या अशा लाइफस्टाइलमुळे आज आपल्याला जगभरात विशी आणितिशीतील तरुणांमध्ये रक्तदाबाचा त्रास दिसू लागला आहे.

आजच्या तरुण पिढीमध्ये रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचे प्रमाण 
झपाटयाने वाढू लागले आहे आणि ह्याला कारणीभूत असलेली कारणे म्हणजे, आजचे  बदललेले राहणीमान आहे. परंतु रक्तदाबाच्या समस्या सहज टाळता येऊ शकतात जर तुम्ही रोजच्या आहारात 
भरपूर फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश जाणीवपूर्वक केला तर 
तसेच घरचे सकस जेवण खाण्यावर जास्तीतजास्त भर दिला तर. रोजच्यारोज वेळेवर जेवण घेणे तसेच व्यायाम करणे. 

रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी वजन आटोक्यात ठेवणे हे फार गरजेचे असते शरीराचा स्थूलपणा जितका वाढत जाईल तितकाच 
हृदयावरचा ताण आणि रक्तदाबाचा त्रास वाढत जाईल म्हणूनच  
तुमच्या डॉक्‍टरांना विचारून तुमच्या उंची आणि वयाप्रमाणे तुमचे वजनकिती असले पाहिजे हे तुम्ही वेळीच जाणून घेतले पाहिजे. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणाच्या समस्या ह्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत त्यामुळे ह्या मानसिक ताणाचा देखील रक्तदाब वाढवण्यात हातभार असतो; त्यामुळे तुम्ही तुमचा मानसिक ताण आटोक्‍यात ठेवा आणि त्यासाठी प्राणायम, 
योगा असे वेगवेगळे उपाय करा.
Regards


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.comखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या