टीव्ही, मोबाइल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून तुम्ही जेवण करता?

टीव्ही, मोबाइल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून तुम्ही जेवण करता?


पूर्वीच्या काळी जेंव्हा आपण घरामध्ये जेवण करायचो किंवा नातेवाइकांकडे जायचो तेंव्हा नेहमीच  जमिनीवर बसून जेवायचो आणि आपले सगळे लक्ष्य हे जेवणाकडे असायचे. पण आत्ता काळ पूर्णपणे बदलला आहे आणि जमिनीवरून आता लोकं डायनिंग टेबलवर जेवायला लागले आहेत. तसे पाहायला गेलं तर आजच्या फास्ट लाईफमध्ये बरेच जण हे त्यांच्या आहाराविषयी, फिटनेसविषयी अति जागरूक झालेले आहेत, कुठल्याही परिस्थितीत आपलं वजन वाढणार नाही, याकडेही लक्ष्य देऊ लागले आहेत. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे पण आजच्या जमान्यात काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण या छोट्या गोष्टीच नंतर मोठ्या होतात आणि तुमचे निश्चय आणि तुम्ही करीत असलेले कष्ट वाया जाऊ शकतात.


आजच्या गॅजेटच्या जमान्यामध्ये बऱ्याच जणांना  जेवताना टीव्ही, मोबाइल पाहात जेवण करायची सवय असते. त्यांना वाटतं, यामुळे आपण एकाच वेळी दोन गोष्टी साध्य करतो. आपलं जेवणही होतं आणि टीव्ही, बातम्या पाहायला एरवी जो वेळ मिळत नाही, तो वेळही यानिमित्तानं काढता येतो. जेवता जेवता व्हॉट्स अपचे मेसेजेस पाहून होतात, काही जणांना रिप्लाय देऊन होतो.आणखी एक तिसरा प्रकार म्हणजे आॅफिसात काही जण आपल्या टेबलावरच जेवण करतात. एकीकडे आपल्या समोर डेस्कटॉप किंवा लॅपटॉप सुरू असतो आणि ते पाहात पाहात दुसरीकडे जेवणही सुरू असतं.

 


तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, तुम्ही जर असं काही करत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे आपण किती खातोय, काय खातोय याकडे आपलं लक्ष राहात नाही, त्यावर कंट्रोल राहात नाही आणि त्यामुळे पचनाच्या आणि वजनवाढीच्या समस्याही ओढवतात. बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचं सेवन करतो. आपण जर वेटलॉस करत असाल तर तुमच्यासाठी हे फायद्याचे नाही हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे जेवताना कुठल्याही स्क्रीनसमोर तुम्ही बसत असाल, तर त्या प्रकाराला, सवयीला आधी आळा घाला.. कारण तुमच्या पचनापासून ते तुमच्या डोळ्यांपर्यंत आणि तुमच्या लाइफस्टाईललाही ते घातक आहे.Regards

 

(Image From) https://goo.gl/1A27aQ
Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या