तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?


काही वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या सोसायटी मध्ये एखादी व्यक्ती ओव्हरवेट दिसून यायची आणि त्यात लहान मुले तर नसायचीच पण मला आठवते आहे माझ्या शाळेत सुद्धा एखादा विद्यार्थी संपूर्ण शाळेत लठ्ठ असायचा पण आज परिस्थिती खूपच बदलली आहे लोकांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आज सोसायटीमध्ये आणि शाळेत ओव्हरवेट जास्त आणि फिट लोकं आणि विद्यार्थी कमी दिसून येत आहेत आणि सध्या आरोग्याची ही समस्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच लहान मुलांमध्येही आढळून येत आहे. लहान मुले हे नेहमीच मोठ्यांना फॉलो करतात आणि त्यामुळेच लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि तासंतास मोबाईलचा वापर ही सध्या लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत. म्हणून आज मी ह्या सगळ्यावर कशाप्रकारे मात करता येईल ह्यासंबंधी काही टिप्स येथे देणार आहे

लठ्ठपणा टाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स:

१. मुलं लठ्ठ होत असतील, तर त्यांना सतत रागावू नका किंवा टोमणे मारु नका. त्यामुळे लहान मुलांमधला आत्मविश्वास कमी होऊन त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल आणि ते चांगली जीवनशैली आत्मसात करण्यास टाळाटाळ करतील.

२. जर पालकांनी उत्तम आणि पोषक आहार घेतला तर मुलेही साहजिकच पालकांनी घेतलेलाच आहार घेतील म्हणूनच सर्वप्रथम मुलांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पालकांनीच स्वतः पोषक आहार घेतलाच पाहिजे.

३. आपल्या मुलांची तुलना कधीही इतरांच्या मुलांशी करु नका. मुलांचे मनोबल उच्च राखायचे असेल तर चुकूनही अभ्यास, राहणीमान किंवा लठ्ठपणा, अशा कोणत्याही बाबतीत इतरांच्या मुलांशी तुमच्या मुलांची तुलना करु नका.

४. सध्या पालकच मुले शांत व्हावीत म्हणून स्वतः पुढाकार घेऊन आपल्याकडील मोबाइल त्यांच्या मुलांना देतात त्यामुळे मुलं सध्या मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि कंप्युटर यामुळे घरातच मग्न असतात. त्यांना बाहेर खेळण्याची सवय लावा किंवा एखाद्या स्पोर्ट्स क्लबची मेम्बरशिप घेऊन त्यांना तिथे पाठवा.


५. मुलांचा एक डाएट प्लॅन तयार करून त्यानुसारच पोषक आहार मुलांना जाणीवपूर्वक द्या. मुलांना पिझ्झा-बर्गर यांसारख्या फास्ट फूडची सवय असते. त्यामुळे मुलांना शक्य होईल तेवढे घरचेचं खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न करा.

Regards

 (Image From) http://bryanking.net

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या