संत्र्याच्या रसाचे फायदे

संत्र्याच्या रसाचे फायदेसंत्र्याचा रस प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. रोगाच्या साथींपासून बचाव करण्यात संत्र्याचा रस महत्त्वाची भूमिका बजावतो. रक्त वाहिन्यांचं रोगांपासून रक्षण करण्याचं काम संत्र्याचा रस करतो.
उत्तम आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर नेहमीच आपल्याला देतात. आपल्या सर्वांच्या आवडीचं आणि आंबटगोड फळ म्हणजे संत्र. आहारात संत्र या फळाचा समावेश आपण अवश्य करावा. संत्र्याच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात हे तर आपण चांगलेच जाणतो. संत्र्यात व्हिटॉमिन सी, कॅल्शियम, आयोडीन, सोडीयम, फॉस्फरस, अमिनो अॅसिड आणि व्हिटॉमिन ए यांसारखे प्रमुख घटक असतात.
1) संत्र्यामध्ये अँटीऑक्सीडंट्स अधिक प्रमाणात असतात जे कँसरच्या प्रभावाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. कँसरपासुन बचाव करण्यासाठी नियमित संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने फायदा होतो. एका संशोधनानुसार असंं समोर आलंय की, नियमितपणे संत्र्याचं सेवन करणाऱ्या व्यक्तीला दृष्टीसंबंधीच्या समस्या निर्माण होण्याचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो. 

2) संत्रीचा रस प्यायल्याने जखम लवकर भरते. कारण संत्रीमध्ये फोलेटतत्त्व असते. हे शरीरात नवीन सेल्स बनवण्यात मदत करते. तज्ञांच्या  शोधानुसार आठवड्याला एक संत्र खाण्याचे देखील बरेच फायदे आहेत. अनेक संशोधनातून असं स्पष्ट झालंय की, संत्र्यामध्ये फ्लॅवोनॉईड नावाचा घटक असतो. यामुळे आजारांपासून दूर राहण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. 

3) संत्रीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम असते. संत्रीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये फ्रुक्टोज, डेक्स्ट्रोज, खनिज आणि व्हिटॅमिन असतात आणि हे शरीरात पोहोचल्यावर लगेच ऊर्जा देण्याचे काम करतात. संशोधकांच्या सांगण्यानुसार, नियमितपणे संत्र किंवा लिंबूवर्गीय फळांचं सेवन केल तर हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका कमी होतो. हृदयाच्य कार्य उत्तम राहावं यासाठी संत्र्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम हे घटक फार उपयुक्त ठरतात.

4) संत्रीचे नियमित सेवन केल्याने मूळव्याधाची समस्या दूर होते. संत्र्याच्या मोसमामध्ये याचे नियमित सेवन करीत राहण्याने लठ्ठपणा कमी होतो. डाएटिंग न करताही संत्र्याच्या मदतीने काही प्रमाणात वजन कमी करता येणे शक्य आहे. संत्र्याच्या रसात झिरो फॅट असल्यानं वजन कमी करण्यास मदत होते.

5) उन्हाळ्यामध्ये थकवा आणि तणाव अधिक प्रमाणात जाणवतो, त्यासाठी संत्र्याचे सेवन केल्याने शरीरास खूपच फायदा होतो. लघवीला जळजळ होत असल्यास संत्र्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. संत्रीचा एक ग्लास रस संपुर्ण शरिराला रिलॅक्स करून तणाव  आणि थकवा दूर करतो. 

6) संत्री मध्ये विटामिन सी क जीवनसत्व असते ते अँन्टीआँक्सीडन्ट चे काम करते. संत्री मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे कोलेस्ट्रोल मुळे होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण कमी होते. तसेच जी व्यक्ती नियमितपणे संत्र्याचा रस पिते त्या व्यक्तींच्या मेंदूचं कार्य उत्तमरित्या सुरु राहतं. 

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा: 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या