तणावावर मात करा…
आपल्याला जर चांगले आयुष्य जगायचे असेल तर नेहमीच असे म्हटले जाते
की स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही महत्वाचे आहात हे लक्षात ठेवा. पौष्टीक आहार
घ्या.शरीराचा ताण हलका करण्यासाठी गरम किंवा थंड जसे तुम्हाला सहन होईल त्या
पाण्याने अंघोळ करा. तुमच्या मनाप्रमाणे दुकानात जाऊन खरेदी करा. लोकांमध्ये
मिसळा.
जुन्या सवयी बदलून काही नविन आणि चांगल्या सवयी लावून घ्या.त्यामुळे तुमची मानसिक आणि भावनिक प्रगती होईल.एखादा नविन छंद लावून घ्या.चांगली पुस्तके वाचा.चांगले संगीत ऐका. मित्रांशी नातेवाईकांशी फोनवरुन बोला. म्हणजे एकटेपणा वाटणार नाही. दोन आठवडयापेक्षा जास्त दिवस मन उदास असेल तर सावध रहा. शांत झोप लागत नसेल, निराश वाटत असेल, विस्मरण होत असेल, अस्वस्थ वाटत असेल, नेहमीपेक्षा जास्त थकवा येत असेल तर ही लक्षणे म्हणजे डिप्रेशनची आहेत. ताबडतोब डॉक्टारांचा किंवा मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्या.
जुन्या सवयी बदलून काही नविन आणि चांगल्या सवयी लावून घ्या.त्यामुळे तुमची मानसिक आणि भावनिक प्रगती होईल.एखादा नविन छंद लावून घ्या.चांगली पुस्तके वाचा.चांगले संगीत ऐका. मित्रांशी नातेवाईकांशी फोनवरुन बोला. म्हणजे एकटेपणा वाटणार नाही. दोन आठवडयापेक्षा जास्त दिवस मन उदास असेल तर सावध रहा. शांत झोप लागत नसेल, निराश वाटत असेल, विस्मरण होत असेल, अस्वस्थ वाटत असेल, नेहमीपेक्षा जास्त थकवा येत असेल तर ही लक्षणे म्हणजे डिप्रेशनची आहेत. ताबडतोब डॉक्टारांचा किंवा मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्या.
आयुष्यातली गुंतागुंत कमी करा
आजचे जीवन हे खूपच धावपळीचे आहे त्यामुळेच जास्तीत जास्त साधं सरळ
आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या दैनंदीन आयुष्याचं रोजच्या रोज निरीक्षण करून
कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते आधी ठरवा. ज्या गोष्टी नंतर केल्या तरी चालणार
असतील त्यांना कमी प्राधान्य द्या. मग उगीचच कारण नसताना निरुपयोगी कामात बिझी
राहू नका. काही थोडीच कामे करा, पण चांगली करा. कुणाची मदत लागली तर मोकळेपणाने
मागा आणि त्यांचे आभार माना.
वेळ आणि उर्जेची बचत करा
ही गोष्ट खरी आहे की जेंव्हा आपल्या अंगात उत्साह आणि ताकद असते की
सहाजिकच काम आणि कष्ट जास्त प्रमाणात केले जातात. पण हीच ताकद काही कारणाने कमी
झाली तर रोजच्या प्रमाणे सगळयाच गोष्ट पूर्वीसारख्या व्हायला हव्यात असा हट्टाहास
न धरता आहे त्या उर्जेची बचत करा. अशी उर्जा योजनापूर्वक आणि आवश्यवक कामासाठी
वापरा.दिवसभराचे योग्य असे वेळापत्रकच ठरवा. जास्त तणावाचे आणि कष्टाचे काम असेल
तर ते सकाळीच एकदम फ्रेश मूडमध्ये करा.
