शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

रोज सकाळी खा मूठभर भिजवलेले चणे


रोज सकाळी खा मूठभर भिजवलेले चणेकडधान्यात मोडणारे उसळी, भाज्यासाठी वापरलेले चणे आरोग्यासाठी नेहमीच उपयोगी आणि  पौष्टिक असतात तसेच जर भिजवलेले चणे खाल्ल्यास यातून प्रोटीन, फायबर, खनिजे आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात म्हणूनच रोज सकाळी एक मूठ भिजवलेले चणे खाल्ल्यास शरीरासाठी मोठे फायदेशीर आहे.

साधारण माहिती मिळवल्यास आपणाला असे दिसून येते की चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते तसेच अॅनिमियासारख्या आजारांवरदेखील चणे खूपच फायदेशीर ठरते चण्यांमध्ये फॉस्फरस, आणि मँगनीजसारखी खनिजे असतात ज्यामुळे त्वचेचे विकार दूर होतात. तसेच चण्यांमधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड कोलस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.

आपल्या सर्वांना दूधजन्य पदार्थामध्ये जसे की दूध, आणि दह्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते तितकेच ते चण्यामध्येदेखील असते, त्यामुळे हाडे मजबूत होण्यास खूप मदत होते, तसेच चण्यात फॉस्फरसची मात्रा अधिक असल्याने हिमोग्लोबिनचा स्तर वाढण्यास तसेच तो मेंटेन ठेवण्यास मदतच होते.

Regards
रोज सकाळी खा मूठभर भिजवलेले चणे
रोज सकाळी खा मूठभर भिजवलेले चणे


संबंधीत इमेज / चित्र :

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

स्ट्रेस मॅनेजमेंट


स्ट्रेस मॅनेजमेंट 


सध्याच्या टेकनॉलॉजि दुनियेत बऱ्याच लोकांना ताणतणाव, परीक्षेतील अपयश, व्यवसायातील अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा अशा गोष्टींमुळे तर तरुणांना प्रेमभंग, तीव्र नैराश्‍य किंवा तीव्र मानसिक आजार, व्यसनाधिनता अशा एक ना अनेक मानसिक आजार होत आहेत.

आजच्या स्पर्धात्मक युगात अपयश पचवू न शकल्याने बऱ्याच व्यक्ती नैराश्‍याच्या आहारी जात आहेत आणि त्यांना बरेच मानसिक आजारही होत आहेत. ह्या अशा कारणांमुळे  आपल्याला सर्वत्र मनोरुग्णांची संख्या झपाटयाने वाढलेली दिसून येत आहे एका जागतिक मानसिक आरोग्य फेडरेशनच्या आकडेवारीनुसार; सध्या जगातील 35 कोटी लोक विविध कारणांमुळे नैराश्‍यग्रस्त आहेत आणि त्यातील केवळ काही लोकच ह्यावर उपचार घेत आहेत.

एका सर्वेक्षणानुसार 2030 पर्यंत जगातील एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त असतील त्यामुळे आतापासूनच नैराश्‍य आणि मानसिक आजारासंदर्भात समाजात जनजागृती करणे अतिशय गरजेचे आहे. मानसिक आरोग्याची साधी व्याख्या म्हणजे दैनंदिन आयुष्यात येणा-या सगळ्या चांगल्या-वाईट अनुभवांना धीराने सामोरे जाणे, परंतु बरेच जण ह्यात अयशस्वी होताना दिसतात, जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे येतच असतात पण जेव्हा आयुष्याचा प्रवास खडतर होतो, आणि अशा वेळी नेमके काय करावे, कुणाला सांगावे आणि काय निर्णय घ्यावा हे खूपच महत्वाचे ठरते.

वारंवार आणि सतत त्याच त्या नको असलेल्या गोष्टींचा सारखा विचार करत राहिल्याने व्यक्ती नैराश्‍याच्या आहारी जातो, परंतु मला इथे एक सांगावेसे वाटते की नैराश्‍य हा उपचारांनी १००% बरा होणारा आजार आहे.

ह्या आणि अशाच नैराश्‍येतून मुक्ततेसाठी  डॉक्‍टरांच्या परवानगीने  औषधोपचारांचा मार्ग आपण अवलंबू शकतो, शरीरांतर्गत होणा-या जैविक बदलांमुळे आपल्या शरीरात निरनिराळे आजार बळावतात परंतु मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी डॉक्‍टरांच्या योग्य सल्यानुसार अँटी डिप्रेशन औषधे घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. काही अंशी अश्या लोकांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतल्यास त्यातूनही खूप चांगले परिणाम साध्य होऊ शकतात, अर्थातच डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञ हे त्या व्यक्तीच्या मानसिक आजारावर ठरवावे.

