मंगळवार, ४ जून, २०१९

फळांचे शरीराला होणारे फायदे


फळांचे शरीराला होणारे फायदे

हल्ली वेळेचा अभाव असल्याने व्यक्ती झटपट गोष्टी करण्यामध्ये अधिक रस घेतो. पूर्वी थोड्याशा भुकेला पटकन एखादे फळ खाल्ले जात असेल तर हल्ली फास्ट फूड किंवा जंक फूडचा आधार घेतला जातो. हे पदार्थ आपल्या जीवनशैलीचा भाग झाले आहेत. पण, त्याचा शरीरावर दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो. अनेक विकारांसाठी हे पदार्थ मूळ ठरू शकतात. त्याऐवजी आपण फळे खाल्ल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आहार संतुलित असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मोसमी फळांचे अवश्य सेवन करावे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहेच. या फळांच्या सेवनामुळे आजारांपासून बचाव होतो. 


रविवार, २ जून, २०१९

लसूण खाण्याचे फायदेलसूण खाण्याचे फायदे

सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी, किंवा चटणी बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते ! पण केवळ खाद्यपदार्थांची चव वाढविण्याखेरीज ही लसूण अजून किती तरी प्रकारे उपयोगाला येते. लसणीमध्ये अशी अनेक गुणकारी तत्वे आहेत, ज्यामुळे आपला अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे.शुक्रवार, ३१ मे, २०१९

ऐन तारुण्यात हार्ट अ‍ॅटॅक येण्याची कारणेऐन तारुण्यात  हार्ट अ‍ॅटॅक येण्याची कारणे

बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे?आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

फळांचे शरीराला होणारे फायदे

फळांचे शरीराला होणारे फायदे हल्ली वेळेचा अभाव असल्याने व्यक्ती झटपट गोष्टी करण्यामध्ये अधिक रस घेतो. पूर्वी थोड्याशा भुकेला पटकन ए...