शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

स्थूलपणा कमी करायचाय तर ह्या गोष्टी पाळा

स्थूलपणा कमी करायचाय तर ह्या गोष्टी पाळा


सध्याच्या फास्ट लाइफमध्ये स्थूलपणा हा एक गंभीर विषय झालेला आहे. बऱ्याच लोकांना ह्याच्यावर मात करायची असते पण मला इथे तुम्हाला एक सांगावेसे वाटते की हे सहज शक्य आहे पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी तुमच्या रोजच्या आहारात कटाक्षाने पाळाव्या लागतील

१) आपल्या लठ्ठपणावर जेंव्हा तुम्ही काम सुरु कराल तेंव्हा गोड, आंबट, थंड आणि जड पदार्थ यांना  आहारातून शक्यतो दूरच ठेवा.

२) आपल्या शरीरातील अनावश्यक घटक म्हणजेच टॉक्सिन्स 
(Toxins) जास्तीतजास्त बाहेर काढण्यासाठी नियमित आणि भरपूर पाणी प्या.

३) तळलेले पदार्थ, पापड, थंड पेयं, आइस्क्रीम, चॉकलेट, फास्ट फूड आदी गोष्टीही कटाक्षाने टाळाव्यात.

४) आहारात जास्तीतजास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा, दूधजन्य पदार्थांचे सेवन करावे.

५) आपल्या खाण्याबरोबरच, रोजच्या दैनंदिन जीवनात पुरेशा व्यायामाचीदेखील जोड द्यावी.

६) रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये, तसेच शक्यतो मोबाईल, टेलिव्हिजन पाहणे टाळावे.Regardsसंबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.com


Click below link to Read our book :बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

सुंदर त्वचेसाठी कढीपत्ता

  सुंदर त्वचेसाठी कढीपत्ता 

 स्त्री असो वा पुरुष दोघेही कायम सुंदर दिसण्यासाठी नेहमीच काहीनाकाही करतच असतात. सुंदर दिसण्यासाठी विविध ब्युटी प्रॉड्क्टवर खर्चदेखील खूप होतो. पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येकाच्या घरात नेहमीच उपलब्ध असते आणि ती म्हणजे कढीपत्ता, आहे ना आश्चर्याची गोष्ट.


 पण हे खरे आहे आणि ह्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचे त्वचेचे सौंदर्य टिकवू  शकता आणि तेही अगदी माफक दरात. कारण कढीपत्ता हा किती स्वस्त आहे हे तुम्हाला वेगळे सांगायला नको म्हणूनच मी माफक दर म्हंटले. कढीपत्त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स तसेच सुरकुत्या कमी होऊन आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. ह्यासाठी तुम्ही कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ती वाटून त्याची योग्य ती पेस्ट बनववून तुमच्या चेहऱ्याला लावा ह्याने चेहऱ्यास चमक येऊन तुमची त्वचा निरोगी होण्यास मदत होईल. तसेच तुमचा चेहरा तजेलदार राहण्यास मदत होईल. कढीपत्त्याची तुम्हाला योग्य अशी पेस्ट बनवून तुम्ही जर तुमच्या एफ्फेक्टड (affected) त्वचेवर मसाज केल्यास त्वचेसंबंधी समस्या दूर होण्यास खूप मदत होईल. तसेच ज्या लोकांना डायबिटीजचा आजार असेल त्यांनी कढीपत्त्याच्या पानांची पावडर करुन साधारण ५ ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास डायबिटीज कमी होण्यास मदत होईल, परंतु येथे  तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच तुमचे पाऊल उचला आणि असे घरगुती उपाय करा.


Regardsसंबंधीत इमेज / चित्र :

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय


सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कोलेस्ट्रॉलची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि चांगले आरोग्य जर टिकवून ठेवायचे असेल तर योग्य आणि पोषक आहार हा रोजच्या रोज केलाच पाहिजे. हल्लीच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे ह्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. बऱ्याच आजारांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ह्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जर कमी अथवा नियंत्रणात ठेवायचे असेल तर आपल्या आहारात खालील पदार्थांचा नक्की समावेश करा.