Regards

स्ट्रेस मॅनेजमेंट
स्ट्रेस मॅनेजमेंट 

संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: https://www.freepik.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:
बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

दररोज दही खाण्याचे फायदे

दररोज दही खा होतील अनेक फायदेतुम्हाला सर्वांना हे तर माहीतच आहे कि कुठलेही दूधजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी लाभदायकच असतात त्यातीलच एक आहे दही, दही खाणे हे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक मानले जाते. दह्यामधील विशिष्ट गुणधर्मामुळे  दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते, तसेच ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅस सारख्या समस्या असतील त्यांच्यासाठी दही एक उत्तम उपाय आहे.

१) सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना रात्रीच्या झोपेच्या समस्या उद्भवत आहेत , त्यांच्यासाठी दही हे एक उत्तम खाद्य आहे ज्यामुळे झोपेची समस्या हळू हळू कमी होण्यास मदतच होईल.

२) दह्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होण्यास मदत होते.

३) दह्यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते आणि तसेच  ज्या व्यक्तींना भूक कमी लागते त्यांनी जाणीवपूर्वक दह्याचे नियमित सेवन करावे.

४) दह्यामधील उपलबद्ध असलेल्या कॅल्शियममुळे आपल्या शरीरातील दातांना तसेच हाडांना चांगली  मजबूती मिळते.

५) आपण बऱ्याचदा पाहतो की वजन कमी करायचे असेल तर आपल्याला खूप साऱ्या जाहिराती नजरेस येतात पण ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी दह्यात बदाम, बेदाणे मिसळून खाल्ल्यास वजन वाढण्यास फायदा तर होतोच शिवाय शरीरामध्ये नैसर्गिक ताकदही मिळते.

६) शरीरातील हिटचे प्रमाण वाढल्यास बऱ्याचदा तोंड येते आणि जर असे झाल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा जेणेकरून ते लवकरात लवकर बरे होईल.

Regards

दही खाण्याचे फायदे
दररोज दही खाण्याचे फायदे

संबंधीत इमेज / चित्र:

सौजन्य: www.google.com

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय


दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय 


सध्याचे जीवन आपण कितीही मॉडर्न म्हंटले तरी देखील आजकालची जीवनशैली ही अतिशय गुंतागुंतीची आणि धावपळीची आहे आणि ह्या अशाच जीवनशैलीमध्ये आपल्याला बरीच कामे देखील करावी लागतात आणि ती कामे करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ऊर्जा असणे आवश्यक आहे. पण ह्या कामाच्या रगाड्यात कुठेतरी, "आरोग्य ही खरी संपत्ती आहे" ह्याचे कुठेतरी विस्मरण झालेले दिसते आणि जर तब्बेत ठणठणिक असेल तर कामे करणे देखील सोपे होऊन ती करण्यास उत्साह वाटतो. परंतु जर आपण आपल्या आहारात काही योग्य बदल केल्यास ह्या अशा धावपळीच्या काळातदेखील आपले शरीर चांगले ठेवू शकतो तसेच आपल्या शरीरातील ऊर्जा दिवसभर टिकवून ठेवू शकतो.

खाली दिलेले काही सोपे उपाय करून तुम्ही तुमचे आरोग्य चांगले राखू शकता

१) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बरेच लोक सकाळचा ब्रेकफास्ट न करताच कामावर निघून  जातात, तर सकाळचा ब्रेकफास्ट कधीही चुकवू नका आणि दिवसभरात कामावर असताना एकाच वेळी खूप न खाता थोड्या थोड्या वेळच्या अंतराने थोडं थोडं खा.

२) ऑफिसमध्ये काम करताना बऱ्याच लोकांना चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते, तर तसे न करता तुम्ही जाणीवपूर्वक गाजर, काकडी यांसारख्या भाज्या / सलाड तसेच फळे खाण्याची सवय लावा.

३) प्रवासादरम्यान किंवा ऑफीसमध्ये किंवा घरी असताना भूक लागली की बिस्कीटे किंवा खारी, टोस्ट यांसारखे पदार्थ खाण्यापेक्षा फळे खाण्याची सवय लावा कारण चहासोबत मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात.

