बालकांच्या आहाराबाबत आपण कुठे चुकतोय? (भाग-२)

बालकांच्या आहाराबाबत आपण कुठे चुकतोय? (भाग-२)


लक्षात ठेवा
मुलांच्या पालकांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की शाळेत जाण्यापूर्वीची काही वर्षे (3 ते 4 वर्षे वय) म्हणजे जन्मानंतरचा मेंदूच्या वेगवान वाढीचा काळ असतो आणि ह्याच वयात मुले आपल्या आईची पूर्ण भाषा शिकून बोलूही लागतात त्यावरून आपण सहजच अंदाज लावू शकता. याच काळात महत्त्वाची बौद्धिक आणि स्मरणशक्तीसंदर्भातील वाढ होते, मेंदू शरीरांतर्गत निरोपाची देवाण-घेवाण करण्यासाठीची क्षमता विकसित करतो. ह्याचकरता लहान मुलांचा आहार हा नुट्रीशन ने परिपूर्ण असावा. मानसिक आणि बौद्धिक वाढीचे विविध टप्पे बारकाईने तपासून बाळाच्या मेंदूच्या वाढीची कल्पना येते. यापैकी काही टप्पे माझ्या वाचनात आले ते मी आता सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा येथे प्रयत्न करणार आहे –
अपेक्षित मानसिक विकास
तीन ते चार वर्षे याकाळात मुले बोलायला शिकतात. त्याच्या शब्दकोशात साधारणत: काही थोडेच शब्द असतात. ह्याच काळात मुले काही वस्तूंचा वापर करून अनुकरण करायला शिकतात. चार ते पाच वर्षे याकाळात मुले प्रामुख्याने मोठी वाक्ये बोलायला लागते. पुस्तकांची पाने काळजीपूर्वक उलटायला शिकते, फोटो आणि खासकरून आई आणि वडील ह्यांच्या व्यतिरिक्त इतर लोकांना ओळखायला शिकते.

आपण योग्य आहाराने शिकण्यातील अक्षमता टाळू शकतो
लहान मुलांचा मेंदू हा वेगाने वाढत असतो ह्याच काळात त्यांचा आहार हा न्यूट्रिशन ने परिपूर्ण असावा कारण आहारातील कमतरतांचा परिणाम मेंदूवर लगेचच होतो म्हणून मुलांना लहान वयात फास्ट फूडपासून लांबच ठेवावे. जर आहार व्यवस्थित असेल तर लहान वयात मुलांमध्ये अशी सवय विकास आणि वाढीला सहाय्यभूत ठरते, पण बालकांमध्ये पोषकद्रव्यांची कमतरता भासल्यास त्यांच्यात कालांतराने काही विकारांना आमंत्रणही ठरू शकते.
‘फास्ट फूड आरोग्यासाठी चांगले नाही” हे अगदी पूर्णपणे खरे आहे. कारण अशा अन्नात कृत्रिम रंग, कृत्रिम चवी, कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ, प्रिझर्वेटीव्हस, साखर, मीठ, हानिकारक फॅट्‌स यांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. यामुळे विचारप्रक्रियेचा वेग मंदावून,एकाग्रतेवरही परिणाम होतो. अशामुळे लहान वयातच डोळे, जीभ यासारख्या ज्ञानेंद्रियांवर परिणाम होऊ लागतात. काही बालकांमध्ये तर डोळे व स्नायूंचा समन्वय साधता न येण्यासारखी आणि लहान-सहान अडचणी सोडवता न येण्यासारखी लक्षणेदेखील दिसतात. त्यामुळे शैक्षणिक अक्षमता (learning disabilities) निर्माण होण्याची शक्यता असते.
आहाराचा परिणाम बालकाच्या सामाजिक कौशल्यांवरही होतो
जर लहान वयात जर योग्य अन्नाची सवय नसेल तर मुलांची अपुरी मानसिक वाढ इतर अनेक ठिकाणी परिवर्तित होते. ह्याचा थेट परिणाम त्यांच्या सामाजिक विकासावरही( social skills) दिसून येतो. सारखी कुरकुर आणि हट्ट करणे, रागीटपणा आणि आततायीपणा करणे, मध्येच निराश होणे यातून मुलांचे कुपोषण दिसून येते. या काळात पालकांनी वागणूकीची लक्षणे ओळखली पाहिजेत आणि सुधारली पाहिजेत. बऱ्याचदा पालक जाऊ दे, लहान आहे, होईल शहाणा हळूहळू असे म्हणून बालकाकडे दुर्लक्ष करतात आणि परिस्थिती सुधारण्याची पाहिली संधी गमावून बसतात.

याकडेही लक्ष ठेवा
जी मुले सारखे हट्ट आणि चिडचिड करतात,पालकांचे, कुटुंबियांचे कधीच ऐकत नाही, उद्धटपणा करतात, अशावेळेस वेळीच मुलांच्या पालकांनी सावध पाऊल उचलावे आणि ह्याकडे गांभीर्याने पाहावे कारण येणाऱ्या काळात मुले मोठी झाल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
आपण काही करू शकतो का?

ह्या अश्या गोष्टी टाळण्यासाठी आणि बरे करण्यासाठी समतोल आहार नक्कीच मदत करतो. आहाराबाबतीतल्या चांगल्या सवयी लहान वयातच लावणे यासाठी फार महत्वाचे आहे. म्हणून लहान मुलांना चांगल्या सवयी लावायला हव्यात आणि कोणते अन्न चांगले आणि कोणते आरोग्यासाठी अपायकारक ह्याचा फरक समजावून सांगावा. तसेच लहान वयातच त्यांना एक्झरसाइजचे महत्व पटवून द्यावे आणि टीव्ही, मोबाइल सारख्या वस्तूंपासून शक्यतो दूर ठेवावे.  

Regards

 


(Image From) http://www.domalochildcare.co.uk/  

Visit our website: www.livewellfitnesssolutions.comPost a Comment

0 Comments