चालणे आरोग्यासाठी केंव्हाही चांगले

1  चालणे आरोग्यासाठी केंव्हाही चांगले 


चालण्यासारखा सोपा व्यायाम नाही असे म्हंटले जाते. दिवसातून काही वेळ बाजुला काढून जरी आपण नुसतं पूर्ण लक्ष्य केंद्रित करून चाललो तरी आपण नक्कीच आरोग्यदायी जीवन जगू शकतो. 

विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपली बरीच कामे ही यंत्रांद्वारे कमी वेळात व कमी श्रमात होतात. वाहनांची सोय असल्याने जवळ असो व लांब आपण शारीरिक श्रम न करता सहज प्रवास करतो. लिफ्ट असल्याने जिन्यांचा वापर सहसा कुणी करत नाही. परंतु ह्या सर्वांमुळे हल्लीच आपलं चालणं कुठेतरी लोप पावत चालले आहे.

लोकं असं म्हणतात आम्ही स्टेशन पर्यंत चालत जातो, ऑफिसमध्ये चालतो, दिवसभर काहीनाकाही कारणाने चालतो पण हे चालणे नसून ते एक एक्सरशन (Exertion) आहे. कारण दिवसभर काम करताना, चालताना, आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्या कामावर केंद्रित असतं. आपल्याला ट्रेन, बस, पकडायची असते, ऑफिसची वेळ गाठायची असते, मुलांना शाळेत वेळेवर सोडायचं असते, त्यामुळे हे चालणे हा व्यायाम नसून एक प्रकारे एक्सरशन (Exertion) असते. आपला फोकस हा आपल्या शरीरावर नसून काम पूर्ण करण्याकडे अधिक असतो. 

दिवसातला काही वेळ बाजूला काढून सैल कपडे घालून शांत चित्ताने, कोणाशी न बोलता पूर्ण लक्ष केंद्रित करून चालण्याने आपल्या शरीरातून जो घाम निघतो त्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते व ह्या चालण्याचा आपले शरीर स्वास्थ्य चांगले राहायला मदतच होते.

तुम्ही चाला, पण एक व्यायाम म्हणून, नाकी एक परिश्रम म्हणून.

Regards


संबंधीत इमेज / चित्र :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या