विश्रांतीच्या वेळा ठरवा. थकून जाण्यापूर्वीच विश्रांती घ्या
एखादे कष्टाचे काम आणि नंतर एखादे हलके काम असा क्रम ठरवा.सतत एका
नंतर एक कष्टाची कामे करु नका. बरेच लोक पर्सनल आणि प्रोफेशनल कामामध्ये फरक न
करता दिवसाची कामे करतच राहतात पण ह्याच कामाच्या योग्य वेळा ठरवून कामे केली तर
कामे लवकर होतील. त्यामुळे वेळेची व उर्जेची बचत होण्यास मदत होईल, कमी वेळात
पूर्ण होणाऱ्या कामाची आखणी करा एखादे काम कमी वेळात पूर्ण होणारे असेल तर ते काम
अगोदर हाती घ्या. ते काम पूर्ण झाले की मनाला समाधान वाटेल आणि काम पूर्ण केल्याचा
आनंदही होईल. काही विशिष्ट पर्सनल लहान लहान कामाची आखणी करून अशा कामामध्ये
जमल्यास घरच्यांना किंवा मित्रांनाही सामील करुन घ्या.
व्यसनाने तणाव दूर होत नाही
बरेच जण आज आपल्या आजूबाजूला तणावग्रस्त आहेत पण ह्यातलेच काही लोक
तणाव जाण्यासाठी झोपेची गोळी घेतात किंवा मद्यपान करतात. अशामुळे तात्पुरते
बरे वाटत असले तरी तो तणावमुक्तीचा उपाय नव्हे हे आधी लक्षात घेतले पाहिजे.
जर हे असेच चालू राहिले तर मग त्याचे व्यसनच लागते आणि ते शरीराला हानीकारकच आहे.
मुख्य म्हणजे ताणापासून मुक्ती होण्यासाठी झोपेच्या गोळ्या किंवा मद्यपान त्या
वेळेपुरताच तणाव दूर करण्याचे प्रयत्न असतात पण तो ताण तसाच राहतो, तो कमी तर होतच
नाही आणि अशा ह्या व्यसनाचा त्रास मात्र अनेक पटींनी वाढतो आणि आपल्या शरीराला आणि
मनाला जास्त हानी पोहोचवतो.
आनंदाचे क्षण शोधा
बरेच जण आज कामामध्ये इतके व्यस्त आहेत की ज्या आपल्या शरीराला
आवश्यक आहेत अशा गोष्टींसाठी त्यांना वेळच मिळत नाही पण तुम्ही स्वतःसाठी आणि
तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी वेळ राखून ठेवा. मोकळेपणाने हसता येईल असे विनोदी
किस्से ऐका किंवा कॉमेडी सीरिअल पहा. हसण्याने जादूसारखा परीणाम होतो. तुम्ही
कितीही दु:खी असलात तरी हसण्याने एका क्षणात मूड बदलतो. हसण्याने सगळं जगच सुंदर
दिसायला लागतं. हसण्याने ताण नाहीसा होतो. मित्रांसोबत विनोदी चित्रपट, नाटक बघा.
तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद वाटेल अशा गोष्टी शोधा आणि त्यात भाग घ्या. स्वत:विषयी
किंवा जगाविषयी फार मनाला लावून घेऊ नका. परिस्थिती कशीही असो नेहमीच सकारात्मक
विचार करा आणि प्रत्येक बाबतीत आशावादी राहा .कोणत्याही गोष्टीची वाईट बाजू बघता
त्याची चांगली बाजू बघा. सकारात्मकतेची निवड करा. तुमचा ताण कमी होईल.
अपरिहार्य गोष्टींचा स्वीकार करा
एक गोष्ट कायम लक्षात असू द्या आणि ती म्हणजे तुम्ही जग बदलू शकत
नाही. पण स्वत:ला मात्र नक्कीच बदलू शकता. घरामध्ये पत्नी मुले आईवडील आणि बाहेर
मित्र यांच्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल तर इथे एक गोष्ट
ध्यानात घ्यायला पाहिजे की प्रेत्येकाचे स्वभाव आणि मते वेगळी असतात. त्यांचे
दृष्टीकोन वेगळे असतात. प्रेत्यकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य
असते. तुम्हाला त्यात बदल करण्याचा कोणताही हक्क नाही आणि तसे करण्यात तुम्हाला यश
तर येणार नाहीच उलट ताणच वाढेल. म्हणून शांत रहा. शांत रहाण्याचे तंत्र शिकून
घ्या. सायकल जशी शिकावी लागते तसेच शरीर आणि मनाला शांत कसे ठेवायचे हेही
जाणीवपूर्वक शिकावे लागते.
Regards
![]() |
तणावावर मात करा… |
(Image From) https://goo.gl/j3oNgj
Regards
Fill the following link for the inquiry:
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:
0 Comments