४) जे लोक फिल्ड जॉब करतात त्यांनी नारळ पाणी, फळांचा ज्यूस, लिंबाचे किंवा कोकम सरबत घ्यावे कारण सतत उन्हात फिरण्याने जास्त घाम येतो आणि थकल्यासारखे वाटते म्हणूनच सोबत पाण्याची बाटली ठेवावी. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सतत पाणी प्यावे.

५) सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयींसोबत पुरेशी झोप देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.म्हणूनच लवकर झोपण्याची स्वतःला सवय लावा आणि शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी टीवी अथवा मोबाईल चा वापर टाळावा.

६) सध्या रेडी टू ईट पदार्थ तसेच फास्ट फूड अगदी सहज उपलब्ध होतात ह्या अशा फूडमुळे  लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार उद्भवू शकतात, त्यामुळे हे असे पदार्थ टाळलेलेच बरे.

Regards

दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय
दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय 
संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

सफरचंद खाण्याचे फायदे


सफरचंद खाण्याचे फायदे


तुम्ही बाजारात फेरफटका मारल्यास तुम्हाला हमखास वर्षाचे बाराही महिने दिसणारे फळ म्हणजे सफरचंद,आरोग्यपूर्ण जीवनशैली आत्मसात करायची असेल तर रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सध्याच्या मॉडर्न लाइफस्टाइल मध्ये लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आपले आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वपुर्ण क्षार सफरचंदात असतात, म्हणूनच वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असणारे सफरचंद रोज एक तरी खावे.
सफरचंदात मोठ्या प्रमाणात 'लोह' असते तसेच ह्यामध्ये ग्लूकोज, पोटॅशियम, फॅास्फरस यासारखी उपयुक्त द्रव्ये असतात तसेच  'ब' आणि 'क' जीवनसत्वेही असतात.

आता आपण सफरचंदाचे काही उपयोग जाणून घेऊयात ,

१) सफरचंदामधील नैसर्गिक औषधी गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील पेशींचे रक्षण होते आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.

२) सफरचंदाची साल शरीरातील कफची समस्या दूर करण्यास खूप उपयुक्त आहे म्हणून सफरचंद सालीसकट खावे.

३) सफरचंदात असलेल्या फायबरमुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

सफरचंद हे एक  आयुर्वेदिक गुणकारी फळ आहे आणि ते आपल्याला नेहमीच उपलब्ध असते कधीही खाण्यापूवी सफरचंद नेहमी स्वच्छ धुवून खावेत.

Reagrds

सफरचंद खाण्याचे फायदे
सफरचंद खाण्याचे फायदे

संबंधीत इमेज / चित्र :

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

तरुण वयात वाढत्या रक्तदाबाची समस्या:

तरुण वयात वाढत्या रक्तदाबाची समस्या:सध्या आपल्याला वर्तमानपत्रांतून खूपवेळा अशा बातम्या दिसतात ज्यामध्ये एखाद्याला तरुण वयामध्ये हार्टअटॅक येऊन त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवला. बऱ्याचदा तरुण वयात एखादा आजार झाला आहे हे अनेकांना मान्य करणे जरा जड जाते आणि जरी त्या 
व्यक्तीला ते समजले तरी त्याबद्दल उपाय करण्याचे अनेकदा टाळलेजाते. पण अशा दुर्लक्षामुळे पूर्वी चुकूनच एखाद्याला होणाऱ्या रक्तदाबाची समस्या आताच्या काळात बऱ्याच लोकांना दिसून येते. 
ह्याची अनेक कारणे आहेत ती म्हणजे

१) अपुरा व्यायाम
२) वेळीअवेळी जेवणे
३) फास्टफूडचा आहारात जास्त समावेश
४) अपुरी झोप
५) पुरेसे पाणी न पिणे 

ह्या अशा लाइफस्टाइलमुळे आज आपल्याला जगभरात विशी आणितिशीतील तरुणांमध्ये रक्तदाबाचा त्रास दिसू लागला आहे.