1) लसूण - लसणाचा आपल्या आहारात नियमित समावेश केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहण्यास मदत होते.

2) ऑलिव्ह ऑईल - अँटी-ऑक्सिडंट्सच्या मूलभूत गुणधर्मामुळे आपल्या आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जरूर उपयोग करावा.

3) मासे - माश्यांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते म्हणूनच आहारात नियमितपणे माशांचा समावेश करावा. तसेच माश्यांच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.

4) अॅवोकॅडो - अॅवोकॅडोच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

5) सुकामेवा - लहानपणापासूनच आपल्या सर्वानाच अक्रोड, बदाम यासारखा सुकामेवा खायला आवडतो तो केवळ चविष्टच नसतो तर आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीरदेखील असतो. ह्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहून हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

6) ओटमील - ओटमीलमध्ये असलेल्या सॉल्यूबल फायबरच्या मुबलक प्रमाणामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. Regards


संबंधीत इमेज / चित्र :
सौजन्य: www.google.com

You can see more blogs खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:  
झोपेची आवड आपल्या सर्वांनाच

झोपेची आवड आपल्या सर्वांनाच

सुट्टीच्या दिवसात बिछान्यामध्ये लोळत पडायला सर्वांनाच आवडते. मोठी माणसं लहान मुलांचा नेहमीच हेवा करतात आणि थोडे निराश देखील होतात की त्यांना सकाळी लवकर उठावं लागत. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानांचीच आवडती गोष्ट म्हणजे झोप.

कामाच्या रगाड्यात कितीजण आवश्यक तेवढी झोप घेतात. जसा मोबाईल वेळेवर पूर्ण चार्ज केला की तो कुठल्याही अडथळ्याशिवाय आपल्याला त्याचा योग्य वापर करता येतो. जर तो पूर्ण चार्ज नसेल तर आपल्याला महत्वाच्या कामासाठी त्याचा नीटसा उपयोग करता येणार नाही. तसेच आपल्या शरीराला दिवसभर उत्साहाने कार्यरत राहण्यासाठी विश्रांतीची म्हणजेच झोपेची गरज असते. झोप ही चार्जरसारखी आपल्या शरीराला चेतना आणि उत्साह देण्याचे काम करते.

साधारण ७ ते ८ तास झोप ही निरोगी शरीरासाठी अत्यावश्यक आहे. ही झोप रात्रीच्यावेळेस घेणेही तितकेच महत्वाचे आहे. रात्री सलग ७ ते ८ तास झोप घेतल्याने शरीराची नैसर्गिकरित्या टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्याची क्रिया सुरळीतपणे पार पडते व ह्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी आपल्याला व्यवस्थित टॉयलेट झाल्याने मिळतो ज्याने आपले स्वास्थ्य निरोगी राहण्यास मदत होते. वेळी अवेळी घेतलेल्या झोपेमुळे ही क्रिया सुरळीत व्हायला बाधा येते. म्हणूनच म्हंटले आहे

लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्यसंपदा मिळे. 

Regards

संबंधीत इमेज / चित्र :

सौजन्य: www.google.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केळी आणि गरम पाण्याचे करा नियमित सेवन

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी केळी आणि गरम पाण्याचे करा नियमित सेवन 
आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचवेळा सकाळचा ब्रेकफास्ट राहून जातो आणि हेच मोठे कारण कालांतराने वजन वाढीसाठी कारणीभूत ठरते त्यामुळे तुम्ही आठवड्यातले काही दिवस सकाळी नाश्त्यामध्ये केळी आणि गरम पाणी घेऊन स्वतःचे वजन आणि भुकेचे नियंत्रण करू शकता. केळीसोबत एक कप कोमट अथवा गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि लठ्ठपणा नियंत्रणात येण्यास मदत होते आणि ह्याच्या नियमित सेवनामुळे आपल्या शरीराला चांगला आकार येण्यास मदत होते.

