पनीरचे नैसर्गिक फायदे

पनीरचे नैसर्गिक फायदे


आपल्या बऱ्याच लोकांना दूधजन्य पदार्थांचे फायदे माहित आहेत, त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पनीर, जो बाजारात अगदी सहज उपलब्ध असतो, बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. तसे पाहायला गेले तर पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. जे लोक शाकाहारी आहेत ते बऱ्याचदा त्यांची पसंती पनीरला देतात.पनीर हे दुधापासून बनलेले असल्याने त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळे ते आरोग्यदायी आहे. मग आता पनीरचे काही आरोग्यदायी फायदे आपण जाणून घेऊयात.

१) भरपूर प्रमाणात प्रोटिनचा स्रोत

शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा एक चांगला स्रोत आहे, साधारण १०० ग्रॅम पनीरमध्ये १८ ग्रॅम प्रोटिन्सचे प्रमाण असते, ज्यामुळे स्नायू बळकट होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

२) फॅट्स बर्न/कमी होण्यास उपयुक्त

पनीरच्या नियमित सेवनाने शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते, जर आपल्याला वजन कमी कमी करायचे असल्यास आपल्या आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा अवश्य समावेश करावा.

३) दात मजबूत होतात

पनीर हे दुधापासून बनले असल्याने अर्थातच त्यामध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. कॅल्शियममुळे दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. पनीरचे प्रमाण किती आणि कसे असावे हे तुम्ही आहारतज्ञाकडून जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याचे सेवन करा. 

४) भूक नियंत्रणात राहते

पनीरमध्ये असलेल्या प्रोटीनच्या गुणधर्मामुळे त्यामधील ऊर्जा हळूहळू वापरली जाऊन आपल्या रक्तामधील शर्करेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे वरचेवर भूक न लागता बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.


Regards

संबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: www.google.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या