आजच्या तरुण पिढीमध्ये रक्तदाबाचा त्रास सुरू होण्याचे प्रमाण 
झपाटयाने वाढू लागले आहे आणि ह्याला कारणीभूत असलेली कारणे म्हणजे, आजचे  बदललेले राहणीमान आहे. परंतु रक्तदाबाच्या समस्या सहज टाळता येऊ शकतात जर तुम्ही रोजच्या आहारात 
भरपूर फळे आणि भाज्या ह्यांचा समावेश जाणीवपूर्वक केला तर 
तसेच घरचे सकस जेवण खाण्यावर जास्तीतजास्त भर दिला तर. रोजच्यारोज वेळेवर जेवण घेणे तसेच व्यायाम करणे. 

रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी वजन आटोक्यात ठेवणे हे फार गरजेचे असते शरीराचा स्थूलपणा जितका वाढत जाईल तितकाच 
हृदयावरचा ताण आणि रक्तदाबाचा त्रास वाढत जाईल म्हणूनच  
तुमच्या डॉक्‍टरांना विचारून तुमच्या उंची आणि वयाप्रमाणे तुमचे वजनकिती असले पाहिजे हे तुम्ही वेळीच जाणून घेतले पाहिजे. 

आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताणाच्या समस्या ह्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत त्यामुळे ह्या मानसिक ताणाचा देखील रक्तदाब वाढवण्यात हातभार असतो; त्यामुळे तुम्ही तुमचा मानसिक ताण आटोक्‍यात ठेवा आणि त्यासाठी प्राणायम, 
योगा असे वेगवेगळे उपाय करा.
Regards


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.comखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

डाळिंबाचे आरोग्याला फायदे

डाळिंबाचे आरोग्याला फायदे

डाळिंबाचा रस प्यायल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. डाळिंबामुळे आपल्या शरीराची पचन शक्ती सुधारते आणि पचन सुधारल्याने शरीराला आपोआपच फायदे मिळू लागतात.

१) शरीरामधील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. 
आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी डाळिंब ज्यूस किंवा डाळिंब खूपच कामी येते आणि ह्यामुळे आपली शुगर लेव्हल मेंटेन राहून आरोग्यही चांगले राहते. 

२) रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते:
डाळिंबामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत तर होतेच शिवाय हिरड्या मजबूत होऊन आपल्या दातांची दुर्गंधीही दूर होण्यास खूप मदत होते.

३) शरीराची पचनशक्ती वाढण्यास खूपच मदत होते:
डाळिंब्यामध्ये असलेल्या पौस्टिक औषधी तत्त्वांमुळे हृदय, पोट, यकृत यांचं कार्य व्यवस्थित चालण्यास खूप  मदत होते. वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास डाळिंब ज्युस महत्वाचा ठरतो, तसेच उन्हाळ्यात डाळिंब ज्यूस प्यायल्याने शरीराला नैसर्गिक पोषण मिळते आणि तहान कमी होते. पचनशक्ती  वाढवण्यास तसेच त्वचा निरोगी राखण्यासही डाळिंब खूप उपयोगी पडते. 
Regards

संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.comखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

मूत्रपिंडाचे आजार वाढण्याची काही प्रमुख कारणे:

मूत्रपिंडाचे आजार वाढण्याची काही प्रमुख कारणे:


सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बऱ्याच लोकांना स्वतःचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी कायम संघर्ष करावा लागतो, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक सारख्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामध्ये सध्या बळावत चाललेला आजार म्हणजे मूत्रपिंडाचा, किडनीचा आजार. आपल्या शरीरातून अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंड करत असते. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य योग्य आणि पद्धतशीरपणे होणे फारच गरजेचे असते. परंतु जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे आजार बळावण्यास आपोआपच निमंत्रण मिळते. त्यासाठी आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे.   

शरीरातल अशुद्ध घटक बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंड म्हणजेच किडनी करते. त्यामुळे निरोगी जीवनासाठी  मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.
१) उच्च रक्तदाब
२) कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण
३)  मधुमेह
४) धूम्रपान आणि मद्यपान
५) लठ्ठपणा
ह्यासारख्या आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी निगडित असलेल्या गोष्टींमुळे मूत्रपिंडाचे विकार होण्यास जास्त धोका असतो, म्हणूनच आपण आपले रोजचे खाणेपिणे नियमित व्यायाम अश्यासारख्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून आपण अशा आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकतो.Regards

मूत्रपिंडाचे आजार वाढण्याची काही प्रमुख कारणे

संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 

  

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचे असेल तर हे सोपे उपाय करा

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचे असेल तर हे सोपे उपाय करा 


आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांना ब्लड प्रेशरच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे आणि ही एक गंभीर समस्या होऊन बसते. उच्च रक्तदाबामुळे हृदयासंबंधित आजार आणि हार्ट अॅटॅकच्या समस्या वाढत चालल्या आहेत. अनेक आजारांना त्यामुळे आपोआपच निमंत्रण मिळत आहे, म्हणूनच तुम्ही घरच्याघरी काही साधे उपाय करून स्वतःचे आरोग्य चांगले राखू शकता.