केळ्यातील स्टार्च आणि हेल्दी कार्बोहायड्रेटमुळे आपली भूक नियंत्रणात राहून त्याचा उपयोग लठ्ठपणा कमी होण्यासाठी होतो. ह्याच्या नियमित सेवनाने आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटते. वैज्ञानिकांच्या आत्तापर्यंतच्या संशोधनानुसार सकाळी केळी खाल्याने त्याचे अनेक फायदे आपल्या दिवसभराच्या  कामकाजातून / ऍक्टिव्हिटी मधून दिसून येतात.


केळी शरीरातील मेटाबॉलिझमचा स्तर वाढवून पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत करते तसेच ह्यामधील फायबरमुळे बद्धकोष्ठतेशी संबंधीत तक्रारी दूर करण्यास मदत करते.

Regards

संबंधीत इमेज / चित्र :

चालणे आरोग्यासाठी केंव्हाही चांगले

1  चालणे आरोग्यासाठी केंव्हाही चांगले 


चालण्यासारखा सोपा व्यायाम नाही असे म्हंटले जाते. दिवसातून काही वेळ बाजुला काढून जरी आपण नुसतं पूर्ण लक्ष्य केंद्रित करून चाललो तरी आपण नक्कीच आरोग्यदायी जीवन जगू शकतो. 

विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपली बरीच कामे ही यंत्रांद्वारे कमी वेळात व कमी श्रमात होतात. वाहनांची सोय असल्याने जवळ असो व लांब आपण शारीरिक श्रम न करता सहज प्रवास करतो. लिफ्ट असल्याने जिन्यांचा वापर सहसा कुणी करत नाही. परंतु ह्या सर्वांमुळे हल्लीच आपलं चालणं कुठेतरी लोप पावत चालले आहे.

लोकं असं म्हणतात आम्ही स्टेशन पर्यंत चालत जातो, ऑफिसमध्ये चालतो, दिवसभर काहीनाकाही कारणाने चालतो पण हे चालणे नसून ते एक एक्सरशन (Exertion) आहे. कारण दिवसभर काम करताना, चालताना, आपलं संपूर्ण लक्ष हे आपल्या कामावर केंद्रित असतं. आपल्याला ट्रेन, बस, पकडायची असते, ऑफिसची वेळ गाठायची असते, मुलांना शाळेत वेळेवर सोडायचं असते, त्यामुळे हे चालणे हा व्यायाम नसून एक प्रकारे एक्सरशन (Exertion) असते. आपला फोकस हा आपल्या शरीरावर नसून काम पूर्ण करण्याकडे अधिक असतो. 

दिवसातला काही वेळ बाजूला काढून सैल कपडे घालून शांत चित्ताने, कोणाशी न बोलता पूर्ण लक्ष केंद्रित करून चालण्याने आपल्या शरीरातून जो घाम निघतो त्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते व ह्या चालण्याचा आपले शरीर स्वास्थ्य चांगले राहायला मदतच होते.

तुम्ही चाला, पण एक व्यायाम म्हणून, नाकी एक परिश्रम म्हणून.

Regards


संबंधीत इमेज / चित्र :

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

पपई खाण्याचे आहेत भरपूर फायदे

पपई खाण्याचे आहेत भरपूर फायदे


फळे हि आरोग्यासाठी नेहमीच चांगली असतात हे तर आपल्या सर्वानाच माहित आहे. आता आपण येथे बाजारात नेहमीच उपलब्ध असणाऱ्या पपई विषयी थोडे जाणून घेऊया. पपई हे उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावे कि थंडीत ह्याबद्दल नेहमीच चर्चा झटत असते. ह्या पपई चे खूप फायदे देखील आहेत ते आपण आता जाणून घेऊयात.
1)  पपईच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होऊन ऋतुमानाप्रमाणे येणाऱ्या काही आजारांवर मात करण्यास मदत होते. थोडक्यात पपईमुळे आजार लवकर बरा होण्यास मदतच होते.
2)  मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्त्व 'क' असल्यामुळे आपल्या शरीरातील आवश्यक जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास पपईच्या सेवनाने मदत होते.
3)  साधारण मध्यम आकाराच्या पपईमध्ये अंदाजे १५० कॅलरीज तसेच फायबर्स असल्याने  आपल्या भूकेवरील नियंत्रणासाठी ह्याचे नियमित सेवन उपयुक्त ठरते.
4)  मानवी शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण संतुलित राखण्यास नियमित पपईचे सेवन मदत करते.
5) दिवसभरच्या धावपळीने आपल्याला थकल्यासारखे जाणवत असल्यास वाटीभर पपई खाल्ल्यास कामामुळे आलेला क्षीण कमी होण्यास मदत होते.
6)  डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते आणि पपईमध्ये ह्याचे प्रमाण चांगले असते म्हणूनच ह्याच्या नियमित सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

