हे' आहेत खजूर खाण्याचे फायदे...
तसे पाहायला गेले तर
आपल्या आजूबाजूला जसे फास्ट फूड मोठ्या प्रमाणात अव्हेलेबल आहे तसेच असेही खाद्य
आहे जे खूप मोठ्या प्रमाणात अव्हेलेबल आहे ज्याने आपल्या शरीराला खूप फायदा होतो
आणि त्यातलेच एक आहे जे वर्षभर अव्हेलेबल असते आणि बऱ्याच लोकांना देखील आवडते आणि
ते म्हणजे खजूर!!!! खजूर आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धक देखील आहे हे तर
बरेच लोक जाणतात. खजूर रोज खाल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. त्यामुळेच
तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारात याचा अवश्य समावेश करा आणि
आपण ह्याचे मूलभूत फायदेही आता पाहणार आहोत.
१. खजूर खाल्याने शरीरातील
टॉक्सिन्स दूर होतात. त्यामुळे चेहऱ्यावर आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. थोडक्यात खजुरामुळे
मृत त्वचा निघून जाते आणि चेहऱ्यावरील चमक वाढते.
२. खजूरमध्ये असलेल्या व्हिटॉमिन
सी मुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि सुरकुत्यांपासून त्वचा सुरक्षित राहते.
३. खजूरात असलेल्या व्हिटॉमिन
बी मुळे पिंपल्स, आणि स्ट्रेच मार्क्स दूर होतात. तसेच ह्यात झिंक असल्याने रोज खजूर खाल्याने केस काळे आणि दाट
होतात.
४. खजूरात लोह अधिक असते.
यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सध्या बऱ्याच लोकांना सतावणारी केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.
५. यात असलेल्या अॅंटीऑक्सिंडेंट्समुळे
फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी होतो. यामुळे वाढत्या वयातही सौंदर्य टिकून राहण्यास मदत
होते.
2 Comments
Khup sunder Tahiti.
ReplyDeleteMahiti
ReplyDelete