१) गाजर - गाजराचे नियमित सेवन केल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

२) बीट - बाजारात सहजच उपलब्ध असलेल्या बीटाचा रस करून अथवा शक्यतो ते कच्चे खाऊन आपण आपले ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो.

३) मध आणि कांद्याचे मिश्रण - ह्या दोघांचे मिश्रण करून प्यायल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. साधारण एक कप कांद्याचा रस आणि दोन चमचे मध यांच्या मिश्रणाने आपल्या दिवसाची सुरवात करा.


४) लसूण : दररोजच्या जेवणात लसूणाचा समावेश आवर्जून केल्याने  कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास खूपच मदत होते.

Regards


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

हृदय रोगाची लक्षणे

हृदयरोगाची प्रमुख कारणे 


सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तसेच पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि काही व्यसनांमुळे हार्ट अॅटॅकचा धोका अधिक वाढू लागलेला आहे, तसेच हल्लीच्या काळात आपण पाहत आहोत कि खूप लहान वयात लोकांना हार्ट अॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे.

१) व्यसने - धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयीनमुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढण्याची आणि बळावण्याची शक्यता अधिक असते.
२) पोषक आहाराचा अभाव - हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बरेच जण सकाळचा ब्रेक फास्ट न करता त्यांच्या कामावर निघून जात आहेत ह्यामुळे भविष्यात लठ्ठपणा वाढून हार्ट अॅटॅकचा धोका वाढण्याच्या शक्यता अधिक आहेत. तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे पोषक आहाराचे सेवन खूप कमी होत चालले आहे.
३) नियमित व्यायामाचा अभाव - जर चांगले आरोग्य हवे असेल तर त्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा असतो. पण व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम बऱ्याच लोकांकडून केला जात नाही आणि हे कारणही हार्ट अॅटॅकला कारणीभूत ठरत आहे.
४) अनियमित रक्तदाब - अनियमित रक्तदाबामुळे देखील हार्ट अॅटॅकचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते आणि तो जर नीट ठेवायचा असेल तर योग्य आहार, नियमित व्यायाम करणे खूपच गरजेचे आहे.

Regardsसंबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.comखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: : 


कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय


मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

पनीरचे नैसर्गिक फायदे

पनीरचे नैसर्गिक फायदे


आपल्या बऱ्याच लोकांना दूधजन्य पदार्थांचे फायदे माहित आहेत, त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पनीर, जो बाजारात अगदी सहज उपलब्ध असतो, बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. तसे पाहायला गेले तर पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. जे लोक शाकाहारी आहेत ते बऱ्याचदा त्यांची पसंती पनीरला देतात.पनीर हे दुधापासून बनलेले असल्याने त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळे ते आरोग्यदायी आहे. मग आता पनीरचे काही आरोग्यदायी फायदे आपण जाणून घेऊयात.

१) भरपूर प्रमाणात प्रोटिनचा स्रोत

शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा एक चांगला स्रोत आहे, साधारण १०० ग्रॅम पनीरमध्ये १८ ग्रॅम प्रोटिन्सचे प्रमाण असते, ज्यामुळे स्नायू बळकट होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

२) फॅट्स बर्न/कमी होण्यास उपयुक्त

पनीरच्या नियमित सेवनाने शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते, जर आपल्याला वजन कमी कमी करायचे असल्यास आपल्या आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा अवश्य समावेश करावा.

३) दात मजबूत होतात

पनीर हे दुधापासून बनले असल्याने अर्थातच त्यामध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. कॅल्शियममुळे दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. पनीरचे प्रमाण किती आणि कसे असावे हे तुम्ही आहारतज्ञाकडून जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याचे सेवन करा. 

४) भूक नियंत्रणात राहते

पनीरमध्ये असलेल्या प्रोटीनच्या गुणधर्मामुळे त्यामधील ऊर्जा हळूहळू वापरली जाऊन आपल्या रक्तामधील शर्करेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे वरचेवर भूक न लागता बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.


Regards

संबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: www.google.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...