7)  आजच्या धकाधकीच्या जीवनात जेवणाच्या वेळा बदलणे, काही कारणांनी बाहेरचे खावे लागणे, वातावरणातील बदल यांचा शरीरावर परिणाम होत असतो आणि ह्याचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो आणि पपईच्या नियमीत सेवनाने पचनशक्ती सुधारण्यास मदत तर होतेच तसेच वजन कमी करण्यासहि हे एक  उपयुक्त फळ आहे.

Regards

इमेज / चित्र : सौजन्य
सौजन्य: www.google.com


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: 
संतुलित आहाराची गरज

संतुलित आहाराची गरज 


आपल्या सर्वांनाच माहित आहे आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या आहारावर अवलंबून असते. आहार म्हणजेच अन्न, आपण जे खातो व ज्याने आपल्या भुकेची शांती होते. आपण घेत असलेला आहार हा पौष्टीक व संतुलित असल्यास शरीराची योग्य वाढ होते, आपले वजन नियंत्रणात राहते व खरोखर आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो.
काय आहे हा संतुलित आणि पौष्टीक आहार, ह्याविषयी थोडं जाणून घेऊयात, संतुलित किंवा समतोल आहार किंवा ज्याला आपण नुट्रीशन म्हणतो ते म्हणजे ४० अन्नघटक त्यांची नावे:
१० अमीनोअसिड्स
१५ व्हिटॅमिन्स
१४ मिनरल्स
१ इसिन्सिअल फॅटी ऍसिड 
हे ४० अन्नघटक बाहेरून रोजच्यारोज मिळाले पाहिजेत, तर ते कसे मिळणार तर आपल्या रोजच्या आहारातून. आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये ह्या ४० अन्नघटकांचा समावेश असल्यास आपण संतुलित आणि पौष्टीक आहार घेत आहोत असे समजावे, ज्याला आपण बॅलन्स नुट्रीशन असे म्हणतो.

चला तर मग आपल्या रोजच्या आहारात ह्या ४० अन्नघटकांचा समावेश करू आणि आरोग्यदायी जीवन जगू.

इमेज / चित्र : सौजन्य
सौजन्य: www.google.com खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: 

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

कांद्यांची पात खाण्याचे फायदे

कांद्यांची पात खाण्याचे फायदेआपणा बहुतेक सर्वाना हिरव्या कांद्याची पात ही खाण्यासाठी चविष्ट असते हे कदाचित माहित असेल. बरेच लोक हिरव्या पात्याची भाजी देखील करतात, मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे देखील असतात. तसेच ह्यामध्ये सल्फरचे योग्य प्रमाण असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक देखील आहे.

ह्या हिरव्या पातीच्या कांद्यामध्ये अनेक प्रकारचे जे शरीराला आवश्यक असे कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅगनीज आणि फायबरचे प्रमाण देखील खूप चांगले असते. ह्या सर्व अत्यावश्यक गोष्टींमुले हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास खूप मदत होते. 

हिरव्या पातीच्या कांद्यामध्ये अँटिऑक्सिडेन्ट आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सध्या भेडसावत असलेल्या कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदतच होते.


इमेज / चित्र:  
www.google.com  


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: 

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness

चक्‍कर येत असल्यास कोणते उपाय करावेत | What precautions to be taken for dizziness खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेलल...