या सोप्या टिप्सने आयुष्यभर रहाल फिट!

या सोप्या टिप्सने आयुष्यभर रहाल फिट!

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जीमला जाण्यासाठी वेळ नसणारी अनेक लोकं आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतील. 
Couple running at the beach Free Photo

पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिम करणे सोडून दिले पाहिजे.
फिट आणि निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून घरच्या घरी काही सोपे व्यायामप्रकार आपण नक्कीच करू शकतो. रोजच्या धावपळीत आपण जर खाली दिलेल्या गोष्टींचे जर नीट पालन केले तर आपल्याला आयुष्यभर फिट राहण्यास नक्कीच मदत होईल. 

नेहमी वार्मअप करा:
कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये थोड्या प्रमाणात उष्णता निर्माण करण्यासाठी वार्मअप महत्त्वाचा आहे. जर वार्मअप करून व्यायामाला सुरुवात केल्यास आपले स्नायू दुखावण्यापासून वाचू शकतात.

क्षमतेप्रमाणे वजन उचलणे:
बऱ्याचदा दिवसभर बसून काम केल्याने आपले हात पाय जरा आखडल्यासारखे होतात त्यासाठी आपल्या हाताला आणि पायांना योग्य व्यायाम मिळण्यासाठी एक पाण्याची बादली तीन ते चार वेळा उचला आणि ठेवा जेणेकरून तुमचे संपूर्ण शरीर थोड्या प्रमाणात कोणत्याही मूव्हमेंटसाठी सज्ज होईल.

जिने चढणे-उतरणे:
सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे चालणे आणि जिने चढणे. जिने चढणे-उतरणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम असून अशा सोप्या व्यायामात आपण नेहमीच सातत्य ठेवले पाहिजे कारण हे व्यायाम आपण कोठेही आणि कधीही करू शकतो. नियमित व्यायाम केल्याने तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदतच होते. कोणताही व्यायाम करताना कधीही घाई करु नका. दोन व्यायामप्रकारांमध्ये पुरेसा अवधी घ्या.


Senior women doing Cobra stretching exercise Free Photo

दिर्घकाळ तंदुरुस्त राहण्यासाठी हे लहानसे बदल करा.

कधीही रिटायर होऊ नका:
नोकरीमध्ये किंवा आपल्या बिझिनेसमध्ये आपण एका ठराविक वयानंतर रिटायर होतो पण आपले वय कितीही झाले तरी आपण त्याकडे पाहून कधीही स्वस्थ बसू नये. आपल्या शरीराला आपण कायमच स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय लावली पाहिजे. शक्य असेल तिथे आपण लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा. त्यामुळे शरीरात रक्तसंचार सुरळीत होईल. योग्य मार्गदर्शनाने आपण  योगासने, ध्यान करू शकता.

वजन कायम नियंत्रित ठेवा:
आपले वजन कायम नियंत्रित ठेवण्यासाठी सात्विक, संतुलित आहार घ्या.त्यामुळे अतिरिक्त वजन वाढणार नाही. आपल्या आहारात जाणीवपूर्वक पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांचा समावेश करा. अंड, दूध अवश्य घ्या. त्यातून शरीराला प्रोटीन्स मिळतील आणि वजन नियंत्रित राहील. मांसाहार आपल्याला कितीही प्रिया असला तरी एका त्याचे नेहमीच प्रमाणात सेवन करा.

नेहमी आनंदी राहा:
आपल्या आयुष्यात कितीही तणाव असेल तरी तुम्ही जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करा, कधीही गंभीर आणि त्रस्त राहू नका. जमेल तेंव्हा ऑफिस कलिग्स, मित्रपरिवाराशी मज्जा मस्ती करा. हसणे आरोग्यासाठी खूप गरजेचे आणि चांगले आहे, ज्यामुळे तुमचे लक्ष इतर समस्या, टेन्शनपासून दूर जाऊन तुमचे शरीर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी राहण्यास मदत होते.

अनुभव शेअर करा:
तुम्हाला आलेले चांगले वाईट अनुभव आपल्या जवळच्या व्यक्तीकडे शेअर करा. ज्यामुळे तुमचे मन हलके होऊन तुम्हाला आलेल्या अनुभवातून तुम्ही नवे काहीतरी शिकाल जे तुम्हाला आयुष्यभर कामी येईल.
वर सांगितलेले उपाय हे किती सोपे आहेत हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पण ह्यावर आपण जेंव्हा स्वतःहून काम करू तेंव्हा आपल्याला त्याचा इच्छित परिणाम जाणवेल. ह्यासाठी आपण स्वतः त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे कारण आपले आयुष्य चांगले ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी ही सर्वप्रथम आपली आहे. त्यासाठी आपण आपल्या वयाकडे न पाहता आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. Livewell: Lead Meaningful Life  ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. जेंव्हा आपण कोणत्याही नवीन किंवा एखाद्या बदलाची सुरवात करतो तेंव्हा साहजिकच त्यामध्ये सुरवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण आपल्या शरीराला त्याची कित्येक वर्षांपासून सवयच नसते. तर मग ह्या अशा सवयींवर आपण कशा प्रकारे मत केली पाहिजे ते ह्या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत समजावले आहे तर कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरवात करण्यासाठी तुम्ही


खालील लिंकवर क्लिक करून हे पुस्तक घरपोच मिळवू 
शकता: 
Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या