सकाळी उठल्यावर ह्या ५ गोष्टींकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे

सकाळी उठल्यावर ह्या ५ गोष्टींकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहेसकाळी उठून लगेचच काही तरी काम करण्याची सवय अनेकांमध्ये असते. कामाचा आळस नसणे ही चांगली गोष्ट आहे पण अशीही काही कामं आहेत जी सकाळी उठल्यावर लगेच  करु नयेत.
Image result for wake up
wakeupontime.com
१. जिम करणे : अनेकांना सकाळी उठलं की लगेचच जिममध्ये जाण्याची सवय असते. पण सकाळी गडबडीत स्नायूंचा व्यायाम करणे चांगले नाही. उठल्यानंतर काही काळ शांततेत घालवा, शरीराला पूर्णपणे जागे व्हायला वेळ द्या. दीर्घ श्वास घ्या, एक ग्लास रेग्यूलर पाणी प्या आणि मगच दिवसाची सुरुवात करा.

२. फोन चेक करणे : सकाळी उठल्यानंतर फोन हातात घेऊन फोनमधले मेसेजेस वाचायलाच पाहिजेत ही सवय लावून घेऊ नका. सकाळी तुमची एनर्जी महत्वाच्या कामावर खर्च करा. सकाळी उठल्यावर 20 मिनिटं एक्झरसाईज 20 मिनिटं मेडीटेशन आणि 20 मिनिटं मन उत्साहित करणारे वाचन करण्याची सवय लावून घ्या.

३. ब्रेकफास्ट न करणे : भारतीयांपैकी 70 टक्के पेक्षा जास्त लोकं ब्रेकफास्ट करत नाहीत. कामाची गडबड, वेळ नसणे अशा अनेक कारणामुळे भारतीय लोकं ब्रेकफास्ट करत नाहीत. परंतु ब्रेकफास्ट चुकवणे महागात पडू शकते. सकाळच्या वेळी ब्लड शुगर लेव्हल कमी झाली असते कारण रात्रीचे जेवणानंतर बराच काळ झाला असतो. जागे झाल्यावर पहिल्या अर्धा एक तासात जर तुम्ही काही खाले नाही तर ही लेव्हल आणखीन खाली जाते आणि तुम्हाला आळशी बनवते. तेव्हा जमले तर एखादे फळ खा जेणे करून दिवस चांगला जाईल.

४. दिवसाचा प्लॅन : दुसऱ्या दिवसाचा प्लॅन आधल्या दिवशी केला असेल तर उत्तम. सकाळी काय करायचं हे ठरवले असेल तर दिवस नक्कीच मनासारखा जाईल. सकाळी उठून कामाचं नियोजन करा.

५. सकाळी किरकिर करणे : काही जणांना सकाळी कम्प्लेंट करण्याची सवय असते. एखादी वस्तू नाही मिळाली तर लगेचच चि़डचिड करणे, ओरडणे यासारख्या गोष्टी टाळा. यामुळे तुमचा पूर्ण दिवस खराब जावू शकतो.

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:Disclaimer


I do not intend to violet infringe the rights of the author/publisher of this article/book or copyright or any other rights by publishing the excerpt from their original work. This paragraph is a taken from the respective published material only with the view to inspire or motivates our readers. We expressed our sincere thanks to author/publisher for their support.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या